Read in
मंगळवार 17 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 17 आँगस्ट चंद्ररास वृश्र्चिक 25:34 पर्यंत व नंतर धनु.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
मंगळवार 17 आँगस्ट चंद्ररास वृश्र्चिक 25:34 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 25:34 पर्यंत व
नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळागौरीच्या व्रताची पूजा.
मेष :–गर्भवती स्त्रियांनी आज खूपच काळजी घ्यायची आहे. ज्यांना प्रवास करावा लागणार आहे त्यांनी
प्रवासात बाहेरचे खाऊ नये व खावेच लागले तर चिकीत्सक वृत्तीने विचार करावा. तरूणांचा डोकेदुखीचा
त्रास संभवतो.
वृषभ :–राहत्या घराच्या जागेत अंतर्गत करावयाचा बदलाचा आता विचार करायला हरकत नाही.
उधारीवर किंवा E. M. I. बप्धतीने आज कोणतेही वस्तू खरेदीचे काम करू नका. आज तुमचे नुकसान
होण्याची शक्यता आहे.
मिथुन :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक विरोधकांचा त्रास होणार आहे. विद्यार्थी वर्गासही
स्पर्धेला सामोरे जावे लागेल. मनातील विचार मोकळेपणाने व्यक्त कराल तर कोणत्याही प्रकारचा
त्रास होणार नाही.
कर्क :–विद्यार्थ्यांनी आपल्या कोणत्याच कामात चालढकलकरू नये. कुटुंबातील सर्वानीच
सहविचाराने निर्णय घेतल्यास नुकसान होणार नाही व परिस्थितीतून ही सहजपणे मार्ग सापडेल.
सिंह :–विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षेत्रात चांगले यश मिळेल. सरकारी नोकरदारांनी आपल्यावर
असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त दुसर्या इतरांच्या विचारांना, मताला महत्व देऊन विचार करावा.
इतरांच्या कामात लुडबूड करू नये.
कन्या :–कलाकारांना अचानक उत्तम संधी चालून येईल सध्या त्यातून फार फायदा नसला तरी विचार
करा. भावनेच्या आहारी जाऊन मित्रमंडळींसाठी मोठा खर्च कराल. व्यसनापासून दूर राहण्यासाठी
निछ्चय करा.
तूळ :–तरूणांच्या प्रेम प्रकरणात आई वडीलांकडून पूर्वीपासून झालेला विरोध मावळू लागेल.
व्यावसायिक जूनी येणी परत मिळण्याचे निरोप येतील. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण करणार्या
घटना घडतील.
वृश्र्चिक :–व्यवसायातील परिस्थिती सुधारत चालल्याचे जाणवेल. सरकारी नोकरीत अचानक रोजच्या
कामाव्यतिरीक्त नवीन कामे सोपवली जातील. संततीच्या बाबतीत आज अगदी काटेकोर हा.
धनु :–स्वतंत्र वृत्तीच्या व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल.
परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रथम विचारात बदल करावा लागेल. घरातील कामातील सहभाग
आनंद देईल.
मकर :–सरकारी नियमांचे कोणत्याही परिस्थितीमध्ये उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या.
महत्वाच्या कामासाठी जात असाल तर कागदपत्रांची प्रथम तपासणी करा. कुसंगतीपासून आज त्रास
संभवतो.
कुंभ :–नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी वादविवाद होतील तरी प्रथमच समजूतदाराने विचार करा.
महत्वाच्या निर्यात जराही उणिव ठवू नका. मानसिक आनंदापुढे कोणत्याच कष्टांचे महत्व वाटणार
नाही.
मीन :–व्यवसायाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल पण इतरांचा सल्ला घ्यावा. पूर्वी दिलेल्या
मुलाखतीतून शाँर्ट लिस्टमध्ये नांव असल्याचे कळवले जाईल. विरोधातील मंडळीना आज कोणत्याही
प्रकारे उत्तर देऊ नका.
| शुभं-भवतु ||