Read in
सोमवार 09 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 09 आँगस्ट चंद्ररास कर्क 09:41 पर्यंत व नंतर सिंह.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र आश्लेषा 09:49 पर्यंत व नंतर
मघा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्रावण शुक्ल प्रतिपदा असून नक्तव्रतास प्रारंभ होत आहे.
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून श्री महादेवाची उपासना करण्याचा दिवस आहे.आज
आपल्या जिवनातील दुष्टचक्र संपण्याकरीता “ॐ नम: शिवाय ” या अमृत मंत्राजा जप करावा.
मेष :–प्रत्येक आईला संतती विषयी जे करावेसे वाटतेय त्याचा आज संकल्प करावा. मानसिक था
तणावातून बाहेर पडण्यासाठी आजपासून श्री महादेवाची उपासना करावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी
संकल्प करून श्री शिवलिलामृताचा अकराव्या अध्यायाचे वाचन करावे.
वृषभ :–आईबरोबर शाब्दिक वाद निर्माण होईल तरी शब्दांची धार ओळखूनच व्यक्त व्हा. आईच्या
नावावर असलेल्या व्यावसायिकांना अचानक व्यवसायातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल.
प्रसूती काल जवळ आलेल्यांनी जराही दगदग करू नये.
मिथुन :–आज अचानक कुटुंबातील सदस्यांकरीता मोठी रक्कम खर्च करावी लागेल. विवाहाच्या
बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. सुखाच्या अनुभवाने आज तुम्ही समृद्ध होणार आहात.
कर्क :–मनातील विचारांचा प्रभाव नकळतपणे इतरांसमोर व्यक्त होईल. लहान भावंडांबरोबरच्या
चर्चेमधून सकारात्मक विचार तयार झाल्याने कामाला सुरूवात कराल. गाण्याच्या कार्यक्षेत्रात
तुमच्याकडून नवीन संकल्प होईल.
सिंह :–प्रेम प्रकरणातील व्यवहारांना विशेष जपावे लागेल. नोकरीतील अवघड कामे तुमच्यावर
सोपवून तुमच्या वरील विश्वास व्यक्त केला जाईल. पूर्वी पैसे भरलेल्या कामातील सध्याची परिस्थिती
कळवणारा फोन येईल.
कन्या :–आई वडिलांच्या व्यवसायातील अडचणींवर तुमच्याकडून उपाय सुचवला जाईल व आर्थिक
मदतही कराल. ज्यांना पगारा ऐवजी मानधन मिळते त्यांच्या मानधनात आज वाढ होणार असल्याचे
कळेल.
तूळ :–आर्थिक स्तर उंचावल्याने खरेदीचे मोठे बेत ठरतील. बर्याच दिवसापासून मनात असलेले स्वप्न
साकार होण्यासाठीच्या कामाची सुरूवात कराल. नोकरीच्या शोधाला सकारात्मक वळण लागेल.
वृश्र्चिक :- वडिल भावाकडून अचानक धनलाभ होईल. मित्राच्या घरातील दु:खद प्रसंगासाठी जावे
लागेल. आज तुमच्या आत्मविश्वासात अचानक वाढ होईल. कोणतेही आर्थिक अती धाडस करू नका.
धनु :–अचानक धनलाभ झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. आपल्या आवडत्या छंदाबाबत नव्याने काम
करण्याच्या स्वप्नाला घरातून होकार मिळेल व मदतही होईल. पूर्ण विचाराने निर्णय घ्यावा.
मकर :–व्यावसायिक जूनी येणी परत मिळण्याचे निरोप येतील. कौटुंबिक कार्यामध्ये तुमची मोठी
मदत होईल. नोकरीत गटबाजीच्या बाजूला जराही झुकू नका. विवाहाच्या बाबतीत मध्यस्थाची चांगली
मदत होईल.
कुंभ :– अनाथालय किंवा वृद्धाश्रमाचे काम करणार्यांना नव्याने नियोजन करावे लागेल. प्रेमाच्या
व्यवहारात अडचणी निर्माण होण्याचे संकेत मिळतील. पैसे गुंतवण्याचा मोह आवरणार नाही.
मीन :–आईवडीलांच्या आनंदासाठी मुलांना आपल्या पूर्वनियोजित कामात बदल करावा लागेल.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीपेक्षा ज्येष्ठांच्या व तज्ञांच्या मताला महत्व द्यावे. उत्पादनाच्या
क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.
| शुभं-भवतु ||