Read in
सोमवार 19 जुलै चंद्ररास तूळ 17:53 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 22 :26 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :–वडीलांच्या इच्छेनुसार वारसा हक्काची कामे करताना आलेल्या अडचणींवर वडीलांकडून मौन धारण केले जाईल.
तरूण पुरूष वर्गास मनासारख्या खरेदीचा आनंद मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बँकेचे व्यवहार
दुसर्या मार्फत करू नका.
वृषभ :–नोकरीच्या मार्गातील अडचणी दूर होऊन तुमच्या कामाचे स्वरूप आज कळेल. कुटुंबात आजी व आजोबांना
तुमच्याकडून मोठी भेट देण्याचा योग येईल. सामाजिक कार्यकर्त्याना अचानक संघर्षाचा सामना करावा लागेल.
मिथुन :– आज तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दगदग होणार आहे. पदवीधर तरूण तरूणींना स्पर्धा
परिक्षेच्या नव्या कोर्स साठी प्रवेश मिळाल्याचे कळेल. वयस्कर मंडळींची औषध ठेवण्याची जागा बदलल्याने गडबड
होईल.
कर्क :–झोपेचा त्रास असलेल्यांना आजच्या रात्री चांगली झोप लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामातील अडचणीत
सहकार्यांची चांगली मदत होईल. पतीपत्नीच्या एकविचाराने व्यवसायातील नवीन योजना कार्यान्वित कराल.
सिंह :–मनातील वादळ शांत होण्यासाठी काही काळ जावा लागतो हे लक्षांत घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रासंबंधित कानावर
आलेल्या अफवांवर विश्र्वास ठेवू नका. आईच्या विचाराने व सल्ल्याने परिस्थितीवर मात कराल.
कन्या :–अधिकार पदावर असलेल्यांनी कोणताही नकारात्मक निर्णय घेण्याची घाई करू नये. दवाखान्यात अँडमिट
असलेल्या तरूणांना लवकरच डिसचार्ज मिळणार असल्याचे कळेल. लहान मुलांना डोळ्यांचा त्रास होईल.
तूळ :–आज तुमच्या स्वभावातील उतावीळपणा कमालीच्या बाहेर वाढेल. कुटुंबातील खर्चाच्या विषयांवर आज चर्चा करू
नका. मुलांच्या व्यवसायातील कर्जफेडीसाठी आईवडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.
वृश्र्चिक :–पडद्याच्या मागे राहून काम करणार्याची माहिती सर्वांना कळेल.तर काहींचे बिंग फुटेल. समोरच्याच्या
कोणत्याही प्रश्र्नाचे आज तुम्हाला उत्तर देता येणार नाही. मानसिक बळाच्या जोरावर व्यवसाय वाढवण्याचा विचार कराल.
धनु :–मोठ्या पदाधिकार्यांच्या ओळखीने अडकलेली कामे करणे सोपे जाणार आहेत. तरूणांच्या मनातील भिती वाढल्याने
आज तुमच्या हातून कोणत्याच कामाची सुरूवात होणार नाही. व्यवसा तील येणी कांही प्रमाणात मिळू लागतील
मकर :–पैशाला अचानक बर्याच वाटा फुटतील. कितीही ठरवले तरी खर्चाचा आकडा आता आवरणार नाही. मुलांच्या
हातून घडलेल्या चुकांबद्दल दंड भरावा लागेल. विवाहाच्या बाबतीत अतिशय जागरूकपणे विचार करावा लागेल.
कुंभ :–मित्रमैत्रिणींच्या मंगल कार्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदत केली जाईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे केलेले प्रयत्न
सरकारी नियमात अडकल्यामुळे मन नाराज होईल. नोकरीच्या ठिकाणी अहंपणाने वागू नये.
मीन :–मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्यास त्यांच्यात खूपच फरक पडेल. नोकरी बाबतच्या पूर्वी दिलेल्या
मुलाखतींमधून सिलेक्ट झाल्याचा निरोप येईल. व्यवसायातही आजचा दिवस समाधानाचा राहील. घरगुती व्यावसायिकांना
नवीन आँर्डर्स मिळतील.
| शुभं-भवतु ||