Read in
गुरूवार 15 जुलै चंद्ररास सिंह 09:38 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 27:20 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत.
मेष:–नोकरीतील अडचणींवर मात करून संततीच्या प्रश्र्नांना ही तितकेच महत्व द्यावे लागेल. प्रेमाच्या व्यक्तींबरोबर वाद
घालण्यापेक्षा त्यांना समजून घेतल्यास नातेसंबंध बिघडणार नाहीत. स्वत:च्या आजारावर स्वत:च इलाज करू नका.
वृषभ :–नोकरीतील कोर्ट कचेरीच्याकामांची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागेल. इतरांच्या चुका आपल्या अंगावर घेतल्याने
मानसिक त्रास संभवतो. लहान मुलांना घरात किंवा घराबाहेरही पाण्याच्या ठिकाणी खेळू देऊ नका. आजोबांच्या प्रकृतीची
काळजी वाढेल.
मिथुन:–वैवाहिक जीवनातील आनंद आणि नोकरीतील समाधान याची बरोबरी करू नका. आज करायला लागणार्या कष्टांना
नाराजीचा सूर लावू नका. कुटुंबाकरीता तुम्ही करत असलेल्या कर्तव्यातच आनंद लपलेला आहे तो शोधण्याचा प्रयत्न केल्यास
अमाप आनंद मिळेल.
कर्क :–अचानक मौल्यवान वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरतील. तुमची पैसे सुरक्षित ठेवण्याची जागा बदलावी लागेल. कानावर
विश्र्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्र्वास ठेवा. राजकीय व्यक्तींना आपल्याच लोकांकडून त्रास होईल.
सिंह :–डोके दुखण्याच्या त्रासाने हैराण व्हाल. तुमच्या स्वभावातील छुपा राग बाहेर येईल व त्याचा जोडीदारावर जास्त
परिणाम होईल. नवीन नोकरी लागण्याच्या प्रयत्नांत सध्याच्या कामाकडे हलगर्जीपणा करू का. डाँक्टरांचा सल्ला घेतल्याने
मोठ्या संकटातून सुटल्याचा अनुभव येईल.
कन्या :–आज तुम्हाला प्रसंगावधानाने वागावे लागणार आहे. काम करताना अचानक झोप येईल किंवा नैराश्य वाटेल.
व्यवसायासाठी घातलेल्या भांडवलात नव्याने भर टाकावी लागणार असल्याचे जाणवेल. वडीलांच्या सुखासाठी त्याच्या
आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल.
तूळ :–सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक कुटुंबात वादाची ठिणगी पडेल. नव्या घराच्या प्रतिक्षेतील महिलांना नवीन
घराच्या व्यवहाराची माहिती मिळेल. बँकेतील रखडलेल्या कामासाठी वेगळा वेळ काढाल तरच तीकामे होणार आहेत. लहान
भावंडाला समजून घ्यावे लागेल.
वृश्र्चिक :–समाजाचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे. नोकरीतील कामाच्या प्रेशरमुळे
मानसिक व शारिरीक थकवा येईल. महिलां कुटुंबात तडजोडीच्या बाबतीत पुढे राहतील. जवळच्या नात्यातून नाराजीचा सूर
येईल.
धनु :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे व तरूणांनी ज्येष्ठांबरोबर अतिशय अदबीने वागावे. आज तुमच्या गैर वागण्याचा वडीलांना त्रास
होईल. जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित पणे मोठी महत्वाची व मोलाची मदत मिळेल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे मन
सुखावून जाईल.
मकर :–आज तुम्ही मसाल्याचे जळजळीत पदार्थ खाण्याचे टाळावे. पित्तप्रकृतीच्या तरूणांनी तर आज चहावर सुद्धा नियंत्रण
ठेवावे. आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट विचाराने करावी. व्यसनापासून दूर राहण्यासाठी निछ्चय करावा.
कुंभ :–जवळच्या नात्यांमधे “अतिपरिचयात अवज्ञा ‘’ याचा अनुभव येईल. सकाळपेक्षा दुपारनंतरचा वेळ आज महत्वाची कामे
करण्याकरीता वापरल्यास कामे यशस्वी होतील. महिलांना अचानक पाठदुखीचा त्रास सोसावा लागेल.
मीन :–काल रात्री पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावत बसू नका. घरातील तरूणांनी वयस्कर मंडळीच्या बाबतीतील जबाबदारी
वेळेवर फार पाडावी. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची, अवघड विषयाची अचानक भिती वाटू लागेल. व्यासायिकांना
कर्जाचे प्रश्र्न चैन पडू देणार नाहीत.
| शुभं-भवतु ||