Read in
गुरूवार 22 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 22 जुलै चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 16:25 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. महाराष्ट्रीय बेंदूराचा सण आहे.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–परदेशी व्यक्ती बरोबरील संबंधातून नवीन व्यवसायाची योजना कळेल. उच्चविचारसरणीच्या मंडळीना समाजाला प्रबोधन करण्याची चांगली संधी मिळेल. लेखक व कवी मंडळींकडून त्यांच्या कवितांचे वाचन आँन लाईन करण्याचे जाहीर केले जाईल.
वृषभ :–महिलांना मासिक पाळीचा विशेष त्रास होईल तरी दुर्लक्ष करू नका. गर्भवती स्त्रीयांनी कसलीही दगदग करू नये आज आरामच करावा. ज्यांची प्रसुती किंवा सिझेरियन आज आहे त्यानी ब्लडप्रेशर वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
मिथुन :–पाठदुखी किंवा मणक्याचा कोणत्याही प्रकारच्या त्रासासाठी वेळ न काढता वेळीच उपाय करावा. नव्याने झालेल्या विवाहात विवाह नोंदणीच्या कामात अडथळा निर्माण होतील. घरातील भाडेकरू मुदत संपून सुद्धा सोडण्याची भाषा करणार नाही.
कर्क :–अचानक त्वचेस़ब़धित संसर्गजन्य रोगाचा त्रास होईल. व्यवसायासाठी किंवा घरगुती कामासाठी दिलेले कर्ज परत मिळणार असल्याचा निरोप येईल. कुटुंबात मुलांच्या विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
सिंह :– मित्रमैत्रिणींबरोबर लावलेल्या स्पर्धेत तुमच्या बाजुने निर्णय मिळेल. लहान गोष्टींच्या खरेदीला जाऊन मोठी खरेदी करून याल. संततीच्या आवडीच्या खरेदीसाठी पैशाचा विचार करणार नाही. दूर गावी असलेल्या भावंडांचे एकत्र जमण्याचा मानस होईल.
कन्या :–नोकरीत तुम्ही मागितलेला पगार वरिष्ठांकडून मंजूर केला जाईल. स्वत:च्या राहत्या घराचे नुतनीकरण करण्याचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आईबरोबर मतभेद निर्माण होईल. खाजगी शिकवणी वर्ग घेणार्यांना कामात वाढ झाल्याचे जाणवेल.
तूळ :–कुटुंबातील मंडळींना घेऊन लहानशी पिकनीक करण्याचा विचार पक्का कराल. वयस्कर मंडळीना घरापासून दूर जाण्याची कल्पना मान्य होणार नाही. वाहन विक्रीचा बर्याच दिवसापासून रखडलेला व्यवहार लवकरच पूर्ण करण्याचे मार्ग मोकळे होतील.
वृश्र्चिक :–तुमच्या मनातील विचार व हेतू इतरांना न कळल्याने तुमच्या बाबतीत गैरसमज होतील. महिलांना आतंरिक भितीने ग्रासेल.पुस्तकाच्या लेखनप्रक्रियेत अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. कुटुंबात कुळाचाराच्या पूजाअर्चा करण्याचे ठरेल.
धनु :–मनातील योजना विचारपूर्वक पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. आज अचानक उत्साहात वाढ होऊन कामातील आळस दूर होईल. आईला समाधान देणार्या गोष्टी तुमच्या हातून घडतील.तरूणांना चैनीचे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होईल.
मकर :–तुम्ही हातात घेतलेल्या काम पूर्ण होईल का नाही याविषयी साशंक व्हाल. शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे म्हणावा तितका उत्साह वाटणार नाही. रोजच्याच कामातही आळस वाटेल.
कुंभ :–तुमच्या स्वत:बाबतचे न्यायालयातील काम लवकरच संपत आल्याचे लक्षात येईल. नोकरी निमीत्ताने परगावी असलेल्यांना घरी जाण्यासाठी रजा मंजूर होईल. मित्रमैत्रिणींच्या सल्लानुसार आज विचार करायला हरकत नाही.
मीन :–आईवडीलांमधील वैचारिक मतभेदांवर समजूतदारपणाने पडदा पडेल. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील नवदांपत्यास आनंदाची गोड बातमी कळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इतरांना सल्ला देण्याचे काम करावे लागणार आहे.
| शुभं-भवतु ||