daily horoscope

शुक्रवार 13 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 13 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 13 आँगस्ट चंद्ररास कन्या 19:28 पर्यंत व नंतर तूळ.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र हस्त 07 :09 पर्यंत व नंतर चित्रा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमी आहे.
श्रावणातील पहिला शुक्रवार असून जरा – जिवंतिका पूजनाचा दिवस आहे.
श्री महालक्ष्मीच्या स्थापनेचा व पूजनाचा दिवस आहे.
मेष :–व्यवसायाच्या निमित्ताने एखादा प्रवास करावा लागेल. करोनाबाबतच्या सर्व दक्षता घ्याव्या
लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी तुम्हालाच सांभाळावी लागेल.

वृषभ:– तुमच्या हातातील अतिमहत्त्वाच्या कामाकरता तुम्हाला तुमची पूर्ण उर्जा लावावी लागेल. कोणताही
निर्णय घेताना शांतपणे विचार करा. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय त्रासदायक ठरेल.

मिथुन :–हातातील असलेल्या गोष्टीत जास्त रस घेण्यापेक्षा न मिळालेल्या गोष्टीसाठी नाराज होऊ नका.
महिलांना अचानक अँपेडिक्सचा त्रास जाणवेल व वेदना सहन होणार नाहीत. घरगुती उद्योगाचा पसारा
वाढत असल्याचे जाणवेल.

कर्क :–विद्यार्थ्यांना आपल्या यशाने मानसिक समाधान मिळेल व पुढील शिक्षणासाठी महत्वाकांक्षा वाढेल.
आजारी उद्योगांना सरकारकडून मिळणार्‍या मदतीसाठी अवलंबून न राहता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

सिंह :–व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. आज सर्वच व्यवहार अतिशय
सावधपणे करा. नोकरीत न्यायालयातील कामकाजावर आजपासून तुमची नियुक्ती करण्यात येईल.

कन्या :–हातातील प्रोजेक्टची पूर्णत: जबाबदारी तुमच्यावरच आहे हे ओळखून नियोजन करावे लागेल.
तुमच्या आर्थिक बाबींचा अंदाज इतरांना देउ नका. घरातील वयस्कर मंडळीना मनोरंजनाचे एखादे पुस्तक
आणून द्याल.

तूळ :–कोणतीच नाती बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांची सामाजिक
पातळीवर प्रतिष्ठा वाढल्याचे जाणवेल.मैदानी खेळात तुमची आजवरची मेहनत यशाकडे नेणार आहे.

वृश्र्चिक :–तुमच्या नियोजनात फक्त स्वत:पुरताच विचार करून निर्णय घेऊ नका. घरातील वयस्कर
मंडळींच्या प्रकृतीबाबतची तुम्हाला वाटत असलेली भीती सार्थ ठरेल.

धनु :–तुमच्या बोलण्यातील चतुराईने सर्वजण भारावून जातील. विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वयापेक्षा जास्त
अक्कल आल्याचे जाणवेल. नोकरीतील कामात एकमेकांना झोकून देउन मदत कराल.

मकर :–कोणताही निर्णय अंमलात आणण्यापूर्वी कुटुंबात चर्चा करा व मार्गदर्शनही घ्या. जोडीदाराने
लपवलेल्या गोष्टीचा सुगावा लागल्याने अचानक स्फोट होईल. रागावर नियंत्रण आवश्यक आहे.

कुंभ :–नोकरीत अनवधानाने झालेल्या चुकांवर पांघरूण घालू नका. जून्या घरात रहात असाल तर त्यातील
धोक्याची माहिती करून घ्या. जूने वायरींग तपासून घ्या. बुद्धीमत्तेने व तल्लखपणाने अडचणीतून बाहेर
पडाल.

मीन :– आज तुमच्या मनातील विचार स्पष्टपणे जोडीदाराकडे उघड करा. नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे
मनाला आनंद देणार्‍या गोष्टी उपभोगाल. नव्याने मुलाखती दिलेल्यांनी निर्णयात घाई करू नये.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *