weekly-horoscope-2020

रविवार 15 आँगस्ट 2021 ते शनिवार 21 आँगस्ट 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 15 आँगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.

रविवार 15 आँगस्ट चंद्ररास तूळ 22:45 पर्यंत व नंतर वृश्चिक व चंद्रनक्षत्र विशाखा 28:25 पर्यंत व
नंतर अनुराधा.

weekly-horoscope-2020

सोमवार 16 आँगस्ट चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 27:01 पर्यंत व
नंतर ज्येष्ठा. मंगळवार 17 आँगस्ट चंद्ररास वृश्र्चिक 25:34 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा
25:34 पर्यंत व नंतर मूळ. बुधवार 18 आँगस्ट चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 24:06 पर्यंत व
नंतर पूर्वाषाढा. गुरूवार 18 आँगस्ट धनु 28:21 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 22:41 पर्यंत व
नंतर उत्तराषाढा. शुक्रवार 20 आँगस्ट चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 21:24 पर्यंत व
नंतर श्रवण. शनिवार 21 आँगस्ट चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 20:21 पर्यंत व नंतर
धनिष्ठा.
रविवार 15 आँगस्ट भानुसप्तमी, आदित्यपूजन.
सोमवार 16 आँगस्ट दुर्गाष्टमी, व श्रावणी सोमवार.
बुधवार 18 आँगस्ट पुत्रदा एकादशी.
शुक्रवार 20 आँगस्ट प्रदोष. जरा – जिवंतिका पूजन, वरलक्ष्मी व्रत.
शनिवार 21 आँगस्ट अश्र्वत्थमारूती पूजन.

मेष :–सध्या तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला भेडसावणाऱ्या अडचणीवर उपाय करण्याकरीता तुम्हाला
तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. व्यवसायातील तुमच्याकडे असलेले अधिकार वापरताना सर्व बर्या
वाईट बाबींचा विचार करा. झोप कमी असणार्‍यांनी कोणत्याही झोपेच्या गोळ्या न घेता योगक्रिया
कराव्यात. सामाजिक कार्यातील यशामुळे सर्वत्र तुमचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाला मिळालेल्या
यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. अपरिचित व्यक्तीबरोबर बोलताना तुमची कार्ड्स ओपन करू
नका. मित्रांबरोबरच्या व्यवहारात मित्रांची पारदर्शकता तपासून पहा.

वृषभ :–कुटुंबातील सुरू असलेल्या न्यायालयातील केसमधून मुक्त होण्याकरीता समझौत्याचा प्रयत्न
कराल तर यशस्वी होईल. स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणार्‍यांनी आत्मविश्वासाने प्रयत्न सुरू
ठेवावेत. राजकारणातील मंडळीनी माहिती घेतल्याशिवाय कोणत्याच विषयावर व्यक्त होऊ नये.
मणक्याचे दुखणे असलेल्यांना आपला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवरील

मजकूराचा अतिशय लाभदायक पद्धतीने चांगला अनुभव येईल. आईवडीलांचा आनंददायी सहवास
मिळेल.

मिथुन :– या सप्ताहाची सुरूवात एखाद्या सुखद प्रसंगाच्या अनुभवाने होईल. प्रेमाच्या व्यवहारात सुरू
असलेल्या अडचणी कमी होऊ लागतील व नातेसंबंधात झालेले गैरसमज दूर होत असल्याचे जाणवेल.
वयस्कर मंडळीना डोळ्याचे आँपरेशन करण्याचे ठरेल. उच्चशिक्षण घेण्याच्या स्वप्नांना सत्यात उतरत
असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
वैयक्तिक पातळीवर करावयाची जबाबदारीची कामे इतरांवर सोपवू नका.
N
कर्क :– संततीच्या प्रकृतीची काळजी वाढेल. हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांच्या प्रकृतीविषयी
डाँक्टरांबरोबर योग्य वेळेत संपर्क साधावा. सार्वजनिक इमारतीत राहणार्‍यांनी घराच्या
पडझडीबाबतची आवश्यक ती काळजी घ्यावी. वडिलांना आँफीसमधील कामाच्या व्यापामुळे
आजारपण येणार आहे. नोकर मंडळीनी आपल्या जवळच्या माणसांबरोबर मनातील भावना व्यक्त
करण्यास हरकत नाही. अचानक करावा लागणारा प्रवास त्रासदायक राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द
पाळण्यासाठी तरूणांच्या कडून प्रयत्नांची पराकाष्ठा होईल.

