Read in
मंगळवार 27 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 27 जुलै चंद्ररास कुंभ 28:32 पर्यंत व नंतर मीन.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
चंद्रनक्षत्र शततारका 10 :13 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अंगारक संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय 21:59.(मुंबई) आहे. इतरठिकाणचे चंद्रोदय साठी पंचांग पहावे. श्री गजानन हा विघ्नहर्ता असल्याने सध्याच्या या परिस्थितीत बाप्पाची उपासना करावी. ज्यांना खूप काही शक्य नसेल त्यांनी निदान श्री गणेशाचे नामस्मरण करावे.
मेष :–दळणवळण क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करता येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे काम नसलेल्यांना नवीन कामाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करताना येणारे अडथळे दूर होत असल्याचे जाणवेल.
वृषभ :– मामाकडील नात्याची तुमच्या शिक्षणासाठी मोठी मदत मिळेल. कुटुंबातील सर्वांचा हातभार लागल्याने महत्च्याच्या व रेंगाळलेल्या कामाला गती येईल. आज गुंतवणूक ची कोणतीच हालचाल करू नये.
मिथुन :–उद्योग व्यवसायासाठी लागणारी प्राथमिक गरज अचानक चुलत भावंडाकडून पूर्ण होईल. खाजगी नोकरीतील कर्मचार्यांना पदोन्नती मिळणार असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी लहानसा प्रवास करावा लागेल.
कर्क :–मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात राहल्याने अचानक तुम्हाला व्यवसायाची संधी मिळणार आहे. लेखकांना व वक्त्यांना आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल तरी त्याचा फायदा घ्या. आज कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.
सिंह :सामाजिक कार्यात सहकार्यांची चांगली साथ मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय होईल. सरकारी कामातून मिळणारे उत्पन्न अचानक कमी होईल. संध्याकाळच्या भेटीगाठी मधून आज अमर्याद आनंद मिळेल.
कन्या :–आजच्या व्यवहारात व व्यवसायात कितीही अडचणी आल्या तरी जिद्धीने सुरूच ठेवा. राजकीय क्षेत्रातील ओळखींचा उपयोग करून घ्या. महिलांना दैनंदिन कामातून आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल.
तूळ :–सरकारी नियमांची माहिती करून घेतल्याशिवाय कोणत्याही कामात हाथ घालू नका. कुटुंबातील चोरीला गेलेल्या वस्तूचा व आँफिसमधील फाईलचा अचानक सुगावा लागेल. तुम्ही केलेल्या नियोजनात कालावधीला कमी महत्व दिल्याचे निदर्णास आणून दिले जाईल.
वृश्र्चिक :–सध्याच्या तुमच्या हातात असलेल्या कामात मनोधैर्य ठेवल्यास हातातून काम जाणार नाही. घर, जमीन खरेदीबाबतचा अती उतावीळपणा वाढेल. संततिबरोबर झालेल्या मतभेदांमुळे मानसिक त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल.
धनु :–व्यवसायात लागणारे आर्थिक सहाय्य सहजपणे उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक संकटाला तोंड द्यावे लागेल. कौटुंबिक समस्येवर जवळच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपाने मार्ग निघेल. नव्या खरेदीच्या वस्तूत फसगत झाल्याचे कळेल.
मकर :–व्यवसाय उद्योगातील प्रगतीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरीतील तुमची हक्काची येणी लवकरच मिळणार असल्याचे कळेल. शब्दांची कोडी सोडवणारंयांचे सर्वत्र कौतुक होईल.
कुंभ :–आज कुटुंबातील आनंद हा फक्त तुमच्या बोलण्यावर अवलंबून राहील. नव्याने गुंतवणूकीच्या व्यवहारातील छुप्या गोष्टींची माहिती करून न घेतल्याने फसगत होईल. सरकारी नियमावलीचा प्रथम अभ्यास करा. कलाक्षेत्रातील तुमच्या नावाचे महत्व कळेल.
मीन :–महिलांना फँशनेबल कपड्याच्या घरगुती उद्योगातून चांगला लाभ होईल. कुटुंबातील धार्मिक समारंभातील सहभागामुळे मन आनंदी होऊन कामातील उत्साह वाढेल. प्रेमविवाहाच्या बाबतीत आईवडीलांकडून तुम्हाला संमती मिळेल.
| शुभं-भवतु ||