Read in
शुक्रवार 30 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 30 जुलै चंद्ररास मीन 14:01 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 14:01 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
.वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– तुम्ही दिलेली आर्थिक मदत सत्कारणी लागत असल्याचे कळल्याने मनाला समाधान वाटेल. कुटुंबातील
आनंददायक वातावरणामुळे वयस्कर मंडळीना मानसिक स्वास्थ्य मिळेल. लहान मुलांच्या शालेय अभ्यासक्रमाची
जबाबदारी स्विकारणार शिकवणीचे शिक्षक मिळतील.
वृषभ :–घरगुती व्यवसायात नवीन गणिते बसवताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. ठरलेल्या प्राँडक्टबरोबरच इतर
गोष्टींचाही विचार करा. भावनेच्या भरात काम करण्यापेक्षा वस्तुस्थितीला महत्व द्यावे लागेल.
मिथुन :–नव्याने व्यवसायात शामिल झालेल्यांचा विश्र्वास तपासून पाहिल्याशिवाय मोठे व्यवहार करू नका.विद्यार्थ्यांनी
स्वत:च्या क्षमता ओळखूनच उड्या माराव्यात. तुमच्या संवाद कौशल्याने व्यवसायात चांगली वाढ होईल.
कर्क :–समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची साथ मिळणार असल्याने अडचणींची भिती बाळगू नका. कौटुंबिक वादामुळे
सामाजिक कामावर परिणाम होईल. भावंडाच्या मदतीने व्यवसायातील अडचणींवर उपाय काढता येणार आहे.
सिंह :– तुमच्या मनातील योजनांची इतरांना माहितीद्या तरच त्यांचे सहकार्य मिळेल. कालच्या घटनेची आज पुन:
पुनरावृत्ती होऊ देऊ नका. वयस्कर मंडळीना आपले मन आवडत्या छंदात रमवता येत असल्याचे जाणवेल.
कन्या :–भावनेच्या आहारी जाऊन स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष न देता इतरांसाठी दिवसभर दवाखान्यात रखडाल.
उद्योगातील तुमच्या मनात असलेले आज करायचे धाडस सोमवार पर्यंत पुढे ढकला.
तूळ :–स्कीनला रँश येणे किंवा मानसिक अशक्तपणाचा त्रास जाणवतो. तरूणांना पित्तविकाराचा त्रास खूपच
जाणवल्यामुळे आज तुमच्याकडून कोणतेच काम पुढे सरकणार नाही. वयस्कर मंडळीना पुढील परिस्थितीचाअंदाजयेईल
तरी त्यानी मुलांना तशी कल्पना द्यावी.
वृश्र्चिक :–आर्थिक व्यवहारातील गुपिते लोकांसमोर उघड केल्याने अडचणीत याल. अगदी जवळच्या मित्रांची मदत
घेतल्यास प्रसंगाची कोंडी सुटेल. आईवडीलांच्या व्यवसायातून आज तुम्हाला प्रतिष्ठा मिळत असल्याचे जाणवेल.
धनु :–मनातील विचारांना मनाच्या शक्तीने अवघड कामे मार्गी लावून दाखवाल. अचानक केलेल्या मोठ्या खरेदीमुळे
आर्थिक नियोजन ढासळल्याने मानसिक त्रास होईल व आर्थिक कुचंबणा होणार आहे.
मकर :–कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची बातमीने खूष व्हाल. अध्यात्मिक उपासना करणार्यांना गुरूमाऊलीच्या
आशिर्वादाने बरीच प्रगती झाल्याचे कळेल. तरूणांनी आपल्या स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा किंवा तज्ञांची
मदत घ्यावी.
कुंभ :– श्र्वास घेण्याचा त्रास होत असलेल्यांनी, अस्थमा पेशंट्सनी विशेष काळजी घ्यावी. कुटुंबात अती भावनेच्या आहारी
न जाता कर्तव्याला महत्व द्या. पगारातील मोठी रक्कम मित्राच्या घरगुती गरजेसाठी द्यावी लागेल.
मीन :– कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल. नोकरीतीव वाद समंजसपणे
मिटवता येणार आहेत. व्यवसायातील कोडी सोडवताना चौफेर विचार केल्यास नुकसान होणार नाही.
| शुभं-भवतु ||