Read in
सोमवार 02 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 31 जुलै चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 16:36 पर्यंत व नंतर भरणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
रविचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश 27:41.
मेष :–अचानक मौल्यवान वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरतील. बहिणीच्या मुलांसाठी त्यांच्या मनातील शंका दूर करण्याची
संधी मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तज्ञ शिक्षकाची सोय करण्याचे काम तुमच्यावर सोपवले जाईल.
वृषभ :– टाकाऊ वस्तूमधून नवनवीन वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना
अचानक नवीन अधिकार सोपवले जातील. आजची सकाळ एकदम प्रसन्न व आनंदाची वाटेल.
मिथुन :– खरेदीच्या कामात मित्रमंडळींची मदत मिळेल. महिलांना आवडत्या गोष्टीत मन रमवताना आज वेगळाच अनुभव
येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या इच्छा पूर्ण करताना घाई करू नका. काम बिघडण्याचा धोका आहे.
कर्क :–दवाखान्यात किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवाभावी संस्थेत काम करणार्यांना कामाचे समाधान मिळेल व जनतेकडून
कौतुक होईल. तरूणींना आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची किंवा आपले विचार मांडण्याची संधी मिळेल.
सिंह :–दुसर्यांना मोठेपणा देताना आपण कसे मोठे होतो याचा जिवंत अनुभव येईल. कुटुंबात लेखी सुनांकडून अपत्यप्राप्ती संकेत.
मिळणार आहेत. वडिलांना नोकरीमधील त्रास वाढल्याने आजारपण येईल.
कन्या :–कुटुंबातील सदस्यांबरोबर व इतर नातेवाईकांबरोबर एकत्र भेटीमुळे आनंद निर्माण होईल. घर बदलण्याचे विचार तूर्तास
पुढे ढकला. मुलाच्या लग्नाचा बोलणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल.
तूळ :–पूर्वीचे ठरलेले प्रवासाचे बेत रद्ध करावे लागतील. महत्वाच्या कामासाठी तुमचा सल्ला घेतला जाईल. कोणत्याही गोष्टीची
नुसती चर्चा करत बसू नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील.
वृश्र्चिक :– आज तुम्हाला प्रसंगावधानाने वागावे लागणार आहे. नातेवाईकांसाठी अचानक खर्च करावा लागेल. सरकारी
क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील प्रोजेक्टमधे इतरांनी ढवळाढवळ केलेली आवडणार नाही.
धनु :–कालपर्यंत तुमच्या मनाला पटत नसलेल्या गोष्टी आज अचानक पटू लागतील. तरूणांच्या मनातील कल्पनांना वाव मिळेल.
बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या कामाविषयी अभिमान वाटेल.
मकर :–आज तुम्हाला सुसरबाई तुझी पाठ मऊ या विचाराने वागावे लागेल. कालपर्यंत ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली नाही त्याना
आज तुमच्या विचारांचे महत्व कळेल. वयस्कर मंडळीना आपल्या अनुभवांमुळे इतरांचे प्रश्र्न सोडवता येतील.
कुंभ :–मित्रमंडळींच्या मदतीने अवघड कामावर मात करता येईल. आईकडून मिळालेल्या संस्कारांमुळे समाजात तुमची मान ऊंच
होईल. व्यवसायातील सध्या भेडसावणारा गुंतवणूकीचा प्रश्र्न सहजपणे सुटेल.
मीन :– इतरांच्या मताबरोबर सहमती दाखवताना प्रथम विचार करा किंवा वेळ मागून घ्या. डाँक्टर मंडळीना मानसिक आनंद
देणार्या घटनांचा अनुभव येईल. विजेचे उपकरण अचानक तुमच्या हातून बिघडेल.
| शुभं-भवतु ||