Read in
गुरूवार 29 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 29 जुलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 12:01 पर्यंत व नंतर रेवती.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–विद्यार्थी अभ्यासाच्या विषयांबरोबरच आपल्या कला व छंदासाठी वेळ देतील. मित्राच्या व्यवसायातून एखादा पर्याय सुचवला जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील.
वृषभ :–कुटुंबात एखाद्या शुभकार्याच्या चर्चा सुरू होतील. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल. स्वतंत्र व्यवसाय असलेल्यांना आलेल्या आर्थिक अडचणी मित्रमंडळींच्या मदतीने दूर होतील. परदेशी जाऊ इछ्छिणार्यांना नवीन संधी प्राप्तहोतील.
मिथुन :–नोकरीत वैयक्तिक मानसन्मानाच्या प्रसंगांनी हुरळून जाल. बदलेल्या परिस्थितीसमोर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. व्यवसायातील व घरगुती उद्योगातील तुमचे अंदाज अचूक निघतील. सरकारी परवानग्यांसाठी फार धावाधाव करावी लागणार नाही.
कर्क :–राजकारणी व्यक्तींना त्यांच्याबाबत अफवा पसरत असल्याचे कळेल. तरूणांना कमिशनचा किंवा पैशाचा मोह आवरणार नाही. महिलांना घरगुती जबाबदार्या सांभाळणे अवघड जाईल. नोकरीतील तुमच्या वरील जबाबदारी झटकता येणार नाही.
सिंह :–सामाजिक कार्यातून तुम्हाला क्रेडीट मिळण्याऐवजी बदनामीचे प्रसंग येतील. नव्याने कोणत्याही जबाबदारीचे ओझे डोक्यावर घेऊ नका. तरूणांना जून्या व्याधींचा त्रास जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घेऊनच काम करा.
कन्या :–घरातील तरूणांनी आपल्या स्वत:च्या जीवावर होईल एवढेच काम हातात घ्यावे. ऐनवेळी कोणाकडूनही मदत होणार नाही. स्पर्धात्मक यशासाठी मेहनतीवर विश्र्वास ठेवा. खोट्या प्रतिष्ठेला भुलून जाऊ नका.
तूळ :–बँकेतील कर्जवसूलीच्या कामातील गुंतागुंत सोडवताना मानसिक ताण येईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून आनंदाच्या व समाधानाच्या बातम्या कळतील. घर किंवा जागेच्या विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होईल.
वृश्र्चिक :–नोकरीतील मित्रमंडळीना दिलेल्या ऊधारीमुळे तुम्हाला आर्थिक अडचणीतून जावे लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका वाढत असल्याचे जाणवेल. तरूणांना कला, छंद यांच्या उद्योगातून चांगला आर्थिक फायदा होईल.
धनु :–विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. कलाकारांना सामाजिक पातळीवर आपली कला सादर करण्याची खूप मोठी संधी मिळेल. व्यावसायिकांना जून्या देण्या घेण्याच्या व्यवहारातून नुकसान होणार आहे. आज कोणताच व्यवहार करू नका.
मकर :–कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीबाबत काळजीचे वातावरण राहील. पुढारी, नेते मंडळीना लोकाना दिलेला शब्द पाळता येणार नाही. घरगुती उद्योग करणार्यांना त्याच्या उद्योगाचे चांगले प्रमोशन करता येणार आहे.
कुंभ :–आज कुटुंबात अचानक चिडचिड निर्माण होणारे प्रसंग घडतील. नातेवाईकांच्या मदतीने व्यवहारातील गुंतागुंतीची प्रकरणे हाताळणे सोपे जाईल तरी त्यांची मदत घ्या. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्यांनी पूर्ण विचारानेच निर्णय घ्यावा.
मीन :–नोकरीतील व्यवहारात कटकटी निर्माण होतील. नव्याने नोकरीत बदल केला असल्यास तुम्हाला मानसिक आनंद देणारे काम दिले जाईल. तरूणांना व्यवसायात प्रगतीच्या मागे धावावे लागणार नाही. रखडलेल्या कामात राजकीय मंडळींची मदत मिळेल.
| शुभं-भवतु ||