daily horoscope

बुधवार 14 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 14 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 14 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 27:42 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमचे व तुमच्या मुलांच्या विचारात एकवाक्यता येईल. ज्या गोष्टी तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या आहेत त्या
आजच त्यांच्याबरोबर बोलून घ्या. आज नोकरी व्यवसायातही बरीचशी कामे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करणे सोपे जाणार
आहे.

वृषभ :–आईच्या मनातील विचार तुम्ही न विचारातही ओळखाल. राजकारणातील मंडळीना उगीचच आपले अधिकार
वापरण्याची तीव्र इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी आज कोणाच्याही
सल्ल्याने वागू नका.

मिथुन :–अध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत तुम्हाला आज चांगले समाधान मिळेल. तुमच्या वैयक्तिक महत्वाच्या कामासाठी
कुटुंबातील सर्वाची मदत मिळेल. महिलांना आज घरी व नोकरीत दोन्ही ठिकाणी कामाचा बोजा वाढणार आहे.

कर्क :–लहान मुले जेवत असताना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घास अडकून ठसका लागण्याची शक्यता आहे. महिलांना
सासरच्या नात्यातून आनंदाची बातमी कळेल. नोकरीत आजपर्यंत गुप्त ठेवलेल्या गोष्टी वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय उघड करता
येणार नाहीत.

सिंह :–सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्याना अचानक तुमच्याकडे नेतृत्व सोपवले जाईल. महिलांना ओटीपोट दुखण्याचा खूपच
त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल. तुमच्या विचारांचा
फार मोठा पगडा इतरांवर पडेल.

कन्या :–पूर्वीच्या गुंतवणूकीतून आज मोठे नुकसान झाल्यास मनाला त्रास होऊ देऊ नका.दत्तक पुत्राच्या व मुलीच्या बाबतीत
महत्वाचा निर्णय घेताना मनाची अचानक द्विधा स्थिती निर्माण होईल. भागिदाराच्या बाबतीत तुम्हाला आज तुमचा हट्ट
चालवता येणार नाही.

तूळ:–प्रथमच नव्याने वाहन विकत घेणार्यांचा आजचा आनंद आभाळाएवढा राहील. कुटुंबातील ज्येष्ठांना आज अभिमान
वाटणार्‍या गोष्टी घडतील. आज कोठेही बाहेरच्या प्रवासाचे ठरवले असल्यासतो बेत रद्ध करावा लागेल. शेजार्यांबरोबर आज
एकत्र जेवणाचा बेत होईल.

वृश्र्चिक :–प्रथम संततीचे प्रश्र्न नात्याबाहेरील ज्येष्ठांच्या सल्ल्याने सुटणार आहेत. व्यवसायातील बँकेच्या कर्जाबाबत जागरूक
रहावे लागेल. तरूण मंडळींना छातीत जळजळ होण्याचा त्रास जाणवेल. अँसिडिटी म्हणून सोडून न देता डाँक्टरांचा सल्ला घ्या.

धनु :–घरातील वायरींग एकदा तपासून घ्या अचानक शाँर्टसर्किटचा किंवा शाँक बसण्याचा धोका आहे. कलाकार मंडळीना
नव्याने कलाक्षेत्रात आपले नांव कमवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य
मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मकर :–घरातील बाथरूम, टायलेट च्या आऊट लेटबाबत मोठी अडचण निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड
जाणार्‍या विषयासाठी वेगळे मार्गदर्शन घेतल्यास नंतर अडचण निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारची आज गुंतवणूक करू
नका.

कुंभ :–पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व प्रतिष्ठेची वाढ होईल. व्यवसाय बंद करण्याच्या विचारावर
पुनर्विचार केल्यास मार्ग सापडेल. सकारात्मक विचारांच्या प्रभावाने तुम्हाला मित्रमंडळींकडून आर्थिक मदत मिळेल.

मीन :– आज कोणत्याही प्रकारच्या जुगारात अडकू नका. गुंतवणूकीचा विचारही आज अडचणीत आणणारा ठरेल. बोलण्यातील
स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी व मित्रमंडळीतही गैरसमज न होता सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *