Read in
शनिवार 14 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 14 आँगस्ट चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 06:55 पर्यंत व नंतर स्वाती.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी व दोन्ही
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.श्रावण महिन्यातील पहिला शनिवार असल्याने आज अश्र्वत्थ मारूती पूजन करावे.
मेष :–बँकेचे व्यवहार इतरांना कळणार नाहीत याची दखल घ्या. आईच्या बोलण्याची कटकट वाटून घेण्याने मानसिक
त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना विद्यार्थ्यांच्या क्षमताांचा फार गांभिर्याने विचार करावा लागेल.
वृषभ :–आज व्यवसायात नव्याने भांडवल गुंतवू नका. उलट आर्थिक देण्या घेण्याचे ही कोणतेच व्यवहार करू नका.
कुटुंबात अचानक एखादी आनंदाची, समाधानाची बाब घडेल. लहानशा गोष्टीवरून नाराज होऊ नका. महिलांना
स्वकष्टार्जित धनाचा इगो निर्माण होईल.
मिथुन :–महिलांना व लहान मुलांना पोटदुखण्याचा त्रास होईल. अध्यात्मिक उपासकांनी या श्रावण महिन्याचा फायदा
घेऊन एखाद्या व्रताचा संकल्प करावा. शिक्षकांना आँन लाईन कामाचा व्याप सांभाळणे अवघड जाईल.
कर्क :– मागिल महिन्यातील तुमच्या कडून घडलेल्या घटनेचे प्रतिसाद मिळू लागतील. पूर्वी औषधी कंपन्यात केलेल्या
गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल तरी त्या गुंतवणकीकडे लक्ष द्या. दिव्यांग मंडळीना अचानक नवीन नोकरीची संधी
मिळेल.
सिंह :–नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आईकडील नात्यातील मंडळींच्या कडून योग्य माहिती मिळेल.
पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कामासाठी लहानशा प्रवास करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना आज कामाचा खूप ताण
जाणवेल.
कन्या :–महिलांना नवीन खरेदीचे वेध लागल्याने आज नियोजन सुरू कराल. आजपर्यंत करत असलेल्या
कामाव्यतिरीक्त आजच्या मिटींगमधे विषय हाताळले जातील. विद्यार्थ्यांकडून नवीन प्रोजेक्टवरील माहितीची विचारणा
होईल.
तूळ :–मनाची चलबिचलता वाढल्याने हातातील कामाकडे लक्ष लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर केलेल्या चर्चेमधून
तुमचे प्रश्र्न आपोआप सुटतील. आज राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी विरोधकांचा विरोध सहन करावा
लागेल.
वृश्र्चिक :–तुम्ही प्रयत्न करत असलेल्या कामातून चांगल्या आशा निर्माण होतील. पतीपत्नीच्या एकत्र बँक अकाऊंट
असलेल्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये. तुमच्या
बोलण्याचा परिणामाने होऊन समोरील व्यक्तीला चुकांची जाणिव होईल.
धनु :–बर्याच दिवसापासून दुखत असलेल्या हाताची तक्रार कमी झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन वर्षासाठीच्या
केलेल्या नियोजनात कांही महत्वाच्या सुधारणा कराव्या लागतील. वडिल भावंडाकडून मोलाची मदत मिळेल.
मकर :–ज्यांचे गुडघे मांड्या व पाय नेहमी नेहमी दुखतात त्यानी डाँक्टरना दाखवावे हलगर्जीपणा करू नये. कुटुंबातील
त्वचेच्या त्रासातून लवकरच दुरूस्ती होण्याची चिन्हे दिसतील. कोणत्याही परिस्थितीत हातात आलेली संधी घालवू नका.
कुंभ :–धार्मिक गोष्टी करण्याकडे जास्तीत जास्त तुमचा कल राहील. आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने
तरूणांनी तज्ञांच्या सल्ल्याने आहार ठरवून घ्यावा. कोणत्याही क्षेत्रातील मंडळीनी आज गुंतवणूक करायला हरकत नाही.
मीन :–तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बदल करावयाचा असल्यास आज पर्याय सापडतील. महिलांना आपल्या अपेक्षेप्रमाणे
नवीन व्यवसायांची माहिती होईल. मौल्यवान व खर्चिक वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. कोणत्याही क्षेत्रात अचानक निर्णय
घेऊ नका.
| शुभं-भवतु ||