daily horoscope

शुक्रवार 23 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार  23  जुलै 2021  चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 23 जुलै चंद्ररास धनु 19:57 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14:25 व नंतर उत्तराषाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज  महर्षि व्यासपूजनाचा दिवस असून याच दिवशी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. 

आजपासून चातुर्मास व्रताचा आरंभ होत आहे.

मेष :– नोकरीतील पदाधिकार्यांना त्यांच्या अधिकारात कांही जाचक अडचणी निर्माण झाल्याचे जाणवेल  पण वरिष्ठांसमोर कांहीही बोलता येणार नाही. तरूण मुलींना डोकेदुखीचा व मायग्रेनचा त्रास जाणवेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृषभ :– उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अचानक शिक्षणात आलेला अडथळा दूर करण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे लागेल. परदेश  प्रवास किंवा दूरचा प्रवास ठरवला असेल तर आज त्यातही अडचणी निर्माण होतील. वडीलांकडून  वेळेवर मार्गदर्शन मिळेल. 

मिथुन :–आज लांबच्या प्रवासाचा विचार करू नका. सार्वजनिक  जिवनातील आनंदात पाहुण्यांच्या येण्याने अचानक सकारात्मक वाढ होईल. पितृसुखाच्या क्षणाचा जबरदस्त अनुभव येईल व वडीलानाही कृतकृत्य झाल्याचे वाटेल.

कर्क :–वैवाहिक जीवनात आज मतभेद  होणार असल्याने तुम्ही सुरवातीलाच मौन स्विकारल्यास मनस्ताप कमी होईल. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायद्याचे गणित चांगले जमेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

सिंह :–नोकरीत तुमच्या विचारांना व सल्ल्याने महत्व प्राप्त होईल. स्वत:चा व्यवसाय असलेल्यांना आर्थिक प्राप्ती चांगली होईल व त्याचबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. नवीन उपक्रम सुरू करण्याची इच्छा असणार्‍यांची इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील.

कन्या :–नोकरीतील व व्यवसायातील अडचणींवर तुमच्याकडून उपाय सुचवला जाईल त्यामुळे  तेथील वातावरण आनंदी होईल. न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे अतिशय जागरूकपणे हाताळावी लागतील. परदेशी नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

तूळ :–व्यवसायातील पूर्वीची थटलेली येणी सहजपणे न मागताही येऊ लागतील. वृद्धाश्रमातील आर्थिक व्यवहारासाठी तुमच्याकडून मोठी मदत दिली जाणार आहे. मित्रमंडळीमधे अचानक मतभेद होण्याच्या शक्यता जास्त आहेत.

वृश्र्चिक :–कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे जाणवेल तसेच नवनवीन कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल. जूने घर किंवा जून्या वास्तमधील करावयाचा बदल मार्गदर्शन घेऊनच करावा. वारसा हक्काचे प्रश्र्न सहजपणे सुटतील.

धनु :– व्यवसायातील आर्थिक लाभाचे प्रमाण अचानकपणे वाढणार आहे. नोकरीतील कामाच्या स्वरूपात होणारा बदल किंवा मिळणारे नवीन प्रोजेक्ट अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला आज तुमच्या व्यक्तीमत्वाच्या  प्रभावाचा अंदाज येईल.

मकर :–कुटुंबात अचानक खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने  योग्य नियोजनाची आवश्यकता भासेल. तरूण तरूणींना प्रेमाच्या वनात्यातील गैरसमज दूर झाल्याने मनाला मोकळेपणा वाटेल व मानसिक समाधान मिळेल.

कुंभ :– नोकरीत पगारवाढ किंवा स्पेशल पँकेजचा लाभ होणार आहे. वडिलांकडील नात्याची घरी वर्दळ वाढेल व वातावरण आनंददायक राहील. ज्येष्ठांना त्यांच्या आवडीच्या वस्तू  तरूणांकडून  भेट म्हणून दिल्या जातील. विद्यार्थ्यांकडून नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल. 

मीन :–विवाहेच्छूचे विवाह परिचयातून होणार असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. मित्रमंडळीमधे आनंदोत्सव साजरा करताना व्यसनापासून दूर रहा. व्यवसायात व मित्रमंडळीत आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवावी लागेल. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. 

 

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *