daily horoscope

मंगळवार 10 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 10 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 10 आँगस्ट चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 09:52 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळागौर देवीच्या व्रताचा पहिला मंगळवार.
मुस्लिम मोहरम महिन्याचा पहिला दिवस.

मेष :–स्वत:च्या मुलांविषयी मनातून वाटणार्‍या भावनाना मोकळी वाट करून द्याल. आजचा दिवस
अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. कुटुंबात पाहुणे आल्यामुळे अचानक तीन पिढ्या एकत्र
येतील.

वृषभ :–तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्यांसाठी खरेदी कराल. ज्येष्ठांच्या मताला किंमत देउन
स्वत:च्या मनाला बंधन घालाल. ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहात तेथे न मागताही नवीन संधी प्राप्त
होईल.

मिथुन :–वादविवादात तत्वाना मुरड न घालताही आपली मते पटवून द्याल. आर्थिक बाबतीतही इतर
मंडळी तुमच्या निर्णयावर अवलंबून राहतील. जवळच्या नात्यातून तुमच्या भेटीसाठी मागणी होईल.

कर्क :–नेहमीच संयम पाळल्याने आपल्याला काहीच मिळत नाही हे लक्षात असू द्यावे. आज तुमच्या
सत्वपरिक्षेचा दिवस आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा कंटाळा येईल. जवळच्या
व्यक्तीजवळ मन मोकळे करण्याची संधी मिळेल.

सिंह :–मनातील कल्पना साकार करताना येणार्‍या अडचणींवर मात कराल. अचानक धनलाभ
झाल्याने आज कुटुंबात आनंदीआनंद होणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुढाकाराने
कुटुंबातील रखडलेल्या कामाना मार्ग सापडणार आहे.

कन्या :–गुंतवणूक करण्यापेक्षा कर्जातून मूक्त होण्याच्या विचारात पतीपत्नीमधे एकवाक्यता येईल.
पायाच्या दुखण्यात वाढ झाल्याचे जाणवेल. सायेटिकाच्या दुखण्यात अचानक वाढ होणार आहे.

तूळ :–नवीन घरगुती व्यवसायाच्या बाबतीतही सहजपणे परवाना मिळेल. तरूण वर्गाला अध्यात्मिक
क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल . आज कुटुंबामधे पूजाअर्चा केल्याने उत्सवाचे रूप प्राप्त होईल.

वृश्र्चिक :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की त्यांवर कोणताही उपाय चालणार
नाही व त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्याचा त्रास होईल. ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो. जून्या
मित्रमैत्रिणींकडून आलेल्या बातमीने मनाला आनंद होईल.

धनु :–आज सकाळपासूनच कामातील उत्साहात डबल वाढ होईल. सामाजिक क्षेत्रातील कार्यभाग
सुरळीतपणे चालल्याचे पाहून वरिष्ठ खूष होतील. घरगुती वातावरणात वाढदिवस किंवा इतर समारंभ
पार पडेल.

मकर :–आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या कामांची जबाबदारी घेऊ नका. डाँक्टर व सर्जन मंडळीना
पेशंटकडून त्रास संभवतो. व्यवसायात आज कोणत्याही प्रकारची उलाढाल करू नका. प्रवासाचा बेत पूढे
ढकलला जाईल.

कुंभ :–महत्वाची व्यक्तिगत कामे पूर्ण करण्याची घरातीलच ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल.
व्यवसायातील भागिदारांबरोबर केलेल्या चर्चेतून फारसे फलित निघणार नाही. तरूणांना आपल्या
मनावर संयम ठेवावा लागेल.

मीन :–जुन्या गुंतवणुकीतून लाभ होणार्‍या गोष्टी घडतील. स्वविचारांचा व मतांचा हेका धरल्यास
नुकसान होईल. आज तुम्ही तुमचे विचार बाजूला ठेवावेत. राजकारणातील स्पर्धक विनाकारण त्रास
देतील.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *