Read in
शनिवार 07 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 07 आँगस्ट चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 08:15 पर्यंत व नंतर पुष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–रोजच्या म्हणजेच दैनंदिन शिकवण्याच्या जागी नियुक्ती केली जाईल. विजेवर चालणार्या
घरगुती उपकरणांच्या दुरूस्तीच्या दुकानात नोकरी मिळेल. ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे त्यांना
मोठे काँन्ट्रक्ट मिळेल.
वृषभ :–उच्चशिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांनी आता नव्याने पुन: प्रयत्न करायला हरकत नाही.
आईच्या नावावर केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. जाहिरातदार, पत्रकार यांना कामातील
गुंतागुंत सोडवताना नवीनच अनुभव येईल व ज्येष्ठांची मदत होईल.
मिथुन :–राहण्याची वास्तू बदलण्याचा विचार करताना पुन: विचार करा. पूर्वी दिलेल्या मुलाखती मधू
नोकरीचा काँल येईल पण घरापासून दूर किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागेल. लहान मुले किंवा वयस्कर
मंडळीनी घरातील झोपाळ्यावर बसताना सांभाळून बसावे.
कर्क :–नोकरदारांनी आपली दृष्टी बदलल्यास कालपर्यंत जे काम जड वाटत होते त्याविषयी आवड
निर्माण होईल. व्यवसायातील अडचणीवर बँकेकडे मागितलेले कर्ज मंजूर होत असल्याचे कळवले
जाईल.
सिंह :–परदेशी नोकरीचे स्वप्न पाहणार्यानी सध्या घाई करू नये. कुटुंबातील सर्वांना एकात्र
आणण्याचा तुमच्या मनातील इच्या पूर्ण होईल. सकारात्मक विचाराने आज रखडलेल्या कामांचा
विचार केल्यास मार्ग सापडेल.
कन्या :–विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल. मुलांच्या
आवडी निवडीत आपोआपच सकारात्मक बदल होईल. परगावी असलेल्या मुलांना त्यांच्या व पेक्षा
मोठ्या व्यक्तींचा आधार मिळेल.
तूळ :–नोकरीत बदल करण्याच्या विचारात असाल तर आज प्रयत्न सुरू करा. वाहन खरेदीच्या
विषयाला पुन: सुरूवात करा. वडिलांच्या वागण्या, बोलण्यातील बदलाचा विचार करून डाँक्टरांचा
सल्ला घ्यावा.
वृश्र्चिक :–कामातील यश अपयशाचा तुमच्या कार्यपद्धतीवर परिणाम होईल. संघटनात्मक काम
करणार्यांना अनपेक्षित अनुभव येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सोडवण्यासाठी
प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश येईल.
धनु :–तुम्हाला आवडती वस्तू आईकडून भेट मिळेल. रखडलेल्या घरबांधणीच्या कामाची घाई करू
नका. तुम्ही करत असलेल्या उपासनेवर विश्र्वास ठेवल्यास दैवी शक्तीचा अनुभव येईल. सामाजिक
कार्य करणाऱ्या वयस्कर मंडळीना आपले अनुभव कथन करण्याची संधी मिळेल.
मकर :–आज उद्या या दोन दिवसात विवाहाबाबतचा कोणताच निर्णय घेऊ नका. व्यवसायातील
निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. एखाद्या तुम्हाला न पटलेल्या घटनेबाबत लगेच तुमचे विचार
व्यक्त करू नका.
कुंभ :–ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत अशा गोष्टींना विनाकारण तुमच्याकडून महत्व दिले जाईल.
वारसा हक्का बाबतच्या चर्चेमधे तुमच्या विचारांना महत्व दिले जाईल. लहान भावाला मिळालेल्या
यशाबद्दल गिफ्ट द्याल.
मीन :- व्यवसायाच्या नवीन गोष्टी बाबतची चर्चा करताना भागिदाराकडून आलेल्या सूचनांना महत्व
द्या. मनातील अनुत्तरीत प्रश्न विचारानेच सोडवावे लागतील अचानक निर्णय घेऊ नका. डाँक्टर व
सर्जन मंडळींकडून अतिशय अवघड आँपरेशन यशस्वी होईल.
| शुभं-भवतु ||