Read in
मंगळवार 3 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 03 आँगस्ट चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेहिणी 25:42 पर्यंत.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
मेष :–अपत्य प्राप्तीसाठी औषध सुरू करावयाचे आहे किंवा आय. व्ही. एफ. ची ट्रिटमेंट घ्यावयाची
असल्यास आजचा दिवस अजून अजिबात उपयोगाचा नाही. वयस्कर मंडळीना एखाद्या विषारी किडा
मुंगीच्या दंशाचा धोका आहे तरी काळजी घ्यावी.
वृषभ :–आज तुम्हाला कोणत्याच कामात विशेष रस वाटणार नाही. माहीत नसलेल्या माळरानाच्या
किंवा जलाशयाच्या ठिकाणी आज जाउ नका. लहानमुलांना दिवसाच्या माध्यान्ही व संध्याकाळी ७
नंतर बाहेरनेऊ नका.
मिथुन :–आज तुमच्या बाबतीत अनाकलनीय व गूढ वाटणार्या गोष्टी घडतील. कोणतीही अघोरी
उपासना करत असल्या त्यापासून त्रास होईल. विवाहाच्या बाबतीतील कोणतीही बोलणी आज करू
नका.
कर्क:–जूनाट रोगावर उपचार करायचे असल्यास हा सप्ताह तुम्हाला लाभदायक आहे. उपासनेचे
साहित्य गुरूवार पर्यंत खरेदी करा उपासनाचे फलित लवकर मिळेल.
सिंह :–उद्योग व्यवसायासाठी लागणारी मदत, सरकारी परवानग्या यांची तयारी यासप्ताहात
करायला हरकत नाही. आपला व्यवसाय भागिदारी करायचा असल्यास सासूबाईंबरोबर पार्टनरशिप
करावी लाभ चांगले होतील.
कन्या :– पूर्व पुण्याईने तुम्हाला या सप्ताहात गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल. तरूणांना वडिलांचा
उपदेश गुरूसमान असल्याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा
विचार.
तूळ :–पुरूष मंडळींचे नोकरीच्या ठिकाणी महिवा वर्गाबरोबर तात्विक वाद होतील पण वादाला
भांडणाचे किंवा नाराजीचे रूप देऊ नका. लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराच्या व्यवहारापासून दूर रहावे.
वृश्र्चिक :–गेल्या महिन्यातील अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागेल. दत्तक
मुलांबरोबर अतिशय सुंदर ट्युनिंग जमेल व व्यवसायात किंवा घरगुती कामात चांगली प्रगती होईल.
धनु :–घरातील नोकर चाकरांकडू वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करू नका. मुलींना पाळीचा त्रास होईल व
वेदना सहन होणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी कामगारांना प्रक्षिक्षण देण्याची
तुमची कल्पना फलद्रूप होईल.
मकर :–प्रेमाच्या, प्रेमविवाहाच्या व्यवहारात पूर्वी कधीच न जाणवलेल्या स्वभावातील गुणांचा त्रास
होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना आपल्या कामाची दिशा बदलावी लागेल. कानावर
विश्र्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्र्वास ठेवा.
कुंभ :–सार्वजनिक क्षेत्रातील तुमच्या अधिकारात खूपच वाढ होईल. कुटुंबातील कुरबुरीच्या गोष्टी
कितीही जवळचे असले तरी कोणालाही सागू नका. घरातील वादात इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका.
मीन :–राहत्या घराच्या जागेत बदल करावा वाटेल पण त्यातील अडचणीं कडे डोळेझाक केल्यास तुम्हा
नंतर त्रास होणार आहे. अध्यात्मिक उपासकांना एखादे सूचक स्वप्न पडेल त्याचा अर्थ ज्येष्ठांच्या
मदतीने समजून घ्या.
| शुभं-भवतु ||