Read in
रविवार 22 आँगस्ट 2021 ते शनिवार 28 आँगस्ट 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी
भविष्य.
रविवार 22 आँगस्ट चंद्ररास मकर 07:56 पर्यंत व नंतर कुंभ.
चंद्रनक्षत्र धनिष्ठा 19 :39
पर्यंत व नंतर शततारका. सोमवार 23 आँगस्ट चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र
शततारका 19:25 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. मंगळवार 24 आँगस्ट चंद्ररास कुंभ
13:37 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 19:46 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
बुधवार 25 ऑगस्ट चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 20:47 पर्यंत व
नंतर रेवती. गुरूवार 26 ऑगस्ट चंद्ररास मीन 22:28 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र
रेवती 22:28 पर्यंत व नंतर अश्र्विनी. शुक्रवार 27 ऑगस्ट चंद्ररास मेष दिवसरात्र व
चंद्रनक्षत्र अश्र्विनी 24:46 पर्यंत व नंतर भरणी. शनिवार 28 आँगस्ट चंद्ररास मेष
10:18 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 27:33 पर्यंत व नंतर कृतिका.वरील प्रमाणे
प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या
कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 22 नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन..
सोमवार 23 श्रावणी सोमवार व शिवामूठ मूग आहे.
मंगळवार 24 मंगळागौर पूजन.
बुधवार 25 संकष्ट चतुर्थी.
गुरूवार 26 बुद्धाचा कन्या राशीत प्रवेश 11:18 वाजता.
शुक्रवार 27 जरा-जिवंतिका पूजन.
शनिवार 28 अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस.
मेष :–मित्रमैत्रिणींच्या मदतीने व सल्ल्याने सद्ध परिस्थितीवर मात कराल. या
सप्ताहात फक्त 25 व 26 तारीख सोडून बाकिचे सर्वच दिवस लाभदायक आहेत. कुटुंबात
एखादा सण समारंभ साजरा होईल. तुम्हाला स्वत :ला प्रत्येक कार्यात सहभाग घ्यावा
लागेल. सर्वांना समजून घेताना तुमची दमछाक होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला
हात मोकळा सोडावा लागेल म्हणजे तुम्ही पण आपणहून सोडालच. पतीपत्नीमधील
संघर्ष विकोपाला जाऊ देऊ नका.
वृषभ :– 27 व 28 या दोन्ही तारखांना संघर्ष होण्याचे धोके आहेत तसेच या दोन
दिवसात गुंतवणूकही करू नका. बर्याच दिवसापासून हरवलेली वस्तू अचानक
सापडणार आहे. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना 25, 26 तारखेला घरी सोडण्याचा
निर्णय कळेल. वयस्कर मंडळींच्या कमी ऐकू येण्याबाबतच्या तक्रारीची दखल घ्या.
व्यवसायातील कामाच्या जबाबदारीत फारच वाढ होईल. तर नोकरीत तुमच्या बाजूने
प्रमोशनचे वारे वाहतील.
मिथुन :- तुमच्यातील श्रद्धाळूपणात वाढ होऊन परमोश्र्वरावरील श्रद्धा वाढेल.
व्यवसायात ज्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होणार आहे त्याच प्रमाणात खर्चही करावा
लागणार आहे. आत्मविश्वासात वाढ होऊन कामातील धाडसीपणा वाढेल. तरूणांना
आपल्या व्यक्तिमत्त्वातील आवश्यक तो बदल करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या
सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी या सप्ताहात इतरांच्या
सल्ल्याने वागू नका.
कर्क :–23 व 24 या दोन तारखांना कौटुंबिक जिवनात चुकीचे निर्णय घेतले जातील.
आर्थिक नुकसान होऊन आरोग्याची तक्रारही जाणवेल. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष
केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. तज्ञांच्या सल्ल्याने केलेला विचार चांगली
नोकरीत उन्नती करणारा ठरेल. अचानक एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात
अडकवण्याचा धोका आहे. तरी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नका.
सिंह :–25 व 26 हे दोन दिवसाव्यतिरीक्त तुम्हाला हा सप्ताह एकदम दणदणीत यशाचा
जाणार आहे. नोकरीतील कामाच्या ताणतणावाला अती महत्व देऊ नका तरच
कुटुंबाबरोबर आनंदात रहाल. नोकरीत ज्यांना अधिकारपदाचा इच्छा आहे त्याना
अधिकारपद देण्यात येणार आहे. जबाबदारीच्या कामातून मुक्त होतांना हातात खू मोठे
यश मिळाल्याची पावतीही मिळेल. गुरूमाऊलीची कडून दिक्षा घेतलेल्यांना प्रत्येक
कार्यात गुरूमाऊलीचा आशिर्वाद लाभेल.
