Read in
बुधवार 11 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 11 आँगस्ट चंद्ररास सिंह 15:23 पर्यंत व नंतर कन्या.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 09:31 पर्यंत व
नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली
नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्राचा कन्या राशीतील प्रवेश 11:31.
मेष :– तुमच्या प्रकृतीतील कुरबुरीकरीता मुलाला धावाधाव करावी लागेल. पूर्वी मित्राच्या मदतीने
बिघडलेल्या कामाला मार्गी लावाल. नोकरीतून निर्माण झालेल्या प्रकरणावर पडदा पडेल.
वृषभ :–आज तुम्ही ऊच्च पातळीवरून करत असलेल्या राजकीय कामाचा योग्य मार्ग सापडेल. निवृत्त
झालेल्या ज्येष्ठ मंडळींना सेवाभावी कामासाठी बोलवले जाईल. तरूणांना व्यवसायात प्रगतीच्या
दृष्टीने काम करता येणार आहे.
मिथुन :–अचानक मनोरंजनाच्या साधनाची खरेदी कराल. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष देताना
प्रकृतीकडे लक्ष न दिल्याचा परिणाम जाणवू लागेल. सरकारी बँकेच्या व्यवहारातील गुंतागुंत वाढणार
आहे.
कर्क :–साध्या व सोप्या कामाकरीताही आज जास्त कष्ट घ्यावे लागतील. पूर्वनियोजित कामामधे
परिस्थितीनुसार बदल करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही व्यवहार करू नका.
सिंह :–धनलाभाचा योग आहे तरी त्याचे योग्य नियोजन करा. व्यवसायातील गुंता सोडवण्यासाठी
अति प्रमाणात धावपळ करावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर
बंधने येतील.
कन्या :–आईवडीलांकडून अचानक कोणतेही कारण नसतानाही आर्थिक भेट मिळेल. महिलांना सासर
व माहेर दोन्हीकडून लाभ होईल. गुप्तशत्रूपासून सावधानता बाळगावी लागेल.
तूळ :–प्रतत्न व हुशारी यांचा मेळ घालून फायद्याच्या गोष्टी मिळवाल. घरगुती उद्योगातील वाढता
फायदा नवीन संधी मिळवून देईल. घरातील व मनातील ही वातावरण सौम्य व शांत ठेवण्याचा प्रयत्न
करा.
वृश्र्चिक :–कायद्याच्या चौकटीत राहून काम कसे करावे याबाबतचा सल्ला आवश्यक आहे.
वास्तुविषयीचा रखडलेला प्रश्र्न लवकरच सुटणार असल्याची चिन्हे दिसू लागतील. थोरामोठ्यांच्या
सहकार्याने कामे सोपी होतील.
धनु :–कुटुंबातील वृद्ध मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल. परदेशी असलेल्या मुलांना घरी
येण्याची फारच ओढ लागेल. नोकरीच्या ठिकाणी आज तुमचे वर्चस्व चांगलेच वाढल्याचे जाणवेल.
मकर :–आज अशी संधी येणार आहे कीं त्याचा तुम्हाला बर्याच कालावधीपर्यंत फायदा घेता येणार
आहे. घरातील आवराआवर करताना जून्या हरवलेल्या मौल्यवान गोष्टी सापडतील. लहान मुलांच्या
खेळण्यातून तुमची हरवलेली वस्तू सापडेल.
कुंभ :–मुळातच पोटाचा विकार असलेल्यांना पुन: त्रास होउ लागेल डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
नोकरीतील प्रकरणाच्या न्यायालयातील कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल.
मीन :–आज आर्थिक व्यवहार करू नका. नुकसानीचा धोका आहे. मनातील नुकसानीची भीती ही खरी
ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होणार नाही याची
काळजी घ्यावी लागेल.
| शुभं-भवतु ||