Read in
शनिवार 04 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 04.सप्टेंबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 17:44 पर्यंत
व नंतर आश्लेषा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या
05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शनिप्रदोष, श्रावण महिन्यातील प्रदोष असल्याने श्री शिवउपासकांनी
आवर्जून उपासना करावी व दर्शन घ्यावे.
श्रावणातील शेवटचा शनिवार, अश्र्वत्थ मारूती पूजन.
मेष :–व्यवसायातील अडचणींवर उपायांचा विचार करताना नवीनच
लाभदायक फंडा सापडेल. पूर्ण विचाराने अंमलबजावणी करा. आईचा विचार
घ्या.
वृषभ :– सकाळपासूनच वेळ जरी लाभदायक नसला तरी महत्वाची कामे
करण्यास हरकत नाही. उधारीवर कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नका.
मिथुन :– लहान भावंडाच्या नादाने तुम्हालाही आर्थिक लाभ होतील.
महिलांना अचानक प्रसिद्धीची ओढ लागेल. तुमच्या मनातील विचार
इतरांना कळणार नाहीत याची दखल घ्या.
कर्क :–कालपासून ठरवलेल्या कामाला आज दुपारनंतर सुरूवात होईल.
संध्याकाळनंतर महत्वाचे कोणतेच काम करू नका. आज करायला
लागणार्या कष्टांना नाराजीचा सूर लावू नका.
सिंह :–परदेशी असलेल्या मित्रांकडून आनंदाची बातमी कळेल. वयस्कर
मंडळीना आपली औषधे व आजार यांवरच बोलायला आवडेल.इतर कशाचेच
महत्व वाटणार नाही.
कन्या :–मनातील मोठमोठ्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी
क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर बंधने येतील. आज
कोणासाठीही थांबू नका.
तूळ :– सुखाच्या व लाभाच्या विचारात बदल होईल. परगावी असलेल्या
वडीलांच्या प्रकृतीची केलेली विचारपूस महत्वाची ठरेल. बोलण्यातील
कठोरपणाला आज कमी करावे लागेल.
वृश्र्चिक :– घरातील महागड्या वस्तूंच्या खरेदीची हौस संपणार नाही.
अचानक खर्चाची कलमे काढल्याने पतीपत्नीमधे वाद निर्माण
होईल.कालच्या पेक्षा आजचा दिवस आनंदात जाईल.
धनु :–आईवडीलांसाठी त्याच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक
बाबतीत सर्वांबरोबर चोख रहा. आवडत्या कलेसाठी आज तुम्हाला वेळ देता
येणार आहे.
मकर :– डोकेदुखीचा त्रासावर आज कोणताही उपाय सापडणार नाही.
मायग्रेनचा त्रास असणार्यांना त्रासामागच्या कारणांचा विचार करावा
लागेल.
कुंभ :– गर्भवती महिलांनी आज जास्त शारिरीक दगदग करू नये.
कुटुंबातील प्रत्येकाला तुम्ही खुष ठेवू शकत नाही हे लक्षांत घ्या. हरवलेल्या
वस्तूंचा पत्ता लागेल.
मीन :– वयस्कर मंडळींच्या तळपायाची खूपच आग होईल. महिला व पुरूष
सर्वानाच आज कुटुंबातील आनंदाचा लाभ घेता येणार आहे. गोडधोड
भोजनाचा लाभ मिळेल.
| शुभं-भवतु ||