Read in
शनिवार 31 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 31 जुलै चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 16:36 पर्यंत व नंतर भरणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज मनातील प्रबळ इच्छा पूर्ण करण्याच्या कामाना प्राधान्य द्या. नोकरीतील वरीष्ठांबरोबर बोलताना तु च्या विचारांचा
आदर होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना आंधळेपणाने करू नका. नव्या खरेदीच्या प्रकरणात
घाईघाईने नुकसान संभवते.
वृषभ :–कुटुंबात धार्मिक पूजेचे नियोजन कराल व त्याची जबाबदारी तुम्हालाच पेलावी लागेल. गावाकडील नात्याच्या व घनिष्ठ
संबंधातील व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी मानसिक ताण वाढवेल. लहान मुलांसाठी दवाखान्यात अँडमिट करण्याकरीता धावपळ
करावी लागेल.
मिथुन :–सलोख्याच्या संबंधातील प्रेमाने व चर्चेने मनोबल वाढेल.नोकरीच्या वाढत्या जबाबदारीने पिचून जाणार आहात.
पत्नीकडील मंडळींच्या प्रकृतीची विचारपूस करता करतात याची जबाबदारी स्विकारावी लागेल. मुलांबरोबर आईवडीलांनी
संवाद साधल्यास मुलांचे मनोबल वाढणार आहे.
कर्क :–आज सकाळपासूनच कामामध्ये घाई होणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुढाकाराने कुटुंबातील रखडलेला
विवाह संपन्न होणार असल्याचे सर्वानाच कळेल. दहा वर्षाच्या आतील मुलांना कान दुखीचा त्रास होईल.
सिंह :–कोणतेही पूर्वनियोजित काम करताना नवीनच अडचणी निर्माण झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना आँन लाईन शिकवताना
त्याना नवीन मेथड सापडेल. मैत्रीच्या व्यवहारात कोणालाही शब्द देऊ. संयमाची आवश्कता आहे. कुटुंबातील अडचणींवर
तुमच्याकडूनच उपाय सापडेल.
कन्या :–माणसांच्या गदारोळात आज तुम्हाला तुमचे मत व्यक्त करता येणार नाही. घरातील पाळिव प्राण्यांपासून लहान मुलांना
इन्फेक्शन होण्याचा धोका आहे तरी काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना मानसन्मानाचे प्रसंग येतील.
तूळ :– मनातील इत्छांना मूर्त रूप देण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न कराल. ज्येष्ठांचा सल्ला घेतल्यास कामाला लवकर यश
मिळेल. महिलांना मासिक पाळीचा किंवा मोनोपाँजचा अतिशय त्रास होईल. घरगुती औषधांचा प्रयोग करू नका.
वृश्र्चिक :–आजच्या दुपारच्या जेवणाच्या वेळी कुटुंबात अतिशय खेळीमेळीने चर्चा होतील. दूरगावी असलेल्या मित्रांकडून पुढील
शिक्षणाबाबतच्या चर्चा लाभदायक होतील. लहानमुलांना खोट्या कौतुकाची, स्तुतीची सवय लावू नका.
धनु :–नोकरीतील कामाच्या स्वरूपात होणारा बदल तुम्हाला समाधान देणारा व आवडीचा असेल. कोणत्याही क्षेत्रात र्थिक
गुंतवणूक करणार असल्यास पुढील अंदाज घेऊन करा. भावनेच्या भरात अनोळखी क्षेत्रात हस्तक्षेप करू नका.
मकर :–तुमच्या कार्यक्षेत्रासंबंधित कानावर आलेल्या अफवांवर विश्र्वास ठेवू नका. तुमच्या बाबतीत कांहीही वाईट होणार नाही
आहे. मित्रमंडळींच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय अचूक निघेल व नोकरीत कामावरची पकड घट्ट होईल.
कुंभ :– पतीपत्नीमधील प्रेमात वृद्धी झाल्याने कौटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृद्ध आईवडीलांच्या इच्छेखातर त्याना
समाधान देणारी त्यांच्या आवडीची खरेदी कराल. वारसा हक्काने येणारे पैसे लवकरच मिळणार असल्याचा निरोप वकीलांकडून
येईल.
मीन :– पायाच्या जून्या दुखण्याचा पुन: त्रास सुरू होईल. सरकारी कामातील तुमच्या कडील प्रोजेक्टची वेळ वाढवून देण्यात
येईल. दवाखान्यातील कर्मचार्यांना नवीनच वादाला तोंड द्यावे लागेल. कोर्टाच्या रेंगाळलेल्या कामासाठी वकीलांच्या मागे
लागावे लागेल.
| शुभं-भवतु ||