weekly-horoscope-2020

रविवार 05 सप्टेंबर 2021 ते शनिवार 11 सप्टेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

Read in

रविवार 05 सप्टेंबर 2021 ते शनिवार 11 सप्टेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक
राशी भविष्य.

 

weekly-horoscope-2020

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

रविवार 05 सप्टेंबर चंद्ररास कर्क 18:06 पर्यंत व नंतर सिंह.

चंद्रनक्षत्र
आश्लेषा 18:06 पर्यंत व नंतर मघा. सोमवार 06 सप्टेंबर चंद्ररास सिंह
दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 17:51 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. मंगळवार
07 सप्टेंबर चंद्ररास सिंह 22:49 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी
17:05 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. बुधवार 08 सप्टेंबर चंद्ररास कन्या
दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 15:55 पर्यंत व नंतर हस्त. गुरूवार
09 सप्टेंबर चंद्ररास कन्या 25:44 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 14:30
पर्यंत व नंतर चित्रा. शुक्रवार 10 सप्टेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व नंतरही
तूळ आहे. चंद्र नक्षत्र चित्रा 12:57 पर्यंत व नंतर स्वाती. शनिवार 11 सप्टेंबर
चंद्ररास तूळ 28:12 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र स्वाती 11:12 पर्यंत
व नंतर विशाखा.
सरील प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार आदित्यपूजन श्रावण महिन्यातील शेवटचा रविवार.
शुक्राचा तूळ राशीत प्रवेश 24:49.
सोमवार. सोमवती अमावास्या 07:38 पासून ते 30:21 पर्यंत.
मंगळवार मौनव्रतारंभ.
गुरूवार हरितालिका तृतीया, स्वर्णगौरीव्रत

शुक्रवार 10 श्री गणेश चतुर्थी. पार्थिव गणपती पूजन.
शनिवार 11 ऋषिपंचमी, जैन संवत्सर (पंचमी पक्ष )
मेष:– आईच्या सल्ल्याप्रमाणे किंवा सल्ल्याच्या मदतीने सध्याचा प्रश्र्न
सोडवण्याचा प्रयत्न करा. बांधकाम साहित्याचा व्यापार करणार्यांना त्यांची
मार्केटमधील उधारी वसूल होऊ लागणार असल्याचे कळेल. स्मरणशक्तीच्या
अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना या सप्ताहात चांगली प्रगती होत असल्याचे
कळेल. तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी तुमच्या मुलांना पटणार आहेत.
त्यामुळे तुमच्या अपेक्षेनुसार सर्व गोष्टी सुरळीत सुरू होतील. डिझायनिंग व
अँनिमेशन च्या अभ्यासकांनी आपल्या आवडत्या छंदाबाबत अभ्यास
वाढवावा.

वृषभ :–नोकरीतील बदलापेक्षा व्यवसायाचा विचार करत असलात तर ते फारसे
योग्य ठरणार नाही. 10 तारखेची गणेश चतुर्थी व्यवसायातील कांही घडामोडी
करू नका असे सुचवित आहे. संततीच्या प्रतिक्षेतील मंडळीना यावर्षीचे श्री
गणेशाचे आगमन लाभदायक ठरेल. तरी विचार करा व आवश्यक ते डाँक्टरी
उपायही करा. संततीच्या बाबतीत मात्र तुम्हाला त्यांच्याबरोबर फार जमवून
घ्यायला लागणार आहे.त्यांची दादागिरी, अरेरावी या सप्ताहात तुम्हाला
त्रासदायक होईल.

मिथुन :–तुमच्या हातातील पगाराच्या पैशावर संतती कधी डल्ला मारते असे
वागेल. व तुम्हालाही गप्प बसावे लागेल. तुमचे तुमच्या आईबरोबर वैचारिक
मतभेद इतके होतील कि नातेच ताणले जाईल. पूर्वसूचना मिळाल्याने मनावर
संयम घाला. सरकारी कामातील अडचणी वाढणार आहेत तरी या सप्ताहात
कांहीही नव्याने काम काढू नका व पहिला कामाला विलंब न करता ते वेळेत करा.
10 ची गणेश चतुर्थी मुलींच्या बाबतीत आनंदाची व इच्छापूर्तीची राहील.

कर्क :–मुलींना, स्त्रीयांना सासरी सर्वच बाबतीत जमवून घ्यावे लागेल. पण
त्याचा कांगावा करू नका. त्याला सहजतेने सामोरे जा. मनातील इच्छा पूर्ण
करण्याकडे तुमचा कल राहिल. बर्याच महत्वाच्या गोष्टी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा
टेलिफोनवरच कराल आणि जग जिंकल्याचा आनंद मिळेल. नोकरीतील
वातावरण तुमच्यासाठी फारसे समाधानकारक असणार नाही. तेथे भावनिक
गुंतवणूक मानसिक त्रास देणारी ठरेल. पैसे वाचवण्याची सवय लावून घेणे
महत्वाचे आहे हे पटेल.

सिंह :–या सप्ताहात तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात मोठमोठे युक्तीवाद करायचे आहेत
त्याची तयारी केल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल. तुमच्या मनात असलेल्या
महिलांच्या सुंदरतेच्या कल्पना बदलण्याच्या प्रतिक्रियांना समोरून चांगली दाद
मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात तरूणांचा सन्मान होत असल्याचे अनुभवास येईल.
किरकोळ आजार समजून कोणत्याही दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. गायकांना,
संगीताच्या उपासकांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल व चांगली
प्रसिद्धीही मिळेल.

कन्या :–तुमच्या हातातील न होणार्‍या कामांना मित्रांच्या मदतीने मार्गी लावू
शकणार आहात. नोकरीतील रखडलेल्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला लांबचा किंवा
परदेशचा प्रवास करावा लागेल. वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचार्‍यांना समारंभातील
सन्मानाचा अनुभव मिळेल. महिलांना सेवाभावी कामाबद्दल प्रशस्तिपत्रक
मिळेल. आईवडिलांना लांबचा प्रवास करू देऊ नका. हा सप्ताह संकटात टाकणारा
आहे. 10 ची गणेश चतुर्थी पगारातील न मिळालेली बाकी मिळवून देईल.

तूळ :–हा सप्ताह तुमच्यासाठी फक्त आणि फक्त इच्छापूर्तीचा ठरणार आहे.
व्यवसायातील आजपर्यंत तुम्ही केलेल्या घडामोडी व त्यातून होणारे लाभ आश्चर्य
कारक राहतील. कुटुंबातील प्रत्येक घटक तुमच्या बरोबर असल्याचा अनुभव
येईल. आई वडील, सासु सासरे, वडील भावंड व मित्रमंडळ या सर्वांची एकसाथ

साथ मिळाल्यामुळे तुमचे मनोबल उंचावेल. फक्त न्यायालयातील कोणत्याही
कामात हाथ घालू नका. आर्थिक खर्च मात्र खूप होणार आहे.

वृश्र्चिक :–अध्यात्मिक अभ्यासकांना व उपासकांना मानसिक शक्ती वाढत
असल्याचे जाणवेल. मनाचा मोठेपणा न दाखवताही बर्‍याच गोष्टी तुम्ही करणार
आहात. पायाच्या जखमेकडे विशेष लक्ष द्या. सायटीकाचा त्रास असलेल्यांनी
दुर्लक्ष न करता डाँक्टरांच्या सल्ल्याचा आदर करावा. उंचावर राहणार्‍यांनी गच्ची
गँलरीमध्यें लहान मुलांना सांभाळावे. ज्येष्ठ संततीबाबत आनंदाच्या व
समाधानाच्या बातम्या कळतील. छानछोकीपेक्षा निरोगीपणा किती महत्वाचा
आहे ते पटेल.

धनु :–कोणाच्याही बाबतीतील वैयक्तिक गुप्त गोष्टींची चर्चा इतरांबरोबर
करण्याचा मोह होईल पण तसे करू नका. किर्तन, भजन व प्रवचन करणार्यांना श्री
गणेशाच्या कृपेने समाजाला उदबोधन करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी
यांचे सामाजिक विषयाच्या लेखनाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होईल. राजकीय
क्षेत्रातील मंडळीना मात्र मानसिक त्रास देणार्‍या घटनांपासून सावध रहावे
लागेल. विरोधकांच्या कोणत्याही प्रकारच्या टिकेला उत्तर देऊ नका. हा सप्ताह
मौन धारण करण्याचा आहे हे लक्षात ठेवा.

मकर :–तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यातील तुमचे आयडाँल कोण आहेत
ते नक्की ठरवा व मगच अनुकरण करा. तरूणांना हा सप्ताह गोंधळात पाडणारा
ठरेल. व्यवसायाची सुरू असलेली घोडदौड अशीच सुरू राहू दे त्यात कोणत्याही
प्रकारची ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. वारसा हक्काचे प्रश्र्न चर्चेने
सुटणारे आहेत तुमची आक्रमक भूमिका गुंतागुंत निर्माण करेल. व्यवसायातील
भागिदारी मतभिन्नतेमुळे वाद निर्माण करण्याची पण शक्यता आहे.

कुंभ :– न्यायालयीन कामातील तुमचे योगदान व काम महत्वाचे ठरणार आहे.
राजकीय मंडळीनी इतरांच्या भरवशांवर राहून कोणत्याही कामासाठी धावाधाव
करू नका. हा सप्ताह तुमच्या स्पर्धकांना विजयी करणारा असल्याने स्पर्धात्मक
क्षेत्रात उगाच धडपड करू नका. कुटुंबातील महत्वाच्या चर्चेमध्ये प्रत्येकाच्या
मताचा विचार करा. याच चर्चेमधून मार्ग सापडणार आहे. जून्या होऊन गेलेल्या
गोष्टींवर काथ्याकूट करू नका त्यातून कांहीच निष्पन्न होणार नाही. 10 ची श्री
गणेशचतुर्थी याोग्य मार्ग सुचवणारी ठरेल.

मीन :–पारंपरिक ज्योतिषशास्त्र शिकणार्या विद्यार्थ्यांना अचानक त्यातील तंत्र
कळू लागेल. बोद्धीक कस लावून मेहनत करणार्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन
अभ्यासास चांगली गती येईल. गूढ गोष्टी शोधून काढण्याची जबाबदारी
असलेल्यांनी फक्त इतरांचे ऐकून घ्यावे त्यांना हस्तक्षेप करू देऊ नका. पोलीस,
लाचलुचपत अधिकारी, भ्रष्टाचार विरोधी पथकात काम करणार्यांना महत्वाचा
सुगावा लागेल. 10 तारखेची श्री गणेश चतुर्थी तुम्हाला यशाच्या पायरीकडे
वाटचाल करण्यास मदत करणार आहे व मार्गातील बर्‍याच अडचणी दूर
करणार आहे.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *