daily horoscope

गुरूवार 12 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 12 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 12 आँगस्ट चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 08:52 पर्यंत व नंतर हस्त.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी असल्याने गणेश भक्तांनी श्री गणेशाची उपासना करावी.
आज दुर्वागणपती व्रताचा दिवस असल्याने श्री गणेशाला दुर्वा व वहाव्यात.
मेष :–नोकरीच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या कामावर, कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ खूष होणार आहेत.
पतीपत्नीनी दोघांमधे वादाचे प्रसंग येऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना राहत्या ठिकाणापेक्षा
दुसरीकडे जाऊन उत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळेल.

वृषभ :–तुम्हाला न पटणार्‍या गोष्टींबाबत स्पष्टपणे सांगून आपले मत व्यक्त केल्यास तुमच्याविषयी गैरसमज
होणार नाहीत. घरगुती उद्योगात अचानक वाढ होऊन आर्थिक प्राप्ती ही चांगली होईल.

मिथुन :–आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. बर्याच दिवसापासून ज्या कामाला सुरूवात
करायची होती त्या कामाला आज सुरूवात केल्यास काम सुरळीत होईल. नात्यातील दुरावा कमी
करण्यासाठीही आजचा दिवस खूपच चांगला आहे.

कर्क :–मित्रमंडळींबरोबर बिघडलेले नाते पुन: मार्गावर आणण्यासाठी आज प्रयत्न करावा. नियमावर बोट
ठेवून कोणतेही काम करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात मुलांच्या मताचा आदर करावा लागेल.

सिंह:–हातात असलेल्या पैशांना अचानक वाट फुटेल. स्वत: साठी नाही केले तरी इतरांसाठी खर्च कराल.
लहान मोठ्या निर्णयात मोठ्यांची मदत घेतल्यास पुढील नुकसान टळेल. अध्यात्मिक उपासकांनी सूचक
स्वप्नाचा अर्थ लावावा.

कन्या :–मूळ गावाकडील विकासाच्या कामासाठी आर्थिक मदत द्याल. आजचा दिवस हा तुमच्या आयुष्याला
एखादे वेगळे वळण देणारा ठरणार आहे. नात्यातील मंडळींमधे तुमची मान ताठ होणार आहे.

तूळ :–आज दिवसभर मानसिक उत्साह वाढल्याचे जाणवेल. इतरांवर विसंबून कोणतेही काम ठरवू नका.
आज इतरांकडून तुम्हाला अपेक्षित असलेली मदत मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन
प्रोजेक्टवर काम करण्याची संधी पोस्टपोन हाईल.

वृश्र्चिक :–मनातील कोंडलेल्या भावनाना मोकळी वाट करून द्या. नात्यातील काही व्यक्तींच्या त्रासाने
मनस्थिती हळवी होईल व मोकळेपणाने रडावेसे वाटेल. व्यवसाय उद्योगात चांगला आर्थिक फायदा होईल.

धनु :–तुम्हाला ज्या समस्या भेडसावत आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आईवडिलांच्या सल्ल्याने
सापडेल. मैत्रीतील सकारात्मक विचारातून समाधान मिळेल. स्वत:चा हेका चालवू नका इतरांच्या
सल्ल्याचा विचार करा.

मकर :–राजकीय मंडळींच्या मनात बंडखोरीचे विचार वाढणार आहेत. लहान मुलांच्या वागण्यातून
त्यांच्या स्वभावाला दुषणे लावू नका. कुटुंबाकरीता कराव्या लागत असलेल्या त्यागाबाबत कुटुंबातील
मुलांना जाणिव झाल्याचे दिसेल.

कुंभ :–मनातील प्रबळ इच्छेनुसार कामात मन ओतून कार्य कराल. व्यवसायातील समस्यांवर लक्ष केंद्रित
केल्यास समस्येतील फोलपणा कळून येईल. सामाजिक कार्यातील यशामुळे सर्वत्र कौतुक होईल.

मीन :–नात्यातील मंडळींबरोबर जमवून घ्यावे लागेल. व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी तुम्हाला नवीन उपाय
सापडतील पण तरीही तज्ञांच्या सल्ल्यानेच करा. आईबरोबरच्या चर्चेतून योग्य मार्ग सापडेल.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *