Read in
बुधवार 21 जुलै चंद्ररास वृश्र्चिक 18:29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 18: 29 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–जोडीदाराकडून तुमच्या आत्ताची व्यवसायातील अत्यंत तातडीची आर्थिक गरज पूर्ण होणार आहे. अध्यात्मिक
उपासकांना अंत:स्फूर्तीने महत्वाच्या भेडसावणाऱ्या प्रश्र्नांबाबत सूचना मिळतील. न्यायालयीन कर्मचार्यांना लोकांच्या
प्रश्र्नांना तोंड देणे अवघड जाणार आहे.
वृषभ :– अनोळखी व्यक्तीची दवाखान्याच्या कामात महत्वाची मदत मिळेल. शैक्षणिक संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक
यांना शिक्षकांच्या नियोजनात स्वत:हून लक्ष घालावे लागेल. जाहिराती तयार करणार्या संस्थेस जनतेकडून चांगला
प्रतिसाद मिळेल.
मिथुन :–आजोळकडील नात्याबाबतच्या अडचणींसाठी धावून जावे लागेल. पिढीजात व्यवसायातील कोणतीही घडी
सध्या मोडू नका कींवा त्यात बदलही करू नका. राजकीय मंडळीनी शत्रूला कमी लेखू नये. कामगार संघटनेतील
पदाधिकार्यानी सध्या निर्णयासाठी अजिबात घाई करू नये.
कर्क :–कथा कवितालेखन करणार्यांच्या कल्पनाशक्तीतून चाागले सकारात्मक वाड्.मय निर्माण होईल. सरबते, थंड पेये
यांचा उद्योग असलेल्यांनी सरकारी परवानग्यांविषयी जागरूक रहावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून व
वरिष्ठांकडून ही चांगले सहकार्य मिळेल.
सिंह :–वडीलाोपार्जित मालमत्तेविषयीच्या चर्चेत तुम्ही तुमचा स्वत:चा हेका चालवू नका. मानसोपचार तज्ञांना पेशंटच्या
बाबतीत वेगळ्याच दिव्यातून जावे लागेल. कुटुंबातील आजारपणाचा मानसिक त्रास होईल तरी त्याच्या मुळाशी जाऊन
विचार करा.
कन्या :–बातमीदार, पत्रकार यांच्यावर जनतेचा मोठा रोष निर्माण होईल. भागिदारीच्या व्यवसायातील विश्र्वासाला तडा
जाणार्या गोष्टी तुमच्या हातून होणार आहे तरी काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना सामाजिक कार्याचे क्रेडीट
मिळेल.
तूळ :–लेखनकलेचे आँन लाईन वेबिनार अतिशय उत्कृष्टपणे चालल्याचा रिपोर्ट मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात महत्वाच्या
पदावर तुमची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळेल. बँकेतील रखडलेल्या कामासाठी वेगळा वेळ काढाल तरच
काम मार्गी लागेल.
वृश्र्चिक :–वयस्कर मंडळीना आपले चष्मा किंवा श्रवणयंत्र वेळेवर सापडणार नाही. कुटुंबातील लहान मुलांच्या डोक्याला
किंवा कपाळाला दुखापत होण्याचा धोका आहे. तरूण मुलीना आपले फोटो व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्यावी
लागेल.
धनु :–विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक कृतीकडे अंतर्मुख होऊन पहावे लागेल. तुमच्या आजूबाजूला असलेली
व्यक्ती गुन्हेगारीमधे अडकलेली असण्याची दाट शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींबरोबर बोलणे किंवा ओळख वाढवू
नका.
मकर :–नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन मुलाखतीसाठी लवकरच बोलावणे येणार असल्याचे कळेल.
कोणतीही ओळख लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला पाठवलेले कुरीयरचे पार्सल ठरलेल्या वेळेत पोचणार नाही.
कुंभ :–लहान भावाच्या आजारपणावर पुनर्विचार करावा लागेल. घरापासून दूर गेलेल्यांना घरी परत यावेसे वाटेल.
तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता हातातील कामाला महत्व द्यावे. गायकांना नवीन संधी मिळेल.
मीन :–नोकरी व्यवसायातून मिळणार्या लाभात कपात केल्याचे कळेल. वयस्कर मंडळींची अचानक मानसिक
परिस्थिती बिघडेल. नोकरदार मुलांनी व्यवसायात वडीलांचा शब्द पाळल्यास पुढील संकटाला तोंड देणे सोपे जाईल.
| शुभं-भवतु ||