Read in
रविवार 25 जुलै 2021 ते शनिवार 31 जुलै पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 25 जुलै चंद्ररास मकर 22:47 पर्यंत व नंतर कुंभ.
चंद्रनक्षत्र श्रवण 11:17 पर्यंत व नंतर धनिष्ठा. सोमवार 26 जुलै चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 10:25 पर्यंत व नंतर शततारका. मंगळवार 27 जुलै चंद्ररास कुंभ 28:32 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 10 :13 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. बुधवार 28 जुलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10:44 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. गुरूवार 29 जुलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 12:01 पर्यंत व नंतर रेवती. शुक्रवार 30 जुलै चंद्ररास मीन 14:01 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 14 :01 पर्यंत व नंतर अश्र्विनी. शनिवार 31 जुलै चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 16:36 पर्यंत व नंतर भरणी.
आज बुद्धाचा कर्क राशीत प्रवेश होत आहे 11:41.
27 जुलै मंगळवार अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 21:59.
मेष :– 27 ची संकष्ट चतुर्थी तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. जी जी तुमची कामे रेंगाळलेली आहेत त्या कामात मित्रमंडळींच्या मदतीने सुरूवात करायला काहीच हरकत नाही. कुटुंबातील प्रेमाच्या नात्याबरोबर तात्विक मतभेद होणार आहेत. वाद वाढतील तेवढे ताण तणावही वाढतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्याना हेल्थ रिलेटेड शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर राहील. झोपेची तक्रार असणार्यांनी योगासने व ध्यानाचा अभ्यास वाढवल्यास या सप्ताहापासून तुमची झोपेची तक्रार दूर होईल. शैक्षणिक बाबतीत मुलांनी आईचा सल्ला मानल्यास करियरमधील पुढील अडचणी फारशा जाणवणार नाहीत.
वृषभ :– फळ भाजी व फळफळावळ च्या विक्रेत्याना या सप्ताहात चांगला फायदा होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून तुमचे कौतुक करणारे मेसेज येतील . विद्यार्थ्यांनी १० वी च्या परिक्षेत मिळवलेल्या उत्तम यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे हितचिंतक तुम्हाला स्वखुषीने व आनंदाने आर्थिक सहाय्य करणार आहेत. पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून प्रेमाची भेट मिळणार आहे. प्रकृतीबाबतची कोणत्याच तक्रीची भिती वाटण्याचे कारण नाही पण दुर्लक्षही करू नका.
मिथुन :–तरूण मुलांनी मैत्रीमधील चेष्टा मस्करीची मर्यादा ओलांडू नये. लिखीतस्वरूपातील मेसेज मुळे अडचणीत येण्याचा धोखा आहे. पत्रकार, वर्तमानपत्राचे किंवा ईलेक्राँनिक मिडीयातील पदाधिकार्यावर सरकारी गुन्हा दाखल करण्यात येण्याचा धोका आहे. पोलिस खात्यातील कर्मचार्यांना गुप्त गोष्टींचा सुगावा लागण्याच्या संधी मिळतील. आकाशवाणी, टेलिफोन या क्षेत्रातील कर्मचार्यांना आपला प्रभाव पाडता येणार आहे. कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी लेखी सुनांकडून मिळेल. कुळाचाराची एखादी पूजा संपन्न होईल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
कर्क :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून मानहानीचा प्रसंग येईल. तुम्ही पण लगेच पँनिक होऊन कोणतीही रिअँक्शन देऊ नका. मित्रमंडळींच्या बरोबर आनंद साजरा केला जाणार आहे. नवीन व्यवसायाच्या वाटा सापडतील. महिलांच्या घरगुती व्यवसायात नवीन आर्थिक गणिते निर्माण होतील. खाण्याच्या व्यवसायात चांगली आर्थिक प्राप्ती होईल. जूनी लाईटची उपकरणे व्यवस्थित असल्याची खात्री करूनच वापरा. शाँर्ट सर्कीट होण्याचा किंवा शाँक लागण्याचा धोका आहे.कोणत्याही कामातील घाई मुळे कामबिधडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
सिंह :–सप्ताहातील पहिले तीन दिवस तुमच्या मनाप्रमाणे न होणार्या गोष्टीत चिडचीड करू नका. समजूतदारपणाने काम केल्यास इतरांबरोबर चे संबंध व व्यवहारही बिघडणार नाहीत. पतीपत्नीमधील लहान सहान गोष्टी मोठे वाद निर्माण करतील. वैवाहिक जीवनातील अडचणींच्या बाबतीत तुमचा कोणताच युक्तीवाद चालणार नाही. न्यायप्रविष्ट असलेल्या बाबतीत बेजबाबदारपणे वागू नका. नोकरीतील महत्वाच्या कामासाठी तुमची निवड केली जाईल.
