daily horoscope

शनिवार 24 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार  24  जुलै  2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार  24 जुलै चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 12:40 पर्यंत व नंतर श्रवण. 

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– वयस्कर मंडळीना  गाण्याच्या कार्यक्षेत्रातून आनंद घेता येणार आहे. कुटुंबात नवीन महागडी चैनीची वस्तू घेणार असल्याचे सुनबाई जाहीर करतील. बांधकाम व्यवसायातील अडकलेले काम सुरू करण्याचा विचार पक्का होईल.

वृषभ :– निवृत्त मंडळीना आँन लाईन मन रमवण्याचे, गाणी सिनेमा बघण्याचे नवे मार्ग सापडतील. पतीपत्नीच्या  एकत्रित व्यवसायात लवकरच  मोठी उडी घेता येणार असल्याचे लक्षांत येईल. विवाहिताना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

मिथुन :–आजारी असलेल्या व्यक्तीला आजाराची तीव्रता ओळखून दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. अजोळकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने कांही गोष्टी सोप्या होतील. आँडिट विभागात काम करणार्यांना कामाचा ताण अती प्रमाणात वाढेल.

कर्क :–पुरूष वर्गास शारिरीक अक्षमता, आजारपण यामुळे  उत्साह वाटणार नाही . आज उद्या खरोखरच घरी आराम करा. कुटुंबातूनही तुमच्या अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळेल. दत्तक मुलीकडून कुटुंबाला अभिमान वाटणार्‍या घटना घडतील.

सिंह :–नोकरीत अचानक मानहानीचा प्रसंग येईल. पुरूषांना सासुरवाडीकडून आश्चर्यजनक लाभ होईल व कौतुकही होणार आहे. वयस्कर मंडळीना कंबर व पाठदुखीचा त्रास जाणवेल. व्यवसायातील अडचणींवर अनुभवी मित्राकडून उपाय सापडेल.

कन्या :–शाळकरी मुलांना शब्दकोडी कशी सोडवावीत याचे तुमच्याकडून प्रशिक्षण मिळेल. शारिरीक अपंगत्व असलेल्यांना त्याच्यातील दिव्य शक्तीचा अनुभव येईल. चौकशी यंत्रणेत काम करणार्यांना  मोह, लोभावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ :–उत्तम करियर नसलेल्यांनाही या सप्ताहात पुढील शिक्षण घेण्याची व कामाची संधी मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांना आज अचानक नवीन उत्साहात काम करता येणार आहे. सर्वत्र कौतुक होईल.

वृश्र्चिक :–रक्ताभिसरणातील दोष नकळत वाढत गेल्याने आजारपणाचा त्रास होईल. वेळीच त्याला महत्व देऊन उपाय करा. न्यायालयीन कामातील गुंतागुंत वाढत जाण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळींना गोड पदार्थ खावेसे वाटतील.

धनु :–कुटुंबात महिलांना सोने खरेदीचा मोह आवरता येणार नाही. विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीच्या परिक्षेत चांगले यश मिळेल. नव्याने  गुंतवणूक करताना तज्ञांच्या सल्ल्यानेच केल्यास चांगला लाभ आहे. व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल.

मकर :– लहान भावंडाच्या नादाने तुम्हालाही आर्थिक लाभ होतील. तुमच्या वैचारिक पातळीचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. सरकारी कामातील दुर्लक्षित राहिलेल्या कामाकडे आज लक्ष दिल्यास दंड टळेल. काम वेळेत करावे लागेल.

कुंभ :–पोलिसांना त्याच्या तपास यंत्रणेला मोठे यश येईल.  भूमिगत व्यक्तीला शोधून काढता येणार आहे. नोकरीतील आर्थिक घोटाळे उघड करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. मोठ्या कुटुंबातील वातावरण आज अतिशय आनंदाचे व सहकार्याचे राहील.

मीन :–खूप जवळच्या मित्रमैत्रिणीजवळ मनातील दु:ख उघड करण्याची इच्छा निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला न समजणार्‍या गोष्टींची माहिती तज्ञांकडून घेतल्यावरच निर्णय निश्चित करावा. लहान उद्योगातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *