Read in
सोमवार 30 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 30 आँगस्ट 2021 चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 06:38 पर्यंत व
नंतर रोहिणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या
कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
श्रावण कृष्ण अष्टमी (उपवास) श्रीकृष्ष्ण जयंती.
मेष :– अचानक दुसर्यांकडून येणारे पैसे हातात येतील. घराची, बांधकामाची थटलेली
कामे मार्गी लावू शकाल. संततीच्या व्यवसायात आज तुमच्या मार्गदर्शनाची गरज
भासेल.
वृषभ :–आईचा समाजात होणारा सन्मान पाहून मनापासून आनंद वाटेल. व्यवसायात
भागिदारांबरोबरचे तुमचे अंदाज आज अगदी अचूक निघतील.
मिथुन :–आजचा दिवस तुम्हाला अतिशय दगदगीचा व त्रासाचा जाईल. कोणत्याही
नवीन कामाना सुरूवात करू नका. रोजचीच कामे सुद्धा तुम्हाला अवघड वाटणार
आहेत.
कर्क :–लहान भावंडाच्या व्यवसायातील आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी ठराविक रक्कम
द्यावी लागेल. मित्रांच्या मदतीने बांधकामाचा नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल.
सिंह :–नोकरीत शासकीय कागदपत्रांवर सह्या घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार
आहे. नगरसेवक मंडळीना अचानक नवीन कामाची जबाबदारी सोपवण्यात येईल.
कन्या :–कोर्टकेसच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागू नका. अध्यात्मिक उपासना
करणार्यांना अचानक एखादे काम सहजपणे होत असल्याचे जाणवेल. आवडीच्या
मित्राची भेट होईल.
तूळ:– जोडीदाराला आज अचानक धनलाभ होणार आहे व त्याचा तुम्हाला फायदा होईल.
दत्तक संततीकडून आनंदाची बातमी कळेल. जास्त खाण्यामुळे अपचनाचा त्रास होईल.
वृश्र्चिक :–भविष्य निर्वाह निधीची रक्कम लवकरच मिळणार असल्याचा निरोप येईल.
आजारी व्यक्तींना मेडिक्लेमचे, विम्याचे पैसे मिळतील. राजकीय व्यक्तींना
गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो.
धनु :–आईच्या माहेरील नात्याचे अचानक घरी येणे होईल. लहान भावंडांसाठी त्याच्या
आवडीची मोठी खरेदी कराल. पतीपत्नीच्या वादविवादात दोघानाही मनस्ताप होणार
नाही याची काळजी घ्या.
मकर :–आज तुमच्या प्रकृतीची कोणतीच काळजी उरणार नाही. दवाखान्यात अँडमिट
असलेल्यानाही आज घरी सोडणार असल्याचे कळेल. पैसे जपून खर्च करावे लागतील.
कुंभ :–लहान मुलांना खेळतांना दिवाणखान्यातील वस्तू लागण्याचा मोठा धोका आहे. .
वयस्कर मंडळीनी ओल्या फरशीवरून चालताना काळजीपूर्वक चालावे.
मीन :–व्यवसायाच्या कामासाठी आजवर प्रतिक्षेत असलेली कागदपत्रे ताब्यात येथील.
घरगुती उद्योगाची गणिते ज्येष्ठांकडून समजून घ्या. शैक्षणिक कामात तुम्हाला
इतरांना मोठी मदत करावी लागेल.
| शुभं-भवतु ||