daily horoscope

मंगळवार  31 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार  31 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 31 आँगस्ट चंद्ररास वृषभ  23 :10 पर्यंत व नंतर मिथुन.

नंतर रोहिणी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र रोहिणी 09:43 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मंगळागौर व्रत. 

 श्री कृष्ण जन्माचा गोपाळकाला.

मेष :–व्यावहारिक बाबतीत स्वत:चे निर्णय स्वत:च घ्या. इतरांचे फक्त मत जाणून घ्या. प्रकृतीला जपावे लागेल. मित्रपरिवाराबरोबर आजचा दिवस आनंदात पण खर्च करणारा जाईल. 

वृषभ :–आज नोकरीतील ताणतणाव कांही  प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामाबाबतचे धाडस अचानक वाढल्याचे जाणवेल. काळजी कमी करणार्या घटना घडतील. 

मिथुन :–खाण्याबाबतची पथ्ये योग्य प्रकारे न पाळल्याने प्रकृतीचा त्रास जाणवेल. कुटुंबात जोडीदाराच्या हट्टी स्वभावासमोर तुमचे कांहीच चालणार नाही. 

कर्क :–कलाक्षेत्रातील कलाकारांना नवीन कामाच्या बाबतीत विचारणा येतील.वयस्कर मंडळीना  प्रकृती अस्वास्थ्यामूळे डाँक्टरना भेटावे लागेल.  कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंह :–सामाजिक कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे लागू नये. राजकीय मंडळीना आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाचेही  गैरसमज होऊ देऊ नका. 

कन्या :–व्यावसायिक क्षेत्रात अचानक चांगले दिवस येत असल्याचे जाणवेल. जोडीदाराबरोबर बोलताना संयमाने बोलावे लागेल नाहीतर वाद वाढतील. 

तूळ :–नोकरदारांना आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय  काम करता येणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा अतिशय कंटाळा येईल. 

वृश्र्चिक :–सामाजिक क्षेत्रातील तुमच्यावर टाकलेल्या जबाबदारीस तुमच्याकडून योग्य दाद न मिळाल्याने वरीष्ठ नाराज होतील. महिलांना  स्वत:च्या मानसिक स्वास्थ्याचा स्वत:हून विचार करावा लागेल.

धनु :–वरिष्ठांबरोबर बोलताना भान ठेवून बोलावे लागेल. कुटुंबातील धार्मिक समारंभातील तुमचा सहभाग सर्वांना आनंद देईल. तुम्हाला मानसिक मनोबल वाढल्याचे जाणवेल. 

मकर :–तुमच्या रखडलेल्या कामांना जेष्ठांच्या सल्ल्याने कामांना योग्य मार्ग सापडणार आहे. जून्या होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा.  आर्थिक बाबतीत सर्वांबरोबर चोख रहा.

कुंभ :–प्रत्येक काम धीराने केल्यास  काम व्यवस्थित होणार आहे याची खात्री बाळगा. मनाला समाधान वाटणार्‍या घटना घडतील. उच्चशिक्षित मंडळीना नवीन नोकरीच्या संधी कळतील.

मीन :–सार्वजनीक  क्षेत्रातील कामात आज तुम्हाला अजिबात उत्साह वाटणार नाही. शिक्षक मंडळीनी कामाचा बोजा न वाढवता कसे काम करता येईल ते पहावे. 

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *