Read in
शुक्रवार 16 जुलै चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 26:36 पर्यंत व नंतर चित्रा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आरोग्याच्या बाबतीतील मनात असलेल्या शंका सहजपणे दूर होणार नसल्याने डाँक्टर किंवा तत्सम तज्ञ मंडळींचे
मार्गदर्शन घ्या. आज आर्थिक कोडी व्यवस्थित उठवण्याचे योग्य मार्ग सापडतील. जून्या व्यवहारातून आर्थिक उत्पन्न येणार
असल्याचे कळेल.
वृषभ :–विवेकबुद्धीने आज तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर मात करणार आहात. नोकरीसाठी लहानसा प्रवास करावा लागणार आहे.
किरकोळ वस्तूंच्या विक्रीच्या उद्योगातून महिलांना चांगली प्राप्ती होईल. ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल.
मिथुन :–आज तुमचे राजकीय नेत्यांबरोबर एका महत्वाच्या कामासाठी संबंध येथील. मंत्रालयापर्यंत तुमची ओळख कामी येईल.
कुटुंबातील लहान मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील
कामातील गुंतागुंत वरिष्ठांना सांगावी लागेल.
कर्क :–मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याकरीता पूर्वी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवेल. शिक्षक व प्रोफेसर यांना
नव्याने अभ्यासक्रमाचे नियोजन करून तयारी करावी लागेल. सरकारी बँकेतील मंडळीना कर्ज वसुलीचे काम देण्यात येईल.
सिंह :–महिला व पुरूष सर्वानाच आज कुटुंबातील आनंदाचा लाभ घेता येणार आहे. आज मुलांकडून हरवलेल्या वस्तू बाबत
काहीबाही टुकार उत्तरे दिली जातील. कोणत्याही प्रकारच्या लहान सहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका. स्वभावातील रागावर
संयम ठेवा.
कन्या :–आज तुम्हाला तुमच्या कामातून एक मिनीटही उसंत मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टवर
काम करता येणार आहे. मनातील प्रेमभावनांना मोकळी वाट करून द्या. आईवडीलांबरोबरच्या गप्पांमुळे त्यांना मोकळेपणा
वाटेल.
तूळ :–आजच्या मानसिक थकवा येण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे अतीविचार.मधुमेही व्यक्तींना आपल्या योग्य आहार व
व्यायामामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवता आल्याचा अनुभव येईल. कुटुंबात पत्नीकडून गोड बातमी कळेल.
वृश्र्चिक :–शेजारी व नोकरीतील सहकारी वर्गाच्या मदतीने कुटुंबातील आजारपणावर मात केल्याचा आनंद मिळेल.
आईवडीलांच्या कृपेने तुमच्या हालअपेष्टा संपून इच्छापूर्ती होणार असल्याचे जाणवेल. पोटाच्या तक्रारीवर डाँक्टरांचा उपाय
इलाज करेल.
धनु :–तुम्हाला तुमच्या आवडत्या छंदाला वेळ देता येणार असल्याने मनापासून भारावून जाल. बदलत्या परिस्थितीचा विचार
करून करियर मधे बदल करण्याच्या सल्ल्याचा विचार कराल. वकिल, पोलिस यांना गुंतागुंतीच्या केसचा अभ्यास करावा लागेल.
मकर :–वडील बंधूंच्या शस्त्रक्रियेसाठी मानसिक आधार देण्यासाठी मनाचा उतावीळपणा वाढेल व चैन पडणार नाही. तरूणांनी
इतरांच्या व्यवसायाबरोबर आपल्या व्यवसायाची तुलना करू नये. कुटुंबातील प्रत्येक जणाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
भाऊबहिणीत चढाओढ लागेल.
कुंभ :–राजकारणातील मंडळीना विरोधकांचे डावपेच ओळखणे अवघड जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुमचा
अग्रक्रमाने विचार न केल्याने मानसिक त्रास होईल. जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित पणे मोठी महत्वाची व मोलाची मदत
मिळेल.
मीन :–व्यवसायातील विकासाचा विचार अनुभवींच्या सल्ल्यानेच करावा. उगाच केलेल्या धाडसामुळे नुकसान संभवते. खोट्या
प्रतिष्ठेला व स्तुतीला बळी पडू नका. कुटुंबाला व जवळच्या नातेवाईकांना दिलेला शब्द पाळल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान
मिळेल.
| शुभं-भवतु ||