Read in
शुक्रवार 06 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 06 आँगस्ट चंद्ररास मिथुन 25:53 पर्यंत व नंतर कर्क.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र आर्द्रा सकाळी 06:36 पर्यंत व
पूर्ण दिवसभर पुनर्वसु. वरील दोन्ही राशी नक्षत्रांच्या अभ्यासाने व कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :–परवा परवापर्यंत जे वाहन त्रास देत होते ते अचानक मस्तपैकी चालु लागेल. वडिल भावंडाच्या
मदतीने तुमच्या स्वत:च्या व्यवसायातील महत्वाचा टप्पा पार पाडाल. आज तुम्हाला खेळकर हवेचा
आनंद घेता येणार आहे.
वृषभ :–पत्नीच्या मदतीने घराचे लोन फेडण्याचे ठरवाल. राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या
विभागात काम करणार्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागेल. मंगळ कार्यालयातील कर्मचारी
वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल.
मिथुन :–स्वभावातील कष्टाळूपणामुळे आजपर्यंत अडलेली कामे सुरू करण्याचा सपाटा लावाल.
आजचा दिवस तुमच्या मनातील इच्छांना मूर्त स्वरूप देण्याचा विचार पक्का होईल.
कर्क :–नोकरीतील तुम्ही हाताळत असलेल्या जबाबदारीतून तुमची सन्मानाने मुक्तता होईल.
कामाच्या निष्ठेबाबत तुमचे सर्वांकडून कौतुक होईल. राजकीय मंडळीनी बेसावध राहू नये.
सिंह :–बांधकाम खात्यात काम करणार्यांना मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना
आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची चांगली संधी मिळेल. मित्रांच्या संगतीने चांगल्या व
सकारात्मक विचार कराल.
कन्या :–प्रतिक्षेतील उत्तम यशाबद्दल सर्वांकडून कौतुक होईल. तरूणांकडून अवघड कामास सुरूवात
केली जाईल आणि सहकार्यांची मदत मिळणार आहे या खात्रीने पुढे जाल. विद्यार्थ्यांना बदलत्या
परिस्थितीचा विचार विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल.
तूळ :–सेवाभावी वृत्तीने वागणाऱ्यांना सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा वाढल्याचे जाणवेल. वडिलांच्या
प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घराच्या सुशोभिकरणाचे विचार पक्के कराल.
वृश्र्चिक :–जावईबुवाना सासुरवाडीकडून प्रेमाची भेट मिळेल. रखडलेल्या घरबांधणीच्या कामाची घाई
करू नका. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी राहणार आहे. आज खूपच एन्जाँय कराल.
धनु :–जी गोष्ट तुम्हाला जमत नाहीय त्यासाठी मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्यास सर्व सुरळीत होईल.
निवृत्त मंडळींचे रखडलेले पैसे लवकरच मिळणार असल्याचे कळेल. कोणत्याही कामासाठी धावाधाव
करू नका.
मकर :–फळविक्रेत्यांना आजचा दिवस खूपच लाभदायक राहणार आहे. आईवडीलांच्या व्यवसायात
नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता भासेल. नातवंडांबरोबर आजीआजोबांचा वेळ फूपच आनंदात
येईल.
कुंभ :–लहान मुलांना त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी अति लाड करू नका. प्रवासाच्या केलेल्या पूर्व
नियोजनात अचानक बदल करावा लागेल. व्यवसायातील वसूल न झालेले पैसे लवकरच मिळणार
असल्याचा निरोप येईल.
मीन :–गर्भवती स्त्रीयांनी आज विशेष काळजी घ्यावी. एकांतवासात किंवा एकटे राहणार्यांना घरी
जाण्याची ओढ लागेल व संधी पण मिळेल. आईकडील नात्यातील मंडळींच्या कडून आज तुमचे कौतुक
होईल.
| शुभं-भवतु ||