Read in
गुरूवार 02 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 02 सप्टेंबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 14:55 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–दुसर्यांवर सोपवलेल्या कामाचा आढावा घ्यावा लागेल. ठरलेल्या विवाहाच्या बाबतीतील बोलणी सकारात्मकतेने पुढे सुरू ठेवावी लागतील.
वृषभ :–जोडीदाराबरोबरचे संबंध हसते खेळते ठेवल्यास मनावरील ताण कमी होईल. व्यवसायातील कामकाजात गांभिर्याने लक्ष घालावे लागेल.
मिथुन :–मिळालेल्या परदेश गमनाच्या संधीबाबतचा गांभिर्याने विचार करा. भावनेच्या भरात काम करण्यापेक्षा वस्तुस्थितीला महत्व द्यावे लागेल.
कर्क :– भावंडाकडून मिळणार्या सहकार्यामुळे कामातील अडचणी दूर होतील. व्यावसायिक बोलणी करताना नात्यातील ज्येष्ठांची मदत घ्या.
सिंह :–संसर्गजन्य आजारापासून आज तुम्हाला अतिशय सावध रहावे लागेल. विरोधकांच्या विरोधाला फारसे महत्व न देता तुम्ही तुमचे काम तसेच सुरू ठेवा.
कन्या :– वेळीअवेळी जेवण्याने पचनाबाबत तक्रारी सुरू होतील. वयस्कर मंडळीनी आपली तब्बेत सांभाळूनच पाहुणचार घ्यावा. मुलांचा अतिशय आनंदाचा व लाभाचा दिवस आहे.
तूळ :–आर्थिक व्यवहारात बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास व्यवहार बिघडणार नाही. कलाकारांना व शिकाऊ विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी गुरूजनांची सहकार्य मिळेल.
वृश्र्चिक :–पूर्वी डोक्याला मार लागलेल्या ठिकाणी पुन: वेदना होत असल्याचे जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या बाबतीत विचार न करता कामासाठी घाई करू नका.
धनु :–आईच्या माहेरहून आर्थिक लाभ होईल. अध्यात्मिक उपासकांनी आपल्या ऊपासनेच्या मार्गात अडथळे येणार्या गोष्टी येऊ देऊ नयेत आपल्या विचारांशी ठाम रहावे.
मकर :–कुटुंबातील प्रश्र्नांना प्राधान्य देऊन मग इतर गोष्टी करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका किंवा वादही निर्माण करू नका.
कुंभ :–मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत विचारात घ्या.
मीन :–गुंतवणूक करताना इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वत: विचार करा. नातेवाईकांच्या गरजेसाठी खंबीरपणाने ऊभे रहावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
| शुभं-भवतु ||