Read in
मंगळवार 20 जुलै चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 20:32 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.
मेष :– सरकारी कामातील अडचणींबाबत आता तुम्ही पुढे काय करणार आहात हे इतरांना सांगण्याची अजिबात गरज
नाही. नोकरीत तुमच्या कर्तृत्वाने प्रतिष्ठेत वाढ होईल. महिलांना सासरच्या मंडळींकडून सन्मान मिळेल व ज्येष्ठ
व्यक्तींकडून प्रेमाची भेटवस्तू मिळेल.
वृषभ :–मेडीकल क्लेमचे पैसे लवकरच मिळणार असल्याचे कळेल. ज्या नुकसान भरपाईचे पैसे मागितले होते ते पण
मंजूर होणार आहेत. ज्यांना घरातील मंगलकार्यासाठी फंडातून पैसे काढायचे आहेत त्यांना मंजूरी मिळणार नाही तरी
त्यांनी आधीच दुसरी सोय करून ठेवावी.
मिथुन :–व्यवसायातील भागिदारीत मतभिन्नतेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जास्त वेळापूर्वी शिजवलेले
अन्न आज खाऊ नका. तरूणांना पित्ताशयातील वाढलेल्या पित्ताचा फारच त्रास होईल. जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित
पणे मोठी महत्वाची व मोलाची मदत मिळेल.
कर्क:–प्रेमसंबंधात अचानक गैरसमजूतीचे वारे वाहू लागतील. मुलीनी समजूतदारपणा दाखवण्याची जास्त गरज राहील.
नोकरीतील कामाच्या व्यापामुळे नोकरी सोडावी असे वाटेल. सुगंधी वस्तूंच्या, फुलझाडांच्या व्यवसायात चांगली वृद्धी
होईल.
सिंह :–घरातील वादग्रस्त वातावरणामुळे घरांत राहू नये असे वाटेल. बाहेर गावी नोकरीसाठी असलेल्यांना घराची
जबरदस्त ओढ लागेल. सिमेंट, रेती, विटा यांच्या व्यावसायिकांना नव्याने आर्थिक प्राप्ती होऊ लागेल.
कन्या :–प्रोजेक्टवर काम करणार्यांना नवीन काँन्ट्रक्टस् करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन
मुलाखतीसाठी लवकरच बोलावणे येणार असल्याचे कळेल. शब्दांची कोडी सोडवणारंयांचे सर्वत्र कौतुक होईल.
तूळ :–समुपदेशकाचे काम करणार्यांना मागिल कामातून चांगले यश मिळाल्याचे आज निदर्शनास येईल. महत्वाच्या
कामासाठी आज तुम्हाला बाहेरगावी जावे लागणार आहे. आवाजातील जरबीमुळे समोर आलेल्या संकटातून सुखरूप बाहेर
पडाल.
वृश्र्चिक :–आज तुमच्या वैचारिक पातळीवरून तुमच्या स्वभावातील प्रेमळपणाचा व रागीटपणाचाही इतरांना प्रत्यक्ष
अनुभव येई. अचानक स्वकष्टार्जित धन मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागेल. लहान मुलांना खर्या खोट्या तील फरक न
कळल्यामुळे मुले खूप रडतील.
धनु :–वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका.
आईच्या प्रकृतीची काळजी वाढेल. कामाबाबतचा थोडासा आळस किंवा दिरंगाई नुकसानीस कारणीभूत ठरेल.
मकर :–गुंतवणूकीला आज फार महत्व देऊन केलेल्या व्यवहारातून काहीही फायदा होणार नाही. आजचा दिवस
मित्रमंडळींच्या हस्तक्षेपामुळे कामातील गुंतागुंतीवर योग्य मार्ग सापडेल. सकारात्मक विचारांच्या प्रभावाने तुमच्या
मनावरील ताण कमी होईल.
कुंभ :–व्यवसाय करण्याची प्रवृत्ती व तीव्र इच्छा असलेल्यांनीच प्रथम घरगुती उद्योग सुरू करण्याचे आज ठरवावे.
राजकारण किंवा राजकिय हस्तक्षेप असलेल्या कोणत्याही कामात हाथ घालू नका. चोरीला गेलेल्या वस्तूची माहिती
कळेल.
मीन :–आज अचानक दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल. संशोधन तसेच प्रबंध लेखन करणार्यांना गाईड तसेच सहकारी
वर्गाकडून आवश्यक ती मदत मिळेल. बर्याच दिवसापासून रखडलेल्या कामाबाबत सूचक गोष्टींमार्फत बातमी कळेल.
| शुभं-भवतु ||