daily horoscope

शुक्रवार 03 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 03 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 03 सप्टेंबर चंद्ररास मिथुन 10:18 पर्यंत व नंतर कर्क.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र पुनर्वसु
16:40 पर्यंत व नंतर पुष्य. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या
पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.
जरा – जिवंतिका पूजन श्रावणातील शेवटचा शुक्रवार.
मेष :–इतरांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या कार्यात चांगले यश येत असल्याचे
जाणवेल. महत्वाच्या कामाची कागदपत्रे तयार करण्यासाठी तुम्हाला तज्ञांची
मदत घ्यावी लागेल.

वृषभ :–व्यावहारिक दृष्टीकोनातून विचार केल्यास आज तुमच्या आत्मविश्वासात
वाढ होईल. कोणतीही गोष्ट आज ताणू नका. त्याचे परिणाम त्रासदायक राहतील.

मिथुन :–तुम्हाला घेण्यापेक्षा नेहमीच देण्यात जास्त आनंद असतो त्याच वृत्तीचे
आज सर्वत्र कौतुक होईल. राजकीय मंडळीनी इतरांच्या भरवशावर राहून
कोणतेही काम करू नये.

कर्क :–आज प्रवासात फारच मनस्ताप होणार आहे, तरी शक्यतो प्रवास टाळा.
हातातील जबाबदारी आ प्रथम महत्व द्या. पगारातील मोठी रक्कम मित्राच्या
घरगुती गरजेसाठी द्यावी लागेल.

सिंह :–आज घडणार्‍या घटनेकडे त्रयस्थ नजरेने पाहिल्यास आपण काय करावे
याचा उलगडा होईल. मनावर कोणतेही दडपण येऊ देऊ नका.

कन्या :–मनातील अहंपणाला दूर केल्यास दूर गेलेली माणसे परत येतील.
विद्यार्थ्यांनी इतरांची बरोबरी करण्यापेक्षा स्वत:च्या क्षमता तपासाव्यात.

तूळ :– नव्याने झालेल्या ओळखीवर विश्र्वास ठेवू नका. तुमच्यावर असलेली
जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडाल व त्याचे क्रेडीटही घ्याल.

वृश्र्चिक :– नवीन घरात जाण्यापूर्वी षतेथील संपूर्ण माहिती जाणून घ्या. नवीन
परिचयातून नुकसान संभवते. खोट्या मोठेपणाला भुलून जाऊ नका.

धनु :– लहान मुलांच्या क्षमतेचा विचार करूनच त्यांच्याकडून अपेक्षा करा.
कुटुंबातील मोठे प्रश्र्न एकट्याने सोडवण्यापेक्षा ज्येष्ठांची मदत घ्या.

मकर :–आज मन अगदी शांत ठेवल्यास तुम्हाला व्यक्तीश: कोणताच त्रास होणार
नाही. कोणत्याही कामात स्वत:च्या विचारानेच निर्णय घ्या.

कुंभ :–बोलताना, मत प्रदर्शित करताना आज अतिशय सांभाळून व्यक्त व्हा. जूने
वाद गोड बोलून व समजूतदारपणाने मिटवता येणार आहेत तरी तसा प्रयत्न करा.

मीन :–सत्ता मिळवण्यासाठी खोट्याची साथ देऊ नका. अनुभव हाच उत्तम गुरू
आहे हे विसरू नका. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा मान ठेवा.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *