Read in
गुरूवार 05 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 05 आँगस्ट चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
मेष :– नुकताच मनात आल्याप्रमाणे नोकरीतील कामात तुमच्या इच्छेनुसार बदल करण्यात
येईल. स्वकष्टार्जित धन इतरांसाठी खर्च करावे लागेल. जीवनाकडे पाहण्याचा आज तुमचा
कल पूर्णपणे सकारात्मक राहिल्याने सहवासातील मित्रमंडळींची उत्साह वाढेल.
वृषभ :–गायन विद्या शिकत असलेल्यांना आज सार्वजनिक क्षेत्रात गाण्याची संधी मिळणार
आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणासाठी लहानशा तरी प्रवास करावा लागेल. आईसाठी
एखादी किंमती वस्तू घेण्याची इच्छा निर्माण होईल.
मिथुन :–व्यवसायातील मानसन्मान वाढून प्रसिद्धीच्या झोतात याल. लहान भावंडाची इच्छा
पूर्ण करण्याकरीता खर्च करण्याची मनाची तयारी होईल व प्रत्यक्षात करालही. वडिलांच्या
जुगारी वृत्तीत अचानक वाढ होईल पण जराही लाभ होणार नाही.
कर्क :–आजचा दिवस आळसात जाईल. कोणतेही काम करण्याचा उत्साह वाटणार नाही.
रोजच्याच कामातही दिरंगाई वाढेल. वयस्कर मंडळींची प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे
जाणवेल.
सिंह :–तुमच्या मनातील कोणतीच योजना मित्रमैत्रिणींना सांगू नका. घराचे सँनिटायझेशन
करण्याचा बेत रद्ध करू नका. दूरगावी गेलेल्यांना घरी येण्याची ओढ लागेल. आजारी
असलेल्यांना आता बरे वाटू लागेल.
कन्या :–तुमच्या मनातील योजना सफल करण्याकरीता विश्र्वासूंची मदत घ्या. पूर्वी प्रवासात
भेटलेल्यांची परत भेट होईल. आईच्या माहेरकडील मंडळींची अचानक मदत मिळणार आहे.
तूळ :–मित्रांच्या विश्र्वासावर काढलेले काम तुमच्या नियोजनानुसार करता येणार आहे.
महिलांना स्वयंपाकघरातील कामातून वेळ काढून आज तुमच्या हातून रेंगाळलेल्या सरकारी
कामात प्रगती करणार आहात.
वृश्र्चिक :–उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अचानक कांही अडचणी निर्माण होत
असल्याचे जाणवेल. लहान मुलांच्या बाबतीत एखादा अपघात होण्याचा धोका आहे. घरात
असलात तरी जास्त त जास्त काळजी घ्या.
धनु :–शिवणकाम करणार्या टेलर्सच्या बाबतीत आज मानसिक त्रास होणारी घटना घडेल.
लहानशा उद्योजकांना त्यांच्या कामाची क्वालिटी सांभाळावी लागेल. खाऊच्या पदार्थांच्या
उद्योगात कांही तक्रारी येथील.
मकर :–वैवाहिक सुखात अचानक बाधा निर्माण होईल. गैरसमजामुळे निष्कारण वाद निर्माण
होतील. दवाखान्याच्या बिलाचे पैसे विमा कंपनीकडून लवकरच मिळणार असल्याचे कळवले
जाईल.
कुंभ :–भागीदारावर असलेला विश्र्वास तुमच्या कृतीतून दाखवल्या अनेक चांगल्या गोष्टी
घडतील. तुमच्या भोवती लबाड व फायदा बघणार्याला त्यांच्याकडून कितीही फायदा असला
तरी त्यांचा सहभाग घेऊ नका.
मीन :–मुलांकडून तुमचा अपेक्षाभंग झाल्याने मानसिक त्रास होईल. शिक्षकांना आँन लाईन
शिकवताना त्याना नवनवीन पद्धतींचा वापर करावा लागेल. ज्येष्ठ व तक्ज्ञांचा सल्ला घ्या.
| शुभं-भवतु ||