Read in
सोमवार 16 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 16 आँगस्ट चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 27:01 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज दुर्गाष्टमी असून दुसरा श्रावणी सोमवार असून शिवामूठ तीळाची आहे.
मेष :–सासुरवाडीकडील मंडळींच्या प्रेमाने भारावून जाल. बदलत्या परिस्थितीच्या विचाराने पुढील योजनांचे नियोजन
करा. व्यवसायात वृद्धी करण्यासाठी इतरांच्या मदतीवर अवलंबून न राहता तुमचेच प्रयत्न महत्वाचे ठरतील. वकील
मंडळीना हातातील कामाला जास्तद्यावे लागेल.
वृषभ :–आज फक्त व्यवसायातील आर्थिक वाढीबाबतचाच विचार करा. आजारातून उठलेल्यानी उगीच बळजबरीने कामे
अंगावर घेऊ नयेत. ज्येष्ठांनी तरूणांवर टिकात्मक न बोलता त्यांना समजून घ्यावे. पोलीस खात्यातील वरीष्ठांना
वादग्रस्त प्रकरणे अतिशय जागरूकपणे हाताळावी लागणार आहेत.
मिथुन :–व्यवसायातील नव्या खरेदीच्या विषयात जरा दम धरा व तज्ञांचे मत घेऊनच निर्णय घ्या. नोकरीतील
अडचणींच्या प्रसंगावर मात करण्यासाठी तुम्ही आज जिवाचे रान कराल. आज दुपारनंतर नोकरीच्या ठिकाणी समाधानाचे
वातावरण राहील
.कर्क :–गुंतवणूकीचे वेड असलेल्यांना आज संधी नाहीय तरीही गप्प बसवणार नाही. व्यवहारातही विचारानेच रहा.
मुलांकडून नकळतपणे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होण्याचे संकेत मिळतील तरी
जागरूक रहा व इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका.
सिंह :–दुसर्यांना आज जराही कडक बोलू नका. कुटुंबात विनाकारण आज वादाची ठिणगी पडेल. जागरणामुळे अँसिडीटी
वाढल्याचे जाणवेल. कुटुंबातील आर्थिक गणिते सोडवण्यासाठी पूर्ण विचाराने आखणी करा. आजचा दिवस महत्वाच्या
कामासाठीच वापरा.
कन्या :– ट्रॅव्हल्स कंपनीत काम करणाऱ्यांना आज कामाचा ताण खूपच जाणवेल. शिक्षकांनी आखलेल्या नवीन योजनाना
वरिष्ठांकडून अपेक्षित दाद मिळेल. महिलांना त्यांच्या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होईल.
तूळ :–हातातील खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. नाहीतर आज एकाच दिवसात महिन्याभराचा खर्च कराल. लहान मुलांच्या
बोलण्याला महत्व देऊन त्यानुसार विचार करावा लागेल. सरकारी दवाखान्यातील कर्मचार्यांना आज विश्रांतिची गरज
भासेल.
वृश्र्चिक :– मनातील इच्छां पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग सापडेल. पाठोपाठच्या प्रवासामुळे अशक्तपणा जाणवेल.
महत्वाच्या कागदपत्रांवरांची पूर्तता करण्यासाठी आज फारच धावपळ करावी लागेल. आर्थिक व्यवहारात अडकू नका.
धनु :–तरूणांनी आपली मानसिकता बदलण्यासाठी सकारात्मक विचार करावा. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना
ज्येष्ठांच्या मदतीने आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यक तो बदल करता येणार आहे. सरकारी तत्त्वावरील व्यवसायात चांगली
वृद्धी झाल्याचे जाणवेल.
मकर :–मित्रमंडळींबरोबरच्या गप्पातून नवीन व्यवसायाची सुरूवात होत असल्याचे जाणवेल. तरूण मंडळी एकत्र येऊन
करण्यात येणार्या कार्यक्रमावर अचानक बंधन येईल. गायक मंडळीना कार्यक्रमाचे बोलावणे येईल.
कुंभ :–आजच्या सकाळची वेळ ज्या कामासाठी राखून ठेवली आहे त्या कामात अचानक बदल होईल. परगावी असलेल्या
वडीलांच्या प्रकृतीची केलेली विचारपूस महत्वाची ठरेल. पतीपत्नीच्या वादविवादात दोघानाही मनस्ताप होणार नाही याची
दखल घ्या.
मीन :– कुटुंबातील महत्वाच्या प्रश्र्नाला प्राधान्य दिल्यास प्रश्र्न हातावेगळी होईल. तरूण वर्गास बाहेरचे चमचमीत
खाण्याची लहर येईल. अध्यात्मिक उपासकांनी आपल्या ऊपासनेस मार्गस्थ करण्याकरीता ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा
लागेल.
| शुभं-भवतु ||