कन्या :–पतीपत्नीमधील बर्याच दिवसापासून चाललेली धुसफूस न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्रीयांनी विचारांवर नियंत्रण ठेवावे व इतरांच्या सल्ल्याने न जाता स्वत:च विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी व काही क्षेत्रात माल भरण्यासाठी ची आर्थिक सोय करावी लागेल. मागिल नुकसान भरून काढण्यासाठी मित्रांच्या मदतीने प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश येईल. प्रवासासाठी मात्र हा सप्ताह फारसा हितकारक होणार नाही.
तूळ :–व्यवसायातील मानसिक ताणतणावावर विश्रांती हाच खरा उपाय योग्य राहील. पाळीव प्राण्यांकडून एखादा दंश होण्याची भिती आहे. दुसर्याच्या घरातील पाळीव प्राण्याला हात लावू नका. गुंतवणूकीच्या व्यवहारात मनाने केलेले व्यवहार नुकसानी कारणीभूत ठरतील. कुटुंबातील सासुरवाडीच्या सासुरवाडीच्या अडचणीसाठी मदत करावी लागेल. नोकरीतील प्रोजेक्टमधील काम सुरळीतपणे सुरू करून द्याल. विद्यार्थी व शिक्षक यामधील नाते दृढ होत असल्याचे जाणवेल.
वृश्र्चिक :–आज तुमच्या काँम्प्युटरमधील बिघाडामुळे तुमच्या कामात ही गोंधळ निर्माण होईल. रस्त्यावरील वाहतूक क्षेत्राशी संबंधित असलेल्या अधिकार्यांना कायदेशीर बाब त्यानाच जाचक ठरणार आहे. लहान मुलांच्या कानाच्या आतील भाग दुखत असल्याने तुम्हाला तातडीने लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या बाबतीत तुम्हाला आज चांगले सहकार्य मिळेल कामातील प्रगतीही समाधानकारक असेल. पतीपत्नीमधील एकमेकांचा सहवास आनंददायी राहील.
धनु :–कुटुंबात आजी आजोबांकडून भरपूर कोडकौतुक होणार आहे. अचानक तुमच्या आवडीची वस्तू तुम्हाला भेट दिली जाणार आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना तर आजचा दिवस एकदम सुखसमाधानाचा व आनंदाचा जाईल. व्यवसायातील कोणतेही आर्थिक प्रश्र्न प्रथम समजून घ्या व नंतरच त्यावर चर्चा करा. तुम्हाला तुमची हुशारी दाखवताना पूर्ण विचाराने वागावे लागेल अन्यथा तुमचे हसू होईल. सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्याना इतरांच्या मनात ुत्साह व प्रेरणा निर्माण करता येईल. सौंदर्यप्रसाधनाच्या घरगुती व्यवसायात महिलांना नवीन संधी चालून येतील.
मकर :–तुमच्या मनाला आनंद होण्याकरीता या सप्ताहात तुमच्या कडून स्वार्थी पणाच् वागणे राह आर आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विरोधकांना योग्य मार्ग दाखवता येणार आहे. तरूणांनी आपल्या वागण्यात विवेक ठेवणे महत्वाचे आहे. सामाजिक कार्य करताना वादविवाद होण्याचे प्रसंग येतील. कोणत्याही प्रकारचे धाडस करू नका विनाकारण संकट अंगावर ओढवून घ्याल. तुमची स्वप्ने वास्तवात उतरत असल्याचे जाणवेल. प्रेमाच्या व्यवहारात एकमेकांचे सहकार्य नसल्यास संबंध बिघडण्याचा धोका आहे.
कुंभ :–जागेच्या व्यवहारात अचानक नुकसान होत असल्याचे जाणवेल. व्यक्तिगत व्यवहार इतरांसमोर उघड करू नका. कुटुंबातील परिस्थितीपुढे हार न मानता हिम्मत न सोडता काम सुरू ठेवल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. शाळकरी मुलांना मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने व्यक्तिगत विकासात वाढ झाल्याचे अनुभवास येईल. किरकोळ आजार समजून कोणत्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्न वाढवल्यास कामातील यश दूर नसल्याचे दिसून येईल. आईवडीलांच्या आशिर्वादाने अवघड टप्पा पार कराल.
मीन :–या सप्ताहात तुम्हाला तुमच्या लहरी स्वभावाला चांगलीच मुरड घालावी लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांना जाचक अटींना सामोरे जावे लागेल. मित्र किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्याल. आई व मुलांमधील प्रेमाचा अनुभव इतर नातेवाईकांना खूपच ह्रदयस्पर्शी जाणवेल. या सप्ताहात उधार उसनवारीचे व्यवहार करू नका. प्रेमाच्या व्यवहारातील एकमेकांचे सहकार्य आवश्यक राहील. प्रत्येक गोष्टीतील नियोजनाची किंमत कळेल.
||शुभं-भवतु ||