weekly-horoscope-2020

रविवार 29 आँगस्ट 2021 ते शनिवार 04 सप्टेंबर पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार  29 आँगस्ट 2021 ते शनिवार 04 सप्टेंबर पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

 

weekly-horoscope-2020

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

रविवार 29 आँगस्ट चंद्ररास मेष 10:18 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका अहोरात्र. सोमवार 30 आँगस्ट चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 06:38 पर्यंत व नंतर रोहिणी. मंगळवार 31 आँगस्ट चंद्ररास वृषभ 23:10 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 09:43 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. बुधवार 01 सप्टेंबर  चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 12:33 पर्यंत व नंतर आर्द्रा. गुरूवार 02 सप्टेंबर  चंद्ररास मिथुन दिवसरात्र व नंतरही दुसर्या दिवशी मिथुनच आहे. शुक्रवार 03 सप्टेंबर चंद्ररास मिथुन 10:18 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 16:40 पर्यंत व नंतर पुष्य. शनिवार 04 सप्टेंबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 17:44 पर्यंत व नंतर आश्लेषा.वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

रविवार  भानुसप्तमी सूर्यदेवाचे पूजन

सोमवार श्रीकृष्णजयंती ( उपवासाचा दिवस आहे.)

 मंगळवार मंगळागौरीचे व्रत. 

शुक्रवार अजा एकादशी, जरा – जिवंतिका  पूजन. 

शनिवार शनिप्रदोष, अश्र्वत्थ मारूती पूजन. 

मेष :–या सप्ताहात संवाद साधण्याची एकही संधी सोडू नका. समुपदेशनाच्या कार्यात अतिशय वाखाणण्याजोगे काम कराल. घरातील नात्यात एकमेकांमधील गैरसमजाचे वारे तुम्हाला या सप्ताहात संपवता  येणार आहे. ज्यांना मोतिबिंदुचा त्रास आहे त्यांनी  वेळेवर इलाज करून घ्यावेत. अचानक श्री गणेशाच्या निमीत्ताने  महिला सोन्याचा दागिना खरेदी करण्याची हौस भागवतील. संततीच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत कराल. 

वृषभ :–वडिलांना नोकरीतून मिळणारे  पण सध्या थांबलेले भत्ते  आता लवकरच  मिळणार  आहेत असे  कळेल.  पुरूषांनी आपल्या उजव्या डोळ्याची तपासणी करून घ्यावी. व्यवसायासाठी काढत असलेल्या कर्जाला शेजारी किंवा  मामेभाऊ  जामिन राहण्याचे मान्य करेल. पैसे ठेवलेली पिशवी किंवा पर्स  सापडणार नाही. चँनलचे वृत्तनिवेदक, पेपरचे बातमीदार यांच्या कामाचे कौतुक होईल पण त्याचबरोबर कामाचा ताणही जाणवेल. 

मिथुन :–नोकरी बदलाचे वारे तुम्हाला  लाभदायक ठरतील. अविवाहितानी सकारात्मक विचार केल्यास  विवाहाबाबतचा मार्ग पुढे सरकेल. शिक्षणात मिळालेल्या चांगल्या यशामुळे पुन: आशा पल्लवित होतील  व पुढे शिकावेसे वाटेल. तळघराविषयी गूढ वाढल्याने मुलांचे कुतूहल जागे होईल. दिवाळखोरीत निघालेल्या व्यवसायाला प्राँ. फंडाची मदत मिळेल. तरी हताश होऊ नका. 

कर्क :–नव्याने व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्यांनी प्रथम आपल्या क्षमता चा अंदाज घ्यावा. हा सप्ताह व्यवसायाचा विचार करण्यास अतिशय लाभदायक आहे. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन कामाला लागा. महिलांनाही नवीन उत्पन्नाचा स्त्रोत सापडेल. या सप्ताहात नातेवाईक, शेजारी, मित्र, नात्यातील भावंडे सर्वांचीच मदत होणार आहे. गुप्त गोष्टींबाबत कोणासमोरही वाच्यता करू नका. 

सिंह :–कोणत्याही कामाचा बोजा स्विकारताना परमेश्र्वर पाठिशी असल्याची भावना राहणार आहे. महिला सुद्धा आत्मविश्वासाने शिवधनुष्य पेलतील. वृद्धांना खोकला व कफाचा त्रास जाणवेल. पूजा प्रार्थना करणार्‍यांचे मनोबल उंचावेल व एखादे धाडसी काम करून दाखवतील. राजकीय मंडळी शत्रूवर मात करतीलच पण संकटावर ही मात करतील. फक्त बांधकामाचे कोणतेही काम काढू नका. 

