Read in
शनिवार 17 जुलै चंद्ररास कन्या 14:06 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 25:31 पर्यंत व नंतर स्वाती. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–प्रकृतीच्या कारणास्तव दोन चार दिवस विश्रांती घ्या म्हणजे पुन्हा ताजेतवाने व्हाल. व्यवसायातील घडामोडींवर
चर्चा करण्यासाठी अचानक तज्ञ व्यक्तीची भेट होईल तरी संधीचा फायदा घ्या. पाठदुखीचा व पायदुखी चा त्रास जाणवेल.
वृषभ :–मागिल सप्ताहात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यात यशस्वी व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींची
मंडळींची योगायोगाने भेट होईल व जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संततीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना लवकरच गोड
बातमी मिळण्याचे संकेत मिळतील.
मिथुन :–आज तुम्ही समजूतदारपणा दाखवल्यामुळे तुमची पुढील कामे एकदम सोपी जाणार आहेत. ब्लडप्रेशर किंवा
ह्रदयाचा त्रास असलेल्यांनी शक्यते आज घराबाहेर पडू नका व घरी पण आराम करा.
कर्क :–संततीच्या हातून घडलेल्या चुकांबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. खोट्या प्रतिष्ठेला भुलून चुकीच्या पद्धतीने
विचार करू नका. कुटुंबातील अडचणींना व नोकरीच्या ठिकाणीही धैर्याने व हिमतीने तोंड द्याल.
सिंह :–कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बदललेल्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने मनावर
दडपण येईल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार नाही.
कन्या:–आज कोणत्याही गोष्टीबाबत मिळालीच पाहिजे म्हणून आग्रही होऊ नका. विद्यार्थी वर्गाला आपल्याला नक्की
काय पाहिजे आहे याबाबत मानसिक द्विधा स्थिती निर्माण होईल. वडीलांबरोबर च्या संवादातून अचानक मार्गदर्शन
मिळेल.
तूळ :–आज तुमच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे तुम्हाला मानसिक बेचैनी येईल व रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
तरूणांच्या चैनी विलासी वृत्तीत वाढ होऊन त्यावर मोठा खर्च कराल. लहान मुलांच्या बाबतीत कोणतीच गँरंटी देऊ नका.
वृश्र्चिक :– मनातील विचारांवर संयम राखल्यास इतरांवर राग उसळून येणार नाही. घराच्या किल्ल्याच्या ठावठिकाणा
लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर तुमचे आज फारसे जुळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचा ताण
जाणवेल.
धनु :–कोणासही आश्र्वासन देताना तुमच्या क्षमतेचा अंदाज घ्या. कुटुंबात एकोपा जपण्याचे काम तुमच्यावर अवलंबून
असेल. कौटुंबिक प्रश्र्नांना प्राधान्य देताना स्वत:च्या जबाबदारीवर प्रश्र्न सोडवावे लागतील.
मकर :–समाजातील तुमच्या शब्दाला असलेली कींमत व तुमची प्रतिष्ठा पाहून आईवडिलांना समाधान वाटेल.
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कल्पना, योजना वरिष्ठांना समजावून सांगण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य पणास लावावे
लागेल.
कुंभ :–आज तुमच्या समोरील व्यक्ती तुमच्यावर छाप पाडल्याने तुमचे काहीच चालणार नाही. तुमच्याकडून केलेले दान
गुप्त राखल्यामुळे तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
मीन :–संकटापुढे हिमतीने उभे राहून संकटावर खात्रीने मात करणार आहात. पुरूषांना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे
लागेल. कोणत्याही प्रकारचे लहान असले तरी आर्थिक व्यवहार लेखी करावे लागतील.
| शुभं-भवतु ||