Read in
सोमवार 26 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 26 जुलै चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 10:25 पर्यंत व नंतर शततारका.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत वरिष्ठ खूष असतील. आज आर्थिक नियोजनावर भर दिल्यास कोणतीच खर्चाबाबतची चिंता वाटणार नाही. रोजच्याच कामातही आळस वाटल्याने आज आराम कराल.
वृषभ :– कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होईल. नोकरीतील बदलीमुळे स्थलांतर करावे लागणार आहे. कुटुंबातील लहान मुले व वयस्कर मंडळींच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
मिथुन :–अचानक खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे आर्थिक नियोजन ढासळेल. घरगुती उद्योगात चांगली आवक होईल पण मागणी पाहूनत उत्पादन वाढवा. बांधकाम क्षेत्रातील मंडळीना मोठे धाडस करावे लागेल.
कर्क :–आज गुंतवणूकीचा कोणताच व्यवहार करू नका. अविवाहिताना विवाहाचे नवीन प्रस्ताव येथील. मुलांकडून जबाबदारीने काम करून घेतल्यामुळे त्यांना त्यांची चूक कळून येईल. नोकरीव्यतिरिक्त इतर कामास ही वेळ द्यावा लागेल.
सिंह :–बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करता असाल तर सध्या थांबा. स्त्रीयांना संततीकडून आनंदाच्या सुखाच्या गोष्टी घडतील. आज कोठेही नव्याने अँग्रीमेंट करू नका. आज कुटुंबातील वयस्कर मंडळींच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या :–कुटुंबातील बिघडलेले नातेसंबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित होतील. शेअर्सच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ झाल्याने कर्ज फेडण्याचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या व ब्युटी पार्लरच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल.
तूळ :–व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांना सरकार दरबारी मान वाढेल. घरामध्ये मोठय़ा संख्येने नातेवाईक व मित्रमंडळींचे येणे होईल. व्यवसायासाठी मोठ्या वित्तसंस्थेकडून आर्थिक मदत मिळेल.
वृश्र्चिक :– कुटुंबात मंगलकार्याचे व त्याचबरोबर धार्मिक पूजेचे नियोजन कराल. अभ्यासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांना त्याच्या आवडत्या क्षेत्रातील शिक्षणास प्रवेश मिळणे सोपे होईल. व्यावसायिकांनी व्यवसायातील नवी गुंतवणूक करताना ोविषेश काळजी घ्यावी.
धनु :–आर्थिक व्यवहारात तुम्हाला मोठी उलाढाल कराल. पतीपत्नीच्या वादविवादात दोघेही आज तुल्यबल राहतील. जवळच्या मित्राच्या मदतीने व्यवसायातील नवीन योजना सुरू करता येणार असल्याचे समजेल.
मकर :–कौटुंबिक स्वास्थ्यसाठी आईबरोबर मोकळेपणाने बोलावे लागेल. घरातील मानापमानाच्या गोष्टींना अती महत्व देऊ नका. मित्रमंडळीमधे दुरावलेले संबंध कमी करून तुम्हाला पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करता येणार आहेत.
कुंभ :–नोकरी करत असतानाच तुम्हाला आवश्यक असलेले शिक्षण करता येणार आहे. महिलांनी घरातूनच आँन लाईन कोर्स केल्यास उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवनवीन योजना व कल्पना राबविणारा राहील.
मीन :–भागिदाराच्या व तुमच्या विचारात बरीच तफावत राहील पण लगेच व्यक्त होऊ नका. व्यायाम करणार्या पूरूष व महिलांनी अतिरेक केल्यास दुखापत होऊन आजारपण येणार आहे हे लक्षात घ्यावे. नोकरदारांना वेगळ्याच क्षेत्रातील नोकरीची संधी मिळेल.
| शुभं-भवतु ||