daily horoscope

बुधवार 18 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

ुधवार 18 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

धवार 18 आँगस्ट चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 24:06 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आज कुटुंबाबाहेरील ज्येष्ठ व्यक्तीकडून श्रावण महिन्याबाबतच्या धार्मिक गोष्टी कळतील. अध्यात्मिक उपासकांना फार महत्वाची दिशा सापडेल.

 

वृषभ :–पोलिस, होमगार्ड तसेच गुप्तसंस्थेतील कर्मचार्‍यांना त्यांच्या अधिकारात अडचणी निर्माण होतील. पतीपत्नीच्या आर्थिक व्यवहारात  काहीतरी गोंधळ निर्माण झाल्याचे जाणवेल.

 

मिथुन :–नुकत्याच हरवसेस्या किंवा सापडत नसलेल्या वस्तूचा शोध लागेल. लहान मुलांच्या  व मधुमेहीनी पायाला झालेली जखम चिघळेल.

 

कर्क :–साठवलेल्या पैशाचा अपव्यय होणार नाही इकडे लक्ष द्या. नव्याने वस्तू घेताना त्याची किती गरज आहे ते पुन: पुन: तपासून बघा.

 

सिंह :–अध्यात्मिक उपासकांना श्री गुरूमाऊलीकडून उपदेश मिळेल व अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला जाईल. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्याची प्रचंड ओढ निर्माण होईल.

 

कन्या :–अती बोलण्यामुळे संकटात याल. मेडीकल क्षेत्रात काम करणार्यांना अचानक पगारापेक्षा वाढीव रक्कम मिळणार असल्याचे कळेल.

 

तूळ :–अचानक करावा लागणारा आजचा प्रवास त्रासदायक ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी व मित्रमंडळीतही वातावरण गरम राहील व तुम्ही दोषी ठराल.

 

वृश्र्चिक :–आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबरचे बोलण्यापूर्वी वातावरणाचा अभ्यास करा. तुमची बाजू तुमच्यावरच उलटण्याची धोका आहे.

 

धनु :– आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला लाभदायक असल्याने आवडते काम करायला घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पदावर नेमणूक केली जाणार असल्याचे कळेल.

 

मकर :–परदेशी शिक्षणास जाऊ इच्छिणार्यांना  नवीन संधी प्राप्त होतील. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही करू नका. दुसर्यांच्या  कोणत्याही प्रकरणांत मद्ध्यस्थी करू नका.

 

कुंभ :–कोणत्याही विषयावरील चर्चा फारलांबवू नका विरोधक त्याचा फायदा घेतील. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आज नुकसान करणारी ठरेल.

 

मीन :–बर्याच दिवसापासून रेंगाळलेल्या कामाना हाथ लावण्याची इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणणारे ठरतील. इतरांचे ऐकू नका.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *