Read in
रविवार 01 आँगस्ट 2021 ते शनिवार 07 आँगस्ट 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 01 आँगस्ट चंद्ररास मेष 26:21 पर्यंत व नंतर वृषभ.
चंद्रनक्षत्र भरणी 19:34 पर्यंत व नंतर
कृतिका. सोमवार 02 आँगस्ट चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 22:42 पर्यंत व नंतर
रोहिणी. मंगळवार 03 आँगस्ट चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 25:42 पर्यंत व नंतर
मृगशीर्ष. बुधवार 4 आँगस्ट चंद्ररास 15:06 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 28:24 पर्यंत व
नंतर आर्द्रा. गुरूवार 05 आँगस्ट चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र. शुक्रवार 06
आँगस्ट चंद्ररास मिथुन 25:23 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र आर्द्रा 06:36 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
शनिवार 07 आँगस्ट चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 08:15 पर्यंत व नंतर पुष्य.
1)रविवार रविचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश 27:41.
2)बुधवार कामिका एकादशी.
3)शुक्रवार संत नामदेव महाराज पुण्यतिथी गुरूवार प्रदोष.
4)शनिवार संत सावता माळी पुण्यतिथी.
मेष :–मनात आलेल्या गोष्टींना मूर्त रूप देण्याची जीद्ध खूपच वाढेल. सर्व प्रकारच्या विरोधांचा त्रास
पत्करून ही पुन: पुन: प्रयत्न केल्यास नक्कीच कामाला गती येईल. तुमच्या जोडीदाराचा स्वार्थी
विचार सहन करावा लागेल पण सध्या तूम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही व्यक्त होऊ नका. मौजमजेसाठी
खर्च करताना मागेपुढे पाहणार नाही. व्यवसायातील केलेले नियोजन कारणी लागल्याचे दिसेल व
आर्थिक फायद्याचाही अंदाज येईल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या औदार्याचे कौतुक होईल. तरूणांकडून
इतरांना मोठी आर्थिक मदत मिळेल.
वृषभ :–कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे आजारपण कुठल्या कुठे पळून जाईल. लहान मुलांच्या
प्रकृतीची चिंता पण दूर होईल. आई व मुलांमधील वैचारिक देवघेव व चर्चा चांगले रूप घेईल. घरगुती
पार्लरचा व्यवसाय अचानक चांगला लाभ दायक राहील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून तुमचे सध्या सुरू
असलेल्या प्रयत्नांना चांगले यश येईल. प्रकृतीकडे वेळीच लक्ष दिल्यास दवाखान्यात अँडमिट होण्याची
पाळी येणार नाही हे लक्षांत घ्या. न्यायालयीन कामकाजासाठी लहानशा प्रवास करावा लागेल. सरकारी
कार्यालयातील वेगळीच तुम्हाला अनुभव नसलेले काम तुमच्यावर सोपवले जाईल.
मिथुन :- स्वभावातील प्रेमळपणाचा अनुभव इतरांना येणार आहे. तुमच्या प्रामाणिकपणाचा आज
अचानक गौरव होईल. रिक्षा, टँक्सी चालवणार्यांना त्यांच्या दैनंदिन कामात सन्मानाचे प्रसंग येतील
व शासन दरबारी त्याची नोंद होईल. महिलांना आपल्या आवडत्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
पण त्यासाठी आर्थिक भुर्दंड मात्र मोठा पडणार आहे. दवाखान्यात अँडमिट असलेल्या व्यक्तीसाठी
सप्ताहाच्या सुरुवातीलाच आर्थिक भार सोसावा लागेल. महिलांना नटण्याची हौस पूर्ण करता येईल.
कोणतेही काम मनात आले म्हणून न करता आपला आवाका ओळखूनच करा.
कर्क :–आईच्या माहेरील जागा, शेती किंवा जुने घर याबाबतीतील चर्चा नुसत्याच वाढत जातील.
व्यवसायातील कोणतेही गुपत् नियोजनात गुप्तता बाळगा. नोकरीत होणारा मानसिक त्रास कमी
होण्यास सुरूवात होईल. कुटुंबातील आनंददायक गोष्टीं इतरांबरोबर शेअर करताना आणिक आनंद
मिळेल. वृद्धांच्या तळपायाची आग होत असल्याचे जाणवेल. तरूणांनी नोकरीसाठी दिलेल्या
मुलाखतीतून तुमची निवड झाल्याचे कळवले जाईल. कलाकार मंडळीना समाजाला प्रबोधन
करण्याची चांगली संधी मिळेल.
सिंह :–नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या ताब्यातील महत्वाची कागदपत्रे इतरांसमोर उघड करू नका.
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसमोर स्वत:चे गुपित ही फारसे उघड करू नका. तुमचा तुमच्या
मनावरील संयम हाच मोठा महत्वाचा ठरेल.. आजच्या दैनंदिन जीवनात आज समाधान मिळेल व
कुटुंबियांना ही मोठा आनंद मिळेल. न्यायालयातील रेंगाळलेले काम सुरळीत करण्याकरीता
वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करावे लागतील.
