Read in
गुरूवार 19 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 19 आँगस्ट चंद्ररास धनु 28:21 पर्यंत व नंतर मकर.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 22:41 पर्यंत व नंतर
उत्तराषाढा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजच्या दैनंदिन कामे मार्गी लागणार असल्याने यातूनच कांही प्रमाणात व्यवसायाचा विचार
येतील. सध्या तुम्ही ज्या गोष्टीची चिंता करत आहात त्यातून सहीसलामत बाहेर पडण्या करीता
खूपच चांगला दिवस आहे. तरी जे करता येतील ते प्रयत्न करा.
वृषभ :–अचानक होणार्या धनलाभाची सूचना मिळेल. घरगुती उद्धोगातून मोठ्या कामाबाबतचा आज
बोलणी होतील. लहान मुलांना लूझ मोशनचा त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना
इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल.
मिथुन :–तुमच्या पेक्षा अतिशय मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर मैत्री होईल. प्राँपर्टीबाबतचे कांही
प्रश्र्न घरातील ज्येष्ठांकडून चर्चेला येथील व तुमच्या मनात नसतानाही तुम्हाला त्यात सहभाग घ्यावा
लागेल.
कर्क :–तुमच्या मनात संततीकडून ज्या अपेक्षा आहेत त्याच दिशाने संतती प्रयत्न करत असल्याचे
जाणवेल. तुमच्या स्वत:च्या मनातील योजनांना अचानक मार्ग सापडेल.
सिंह :–नोकरीतील अडचणी किंवा होत असलेला मनस्ताप कमी होत असल्याचे जाणवेल. आज
सहकार्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल.
कन्या :–आज गुंतवणूक करण्याचे विचार पुन: पुन: उफाळून येतील. मित्रमंडळींची प्रत्येक कामात
आज आवश्यक तेवढी मदत मिळणार आहे. खिशातील पैशांना अचानक पाय फुटतील.
तूळ :–तुमच्या ध्यानीमनी नसतानाही अचानक एखादी गुप्त घटना तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल.
आज तुमचा पैसा वेळही वाया जाणार आहे. महत्वाचे कोणतेच काम हातात घेऊ नका.
वृश्र्चिक :–दत्त संप्रदायातील उपासकांना गुरूकृपेचा अनुभव येईल. अशक्तपणा असलेल्यांना बर्याच
प्रमाणात फरक पडत असल्याचे जाणवेल. कुटुंबात लहान भावंडाकडून महत्वाच्या कामात मदत होईल.
धनु :–आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. मनासारख्या घटना घडतील. तसेच
आज तुम्हाला खूप बोलायला मिळणार आहे.
मकर :–कोणत्याही महत्वाच्या कामाला आज सुरूवात करू नका. कुटुंबातील महत्वाच्या प्रश्र्नाच्या
चर्चेसाठी आजचा दिवस थांबा. चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही.
कुंभ :–आज दिवसात एखादी अविस्मरणीय घटना घडेल. लहानशा गोष्टीवरून बर्याच गोष्टींची
कल्पना येईल. मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल व वातावरण आनंददायक राहील.
मीन :–कितीही टाळायचे ठरवले तरीही आज तुमच्या हातून खूपच खर्च होणार आहे. महिलांना
मनातील चिंता व्यक्त करावी असे वाटेल. सुगंधी वस्तूंच्या खरेदीचा आनंद घ्याल.
| शुभं-भवतु ||