Read in
बुधवार 01 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 01 सप्टेंबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 12:33 पर्यंत व नंतर आर्द्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– व्यवसायातील नवीन वाटचालीचा अंदाज येईल. एकाच वेळी अनेक प्रकल्पाच्या मागे लागू नका. कोणतीही वस्तू खरेदी करताना गरजेचा अंदाज घ्यावा लागेल.
वृषभ :– व्यवसायातील उत्पादनावर विचार कराल व प्रसंगी धाडसही कराल नोकरीत वरिष्ठांबरोबरचे वाद कमी होऊ लागल्याचे जाणवेल.
मिथुन. :–हातातील काम करताना वेळ कमी पडणार आहे तरी योग्य ते नियोजन करा. खरेदी करताना वस्तूची प्रत व किंमत पडताळून पहावी लागेल.
कर्क :– आई व मुलगी यांच्यामधे वैचारिक वाद निर्माण होऊन खटाखटी होईल. सरकारी क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल.
सिंह :– आजचा दिवस अतिशय आरामात व चैनीत जाईल. तरूणांनी आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्यास आवश्यक ती अपेक्षा पूर्ण होईल.
कन्या :–फाईल मधील कामापेक्षा हातातील कामाला महत्व द्या. मनातील अनुत्तरीत प्रश्न विचारानेच सोडवावे लागतील किंवा ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल.
तूळ :–आज मनावर असलेले कामाचे ओझे आपोआप कमी होईल. संध्याकाळच्या होणार्या मिटींगची तयारी जोमाने करावी लागणार आहे.
वृश्र्चिक :–आज फक्त आजच्या दिवसाबाबतचाच विचार करा. खूप सारा विचार एकाच वेळी करण्याने सर्वच कामात गोंधळ कराल.
धनु :– तरूणांना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त भार व जबाबदारी घ्यावीशी वाटेल. आई वडीलांची केलेल्या उत्तम सेवेमुळे सर्वांकडून कौतुकाचा विषय होईल.
मकर :– पाण्यात राहून माशाबरोबर वैर करता येत नाही हेलक्षात घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना सामाजिक स्तरावर फार मोठा सन्मान होईल.
कुंभ :– लहान बाळाच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत तुमच्यावर वरीष्ठांकडून नवीन जबाबदारी सोपवली जाईल तरी मनाची तयारी ठेवा.
मीन :– आज येणारा महत्वाचा निरोप प्राँपर व्यक्तीकडून न येता तिसर्याच कडून येईल तरी त्यावर विश्र्वास ठेवू नका. विश्र्वासाच्या व्यक्तीकडून फसवणूक होत असल्याचे लक्षांत येईल.
| शुभं-भवतु ||