कन्या :–प्रमाणात बाहेर वजन वाढलेल्यानी आवश्यक तो व्यायाम सुरू करावा अन्यथा आजाराला
बोलावणे होईल. जेवण्याच्या अनियमित वेळांमुळे पित्ताचा त्रास असलेल्यांना उलट्या जुलाबाचा त्रास
होईल. तरूणांनी स्वत:हून अंगावर घेतलेल्या नोकरीतील जबाबदार्या अतिशय चोखपणे पार पाडाल.
डाँक्टर व सर्जन यांनी अवघड कामासाठी आपले कौशल्य पणास लावल्याने सर्वत्र कौतुक होईल.
राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून व स्तुतीपाठकांपासूनही सावध रहावे. गुंतवणूकीच्या बाबतीत
कोणत्याच प्रकारचा निर्णय या सप्ताहात घेऊ नका.
तूळ :–व्यवसायातील भागिदार हाच जीवनातील जोडीदार असल्यास हा सप्ताह डबल तिबल लाभ
करून देणारा ठरेल. स्त्रीयांनी गर्भाशयाच्या कोणत्याही त्रासासाठी हलगर्जीपणा करू नये. मानेचे दुखणे
किंवा कंबरेच्या दुखण्याचा त्रास मात्र चांगलाच कमी झाल्याचे जाणवेल. लहान मुलांच्या आवडी
निवडीत चांगला सकारात्मक फरक पडेल. बँकेतील कर्मचार्यांनी अनवधानानेही कोणत्याही
नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करावी व काळजी घ्यावी. कनिष्ठ संततीकडून
आनंदाची व अभिमानाची गोष्ट कळेल. तरूणींना मनासारखे स्थळ येईल.
वृश्र्चिक :–तुम्ही कर्जवसुली विभागात काम करत असाल तर नक्कीच तुम्ही अडचणीत येणार
आहात. नियमाच्या बाहेर व व्यवहाराच्या बाहेर काम करू नका. प्रवासाला जात असाल तर गाडीची वेळ
पाळा ओव्हरकाँन्फीडन्समधे गाडी निघून जाण्याचा प्रसंग येईल. धर्माच्या आधारावर चालणार्या
गोष्टीत सहभाग घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा महागात पडतील. तसेच सोशल
मिडियावर अति अँक्टिव्ह राहू नका. नवीन नोकरीच्या आशेने दिलेल्या मुलाखती फोल ठरतील. आई
वडीलांच्या गैरहजेरीत महत्वाचे निर्णय घेताना बुद्धीचा कस लागेल.
धनु :–संततीकडून मिळणार्या समाधानाने आईवडीलांना आनंद होईल. विद्यार्थांना गणितासारख्या
अवघड विषयातही चांगले गुण मिळतील व सर्वत्र कौतुक होईल. महाविद्यालयीन मुलांनी आपले कष्ट
व आपल्या अपेक्षा यांचा ताळमेळ घालावा. गरोदर मातांना स्वत:च्या मनाने घेतलेले निर्णय त्रासदायक
ठरतील. वयस्कर मंडळींसाठी तरूण मुलांकडून एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल व ज्येष्ठांचा
सन्मान केला जाईल. मनातील हेतु इतरांना सांगू नये. बहिण भावंडात नव्याने बाँडींग तयार होईल..
मकर :–संशोधन कार्यात काम करणार्यांना आपल्या कामाच्या क्षमता वाढवाव्या लागतील. जे काम
तुम्हाला फार पूर्वीपासून ठरविले आहे त्यातही अचानक बदल करावा लागोल. तुमच्या घराला नविन
भाडेकरू शोधत असाल तर या सप्ताहात अजिबात घाई करू का. आईच्या आँपरेशनच्या बाबतीत
लवकर निर्णय घ्या दिरंगाई करू नका. पगाराच्या बाबतीतील तुमचा ढिलेपणा नुकसानी कारणीभूत
होईल. उजव्या पायाची काळजी घ्यावी लागेल. सहज चालता चालता उजव्या पायाला मोठी दुखापत
होईल.
कुंभ :– आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याने या सप्ताहात तुम्ही तुमच्यासमोर आलेल्या
प्रत्येकाला मदत करणार आहे आहात.मागिल पिढीने केलेल्या कर्जाची परतफेड आता शेवटच्या
टप्प्यात येईल. तुमच्या कडील कुटुंबात मुलामुलीना दिलेल्या समान हक्कामुळे सामाजिक
पातळीवर एक आदर्श घालून दिला जाईल. जमीन, घर विक्रीचे थांबलेल्या व्यवहारात नव्याने घडामोडी
घडतील, पण अचानक मनात आले म्हणून घाई न करता योग्य निर्णय घ्या.
मीन :–व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी व्यवहाराचा संबंध येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या
मनातील विचार व हेतू इतरांना स्पष्टपणे सांगितल्यास पुढील वाटचाल सोपी जाईल. पतीपत्नीच्या
भागिदारीतील व्यवसायात नव्याने भांडवल वाढवण्याचा विचार करावा लागेल. स्वत:च्या वस्तूमधे
बदल करण्याचे विचार आता मात्र पक्के होतील. पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून पुन्हा मुख्य
मुलाखतीसाठी बोलावणे येईल. सरकारी कामातील गुंतागुंत सोडवण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन
घेतल्यास योग्य मार्ग सापडेल.
||शुभं-भवतु ||