सिंह :–या सप्ताहाच्या मध्यात प्रथम लहानशा प्रवास ठरेल व नंतर पुन: मोठा प्रवास करायचे ठरेल.
वयस्कर मंडळीना तसेच ज्यांना ङ्रदयाचा त्रास आहे त्यानी आवश्यक तेवढी हालचाल करून व्यायामही
करावा. कफ प्रकृती असलेल्यांनी अगदी काटेकोरपणाने वागावे. गर्भवती महिलांनी कोणत्याही
संसर्गजन्य रोगापासून स्वत:ला सांभाळावे. सध्याच्या कोरोनाच्या काळात अतिशय काळजी घ्यावी
हलगर्जीपणा करू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर विश्र्वास ठेवूनच पुढील प्रवेश घ्यावा.
घरगुती तसेच पाळीव प्राण्यांच्या बाबतीत जागरूक रहावे.

कन्या :–महिलांच्या सौंदर्याोविषयीच्या कल्पनेत व मानसिकतेत अचानक बदल होईल. पार्लर आ
जाण्याची ओढ पूर्वीइतके राहणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच खरेदी करावी. मागिल
महिन्यापासून नोकरीतील सतावणारा प्रश्र्न अचानक सुटत असल्याचे जाणवेल. बोलण्याच्या ओघात
महत्वाच्या कामाविषयीच्या चर्चा इतरांसमोर करण्याचा मोह होईल. सरकारी योजनांतून मिळणार्‍या
संधीबाबतची व्यवस्थित माहिती घेऊन मगच पुढील निर्णय घ्यावा. महिलांवर टाकलेली जबाबदारी
अतिशय काळजीपूर्वक पेलल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होईल.

तूळ :–या सप्ताहात होणार्‍या कार्यक्रमासाठी तुम्हाला नेतृत्व करावे लागेल. प्रवासाचे नियोजित बेत
अचानक बदलले जातील पण त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. व्यवसायातील गुंता सोडवण्यासाठी
अतिप्रमाणात धावपळ करावी लागेल व ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट
असलेल्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे जाणवेल. कुटुंबात लहान मुलांना एकटे सोडू
नये. वयस्कर मंडळीना आपल्या मित्रमंडळीत रमता येणार आहे.

वृश्र्चिक :– या सप्ताहात बर्‍याच दिवसापासून तुमच्या मनात असलेले बेत कसे मार्गी लावावेत याची
आखणी कराल. घरामध्ये नव्याने आणावयाच्या वस्तूंबाबत फार घाई करू नका. पूर्ण चौकशी करून
मगच घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर मोठे काम करता येणार आहे.
संस्थेकडून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. महिलांना आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी
झाल्याचे जाणवेल. या सध्याच्या काळात जराही बेफिकीर राहू नका.

धनु :–हा सप्ताह तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. आईवडीलांच्या व्यवसायात तुमच्या
मताला किंमत दिली जाईल तरी या सप्ताहात तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता येतील. काहीना
अचानक घरातच रहावेसे वाटेल तरी जबरदस्तीने बाहेर जाऊ नका. व्यवसायातील ऊधारी अगदी
सहजपणे वसूल होणार असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी
प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश येईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी सध्या गप्प रहावे हेच चांगले
ठरेल.

मकर :–मुलांकडून झालेल्या चुकांबद्धल कुटुंबातील मोठ्यांना मानहानीला सामोरे जावे लागेल.
तरूणांना आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. महत्वाच्या कामात जराही
हलगर्जीपणा खेळात तर मोठे नुकसान होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील
अडचणीतून मार्ग काढाल. समोर आलेल्या प्रत्येक अडचणींची जबाबदारी स्वत:हून अंगावर ओढवून
घ्याल. तुमच्यावरील असलेल्या निष्ठेमुळे मित्रमंडळी तुमची साथ सोडणार नाहीत. घरगुती बाबतीत
अविचाराने वागू नका.

कुंभ :–तुमच्या हातात असलेल्या अधिकारांवर वरिष्ठांकडून दबाव निर्माण होईल. भागिदाराच्या
व्यवहारात दुसर्यांवर टाकलेला विश्र्वास सार्थ ठरल्याचे कळेल. वयस्कर मंडळीना नात्यातील दुरावा
कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरीच्या व्यापातून वेळ न मिळाल्याने तुम्हाला दिलेला

शब्द पाळता येणार नाही. मानसिक स्वास्थ बिघडलेल्या तरूणांना इतरांनी सामावून घेतल्यास
त्यांच्यात बदल होण्यास मदत होईल. वृद्धांनी तरूणांच्या अडचणी समजून घ्याव्यात.

मीन :–उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता आपल्या अडचणी दूर करण्याचे तंत्र कळेल.
वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी. व्यवसायातील भांडवलाबाबतची आता काळजी
करू नका. मित्रांबरोबर झालेल्या दुराव्यात तुमच्या पुढाकाराने गैरसमज दूर होऊन पुन: एकोपा होणार
आहे. महिलांनी आपल्या विश्र्वासातील व्यक्तीवर आर्थिक बाजू सोपवल्यास कार्यभाग चांगल्या
पद्धतीने करता येणार आहे. अचानक दुसर्यांच्या सांगण्यावरून नव्याने गुंतवणूक करू नका.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *