Read in
बुधवार 28 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 28 जुलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10:44 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–सामाजिक कार्यातील तुम्ही करत असलेल्या कामाचा मानसिक ताण येऊन ब्लडप्रेशर वाढेल. दवाखान्यात अँडमिट
असलेल्यांना आज घरी सोडण्याचे ठरेल. आर्थिक अफरातफर किंवा इतर फौजदारी खटला सुरू असलेल्यांवर कारवाई केली
जाईल.
वृषभ :–वैवाहिक जीवनातील झालेल्या वादामुळे दूर गेलेल्या पतीपत्नीचे पुनर्मिलन होईल. सरकारी परवान्यासाठी केलेला अर्ज
मंजूर होऊन चौकशीसाठी बोलावणे येईल. बौद्धीक क्षेत्रातील खेळांमधे उत्तम प्रकारे यश मिळेल.
मिथुन :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत तुमच्यावर असलेल्या जबाबदारीने मनावर ताण निर्माण होईल. नोकरीतील बढती
बाबतचे प्रश्र्न सहजतेने सुटणार आहेत. सासूबाईंना मांड्या व गुडघे दुखीचा फारच त्रास होईल. लहान मुलांना आज दिवसभर
पोटदुखीचा त्रास जाणवेल.
कर्क :–संत साहित्यावरील माहिती देण्यासाठी तुम्हाला बोलावणे केले जाईल. स्पर्धात्मक परिक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी
तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजपासून अभ्यासास सुरूवात करा. तरूणांना आजचा दिवस अध्यात्मिक प्रगतीचा राहील.
सिंह :–घराच्या कर्जफेडीसाठी कुटुंबातील महिलांकडून मोठी रक्कम मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे फार बारकाईने लक्ष
द्यावे लागेल. कोर्टाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत तुम्ही केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरेल.
कन्या :–कलावंताना आजच्या दिवशी कामाचे नवीन नियोजन करावे लागेल. बदली व स्थलांतराच्या कामात तुम्हाला तुमच्या
जिवलग मित्रांची मदत होईल. कौटुंबिक समारंभातील तुमचा सहभाग उल्लेखनिय ठरेल. नवीन आवडती खरेदी कराल.
तूळ :–दगदग व अतिश्रमामुळे प्रकृतीला त्रास संभवतो. जमिन व कोर्टाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने कामात गती येईल. वकिल
मंडळींचे पण चांगले सहकार्य मिळेल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस अतिशय लाभदायक व सन्मानाचा राहील.
वृश्र्चिक :–कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात बिघाड येणार नाही. मानसिक बळाच्या जोरावर
सध्याच्या परिस्थितीतून ही चांगल्या प्रकारे मार्ग काढाल. समोर आलेल्या प्रसंगात धाडसाने उभे रहाल.
धनु :–शाळकरी व काँलेजच्या मुलांना आदरणिय गुरूचे मार्गदर्शन मिळेल. सामाजिक नियम न पाळल्याबद्धल दंड भरावा लागेल.
वयस्कर मंडळीना विस्मरणाचा त्रास होईल. जोडिदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर :–कुटुंबातील मतभेदांमुळे लहान मुलांसमोर चुकीच्या गोष्टी समोर योतील. लांब असलेल्या भावंडांना एकाकीपणाची
भावना मनस्ताप देईल. व्यवसायातील येणे वसूल न त्झाल्याने आर्थिक नियोजन ढासळेल. तरूणांनी क्राँनिक दुखण्यांकडे विशेष
लक्ष द्यावे.
कुंभ :–कलाक्षेत्रातील तुमच्या यशाला आज कोणीही चँलेंज करणार नाही. राजकीय क्षेत्रात विरोधकांच्या कारवाया तुम्हा पाडता
येणार आहेत. महत्वाच्या निर्णयासाठी सर्वांचे मत महत्वाचे राहील. तरूणांना ताप व पित्तविकाराचा त्रास होईल.
मीन :–व्यवसायात हातात घेतलेल्या कामात अचानक अडथळे निर्माण होतील. प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून दाखवाल.
कुसंगतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल पण मित्र सोडणार नाहीत. भागिदारांबरोबरची चर्चा फलद्रूप होण्यासाठी आर्थिक
तुम्हाला आक्रमक राहून चालणार नाही.
| शुभं-भवतु ||