Read in
बुधवार 4 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 04 आँगस्ट चंद्ररास 15:06 व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 28:24 पर्यंत व नंतर आर्द्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
मेष :–संशोधन क्षेत्रात काम करणार्यांना कामातील गुंतागुंत सोडवण्याची वेगळीच घ्यावी लागेल. अँडेमिक क्षेत्रात पी. एच.
डी. करणार्यांना सुद्धा या सर्व कामाचा फारच ताण जाणवेल. संशोधनातील गुरूजनांची म्हणावी तेवढी मदत मिळणार
नाही.
वृषभ :– समाजासाठी उद्बोधन देणारे लेखन तुमच्या हातून होईल. आजपासून पुढील दोन दिवस मानसिक आनंद
मिळाल्यामुळे कामातील उत्साह वाढेल व प्रकृतीची कुरबुर पण कमी होईल.
मिथुन :–जून्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींची अचानक प्रत्यक्ष भेट होईल. लहान भावंडांबरोबर समझौता करावा लागेल व
पुन: त्याच्या हितासाठी, मदतीसाठी आर्थिक भार उचलावा लागेल. सरकारी बँकेच्या अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारच्या
वशिलेबाजीला थारा देऊ नये.
कर्क :–तुमच्या बुद्धीचातुर्याने अवघड कामाचेही योग्य प्रकारे नियोजन कराल. बोलण्यातील तत्परता व
चालाखपणामुळे व्यवसायातही एकदम आगेकूच कराल. पतीपत्नीच्या वादविवादात दोघानाही विचाराने व शांतपणे वागावे
लागेल.
सिंह :–कुटुंबात कोणत्याही विषयावर वाद निर्माण होऊ देऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या धाकामुळे तरूणांना
आपल्या चंगळवादावर लगाम लावावा लागेल. घरातील मानापमानाच्या प्रश्र्नांवर पडदा न टाकल्यास मानसिक स्वास्थ्य
हरवेल.
कन्या :–कोर्टात सुरू असलेल्या वैवाहिक जीवनातील अडचणी व संघर्ष सोडवण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल.
दवाखान्यातील कर्मचारी वर्गास तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की त्यांवर कोणताही उपाय चालणार
नाही.
तूळ :–वाफ घेणे, शेकणे यासारखे उपाय लागू पडणार नाहीत. तरी स्पेशालीस्टना दाखवा. आईबरोबर मतभेद झाल्याने
वाद निर्माण होईल. वडिलांची प्रकृती बिघडेल. तुमच्या प्राँडक्ट विषयी प्रम इतरांची मते जाणून घ्या.
वृश्र्चिक :–ज्यांचे घर कांही कारणाने बंद असेल तर या सप्ताहात घरी चोरी होण्याची ख्यता आहे. दु:खी मित्राच्या मनातील
कोड्याचा उलगडा होईल. तुमच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस जोरात आजरा कराल.
धनु :–नोकरीत मिळणारे प्रमोशन तुमची लांबच्या ठिकाणी बदली करूनच देईल. आईच्या माहेरकडील मंडळीना आपल्या
कलेमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला अतिशय उपयोगी ठरेल.
मकर :–तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांपासून अचानक उपद्रव सुरू होईल. सरकारी योजनांतून तुंम्हाला मोठ्या रकमेचे
अनुदान मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या कामाविषयी अभिमान वाटेल.
कुंभ :–व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ ठरणार नाही, पण आज दुसर्यांवर अवलंबून असणार्या कामात हाथ घालू
नका. जून्या घरात रहात असाल तर त्यातील धोक्याची माहिती करून घ्या.
मीन :–तुमच्या नोकरीतील हाताखालील व्यक्ती तुमच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करेल. या सप्ताहातील कामाचे
नियोजन केल्यास अपेक्षित कामे पूर्ण होतील. महिलांना अचानक पोटदुखीचा कंबरदुखीचा त्रास जाणवेल.
| शुभं-भवतु ||