कन्या :–27 व 28 या दोन्ही दिवशी तुम्हाला कोणतेच निर्णय घेण्याचे सुचणार नाही.
मानसिक चलबिचलता वाढेल. आजारी उद्योगांना सरकारकडून मिळणार्या
मदतीसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सहजपणे मिळणार नाही. कामातील
अडचणींमुळे कितीही थकलात तरी आतंरिक शक्तीने काम कराल. घरातील नात्यात
आनंददाचे वातावरण निव्वळ तुमच्यामुळेच तयार होईल. कुटुंबात जोडीदाराबरोबर
मोकळेपणाने प्रेमाचा संवाद घडेल.
तूळ :–27 व 28 रोजी पतीपत्नी दोघांनाही एकमेकांचा प्रेमळ सहवास मिळेल. महिलांना
बर्याच दिवसापासूनच्या बंद विचारांना वाट मोकळी करता येणार आहे. सर्वप्रथम
संततीच्या मदतीने कौटुंबिक समारंभाचा आनंद लुटाल. तुम्हा सर्वानाच आपल्या
आवडत्या छंदाला वेळ देता येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कलेचे ही सादरीकरण
करता येणार आहे. घरगुती उद्ध्योग असलेल्यांना अचानक मोठ्या आँर्डर्स मिळतील.
वृश्र्चिक :–27.व 28 ला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही तक्रारीला लहान
समजू नका. कुटुंबात मुलांमुळे वातावरण आनंदी राहणार आहे. लहानग्यांची बडबड
घरात चैतन्य निर्माण करेल. आजी नातवाचा खेळ हा कौतुकाचा विषय होईल.
विद्यार्थ्यांनी नव्याने अभ्यासाला सुरूवात करताना आता मार्गदर्शक शिक्षकांची सोय
करावी.उच्च शिक्षण घेणार्यांना नक्की कसा अभ्यास करायचा याचे तंत्र समजून घ्यावे
लागेल. वयस्करांना आपला गुडघा दुखत असल्याचे कळेल.
धनु :– नवीन घर घेण्याच्या तयारीत असलेल्यांना घराजवळ बाग असलेले घर जास्त
आवडेल. कोकणातील जून्या घराचा व वाडीचा ठरलेला व्यवहार अचानक रद्ध
होईल.लहान मुलांच्या समोर कुटुंबातील अंतर्गत गोष्टींची चर्चा करू नका. 27 किंवा 28
ला लहानमुले तुम्हाला तोंडघशी पाडतील. संततीच्या प्रगतीमुळे कुटुंबात सर्वानाच
समाधान वाटेल. तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. अफवांवर विश्र्वास
ठेवू नका.
मकर:–ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे किंवा एखादे क्राँनिक दुखणे असेल तर याचा पुन:
त्रास सुरू होईल. सरकारी कागदपत्रांची फाईल सापडणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठांच्या
सल्ल्यानेच महत्वाची खरेदी करावी. मागिल महिन्यापासून नोकरीतील सतावणारा
प्रश्र्न सहजगत्या मार्गी लागत असल्याचे जाणवेल. कोणत्याही चैनिच्या वस्तूंची खरेदी
करताना वस्तूची प्रत पडताळून पहा.
कुंभ :–हा सप्ताह तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा ठरेल. लहान मुलांच्या
हातातील टोकदार खेळण्याकडे विशेष लक्ष द्या. लहान मुलांना कोणत्या तरी कारणामुळे
दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. तुमच्या घरात विवाहाची बोलणी चांगली
लाभदायक होतील. लहानमुलांना खोट्या कौतुकाची सवय लागल्याचे लक्षांत येईल.
नोकरदार वर्गास अचानक स्थलांतर करावे लागेल.
मीन :–नोकरीच्या ठिकाणी वादविवादातून फार मनस्ताप होईल. कलावंताना हा सप्ताह
तुमच्या मनासारखा आनंद देणारा राहील. न्यायालयातील कामात निष्कारण कलह
निर्माण होईल. सततच्या आँनलाईन कामामुळे तरूण वर्गास डोकेदुखीचा त्रास होऊ
लागेल. बर्याच दिवसापासून पगारातील साठवलेले पैसे मित्रांच्या गरजेसाठी द्यावे
लागतील. संततिची प्रगती पाहून तुमच्या मनाला अतिशय आनंद होणार आहे.
||शुभं-भवतु ||