कन्या :–तीक्ष्ण हत्यारांचा वापर करणार्‍यांनी त्याचा वापर खूपच जपून व काळजीपूर्वक करावा. औषधाच्या कंपनीत काम करणार्या कर्मचार्‍यांनी  सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत. जन्म-मृत्यु नोंदणी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी कोणत्याही नोंदी व काम नियमबाह्य होत नसल्याची खातरजमा करावी. स्वेच्छानिवृत्ती घ्यावयाची असल्यास या सप्ताहात विचार करायला हरकत नाही. ईश्र्वरभक्ती करणार्यांना काही सूचक स्वप्नांचा, सूचनांचा अर्थ लावावा लागेल. 

तूळ :–हा सप्ताह पूर्णपणे तुम्ही तुमच्या व्यवसायिक कामाकरता दिल्यास खूपच प्रश्र्न हाताळू  शकाल. फक्त 30  व 31 रोजी कोणतीही अँग्रीमेंटस् करू नका. तसेच कोणतेही  तेरी करार मोडायचे असतील तर फक्त याच दोन दिवशी काम करा. सरकारी कामे करून घेण्यासाठी कोणताही आर्थिक व्यवहार याच दोन दिवसात  करू नका. शिळे किंवा उघड्यावरचे  पदार्थ खाऊ नका. फुडपाँयझनिंगचा धोका आहे. 

वृश्र्चिक :– अचानक अनोळख्या  व्यक्तीची मदत होईल. नोकरी सोडावी हा विचार करणे हा तुमच्या  मनाचा खेळ आहे हे लक्षात घ्या. कोर्टकेसमधील न्यायनिवाडा होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. महिलांना मासिक पाळीचा त्रास सुरू होईल. या सप्ताहात प्रसुतीच्या जवळ आलेल्यांना 1 व 2  सप्टेंबर रोजी त्रास होईल. प्रवासी संस्थेत काम करणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी व रोखीने व्यवहार करू नयेत. 

धनु :–परदेशी जाण्याचे शंभर टक्के नक्की होऊनही अडथळा निर्माण  होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून ज्येष्ठांचा सल्ला मान्य करावा. व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी भागिदार, कौटुंबिक जोडीदार व ज्येष्ठ तज्ञ यांना विचारल्या शिवाय कांहीही करू नये. न्यायालयात नोकरी करत असाल तर मार्गदर्शक तत्वे पाळावी. आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्येष्ठ गुरूंचे मार्गदर्शन  मिळेल. 

मकर :–अध्यात्मिक उपासकांना गूढ गोष्टींची चाहूल लागेल. श्री दत्तमहाराजांच्या उपासकांनी आपले नित्यकर्म  व्यवस्थितपणे पार पाडावे. पिण्याच्या पाण्याची स्वच्छता न पाळल्याने लहान मुलांना  व मोठ्यांनाही लूझ मोशनचा त्रास होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी राखण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात वैचारिक मतभेद टोकाला जाऊन वाद वाढेल.नोकरीतील तुमच्या प्रामाणिकपणाचा  गौरव होऊन तुमचा गौरव वाढेल. 1 व 2 रोजी एखादी शुभवार्ता कानावर येईल. 

कुंभ :–नवीन बुक केलेल्या घराचा ताबा मिळेल त्यासाठी नवीन घरी रहायला जाण्याची तयारी कराल. प्रसिद्धी माध्यमे, जाहिरात कंपन्या यांच्यामार्फत तुमच्या व्यवसायात अचानक चांगली वाढ होईल. मोबाईल रिपेअरींगच्या व्यावसायिकांना भरपूर कामे मिळतील व आर्थिक प्राप्ती चांगली होईल. पोटाच्या विकाराची शक्यता वाढून डाँक्टरांकडे जावे लागेल. वयस्कर मंडळींच्या श्रवणयंत्रात बिघाड निर्माण होईल. 

मीन :–व्यवसायात तुम्ही पूर्वी केलेल्या नियोजनाचा लाभ आत्ता होऊ लागल्याचे दिसेल. उच्चशिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यांची सर्व कामे सुरळीत होत असल्याचे जाणवेल. लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्याचे लक्षांत येईल. विवाहिताना जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्याने मनातील अपेक्षांवर काम करण्याचा उत्साह वाढेल. संततीकडून तुम्हाला पाहिजे असणारे  लाभ मिळून मानसिक समाधान मिळेल. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *