Read in
मंगळवार 13 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 13 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 27:40 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.
आज विनायक चतुर्थी अंगारक योग.
मेष :–अकारण क्रोध व अति उत्साहामुळे वेळ वाया जाणार आहे. प्रमोशनच्या बाबतीत स्वत : कोणतेही प्रयत्न करू नका.
कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. लहान मुलांच्या बाललीला अनुभवण्यात ज्येष्ठांचा वेळ आनंदात जाईल.
वृषभ :–अकस्मात खर्चात वाढ झाल्याने आर्थिक नियोजन ढासळेल. नोकरी व्यवसायात महिला व पुरूष सर्वांचीच
तारेवरची कसरत राहील. वाहन खरेदीच्या विषयाला सध्या पुढे ढकलावे लागेल.
मिथुन :– अचूक नियोजन व परिश्रमाच्या जिद्धीने कठीण कामेही मार्गी लागतील. कुटुंबात आजारपणाची शक्यता राहील
व त्यांना आंतरिक सुरक्षा वाटणार नाही. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकपणा तुम्हाला दोषारोपातून मुक्त करेल.
कर्क :–वरिष्ठांच्या नाराजीमुळे मानसिक ताण वाढेल. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी. अचानक
प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. नोकरीतील मित्रांच्या सहकार्याने कुटुंबातील अडचणी कमी होतील.
सिंह :–व्यवसायातील तणावामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यास आज वेळ मिळणार नाही. तुमच्याकडून केलेले दान गुप्त
राखण्याची काहीच गरज नाही. नोकरीत तुमच्या बोलण्याचा परिणाम त्रासदायक होईल. महिलांनी गुडघ्याच्या तक्रारीवर
आराम करावा.
कन्या :–इतरांचे चांगले करण्यासाठी तुम्ही करत असलेली धडपड कारणी लागेल. नोकरीतील तुमच्या प्रयत्नाचा वेग
पाहून सहकार्यांना आश्चर्य वाटेल. आज तुमच्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींबरोबर मैत्री होईल.
तूळ :– जवळच्या व्यक्तींकडून तुमच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखविले जातील. व्यवसायवृद्धीसाठी
दीर्घकालीन योजना आखण्यासाठी तज्ञांचे सहकार्य घ्याल. विद्यार्थी उत्तम यशाकरीताचा संकल्प करतील.
वृश्र्चिक :–तुमच्या लहरी व हट्टी स्वभावामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या प्रगतीची नोंद
ठेवल्यास पुढील यशाचा अंदाज येईल. स्वत:च्या कामाबद्दल व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा.
धनु :–स्वत:च्या कामाबद्दल असलेला आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. कलाकारांना आपली कला
दाखवण्याची चांगली संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्यांच्या प्रक्षोभक कवितांमुळे वाचकांचा रोष सहन करावा
लागेल.
मकर :–न्यायालयातील कामकाजात कोणत्याही मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. सध्याच्या कोरोनाच्या काळात तुमचे
सुरू असलेले प्रवास बंद करणे हिताचे ठरेल. तुमची फार दिवसापासूनची राहिलेली इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे
संकेत मिळतील.
कुंभ :–स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची इच्छा फलद्रूप होत असल्याचे जाणवेल. व्यवसायात नवनवीन
कल्पनाना वाव दिल्यास तुमचा प्रभाव वाढेल. कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होत नसल्याचे तपासा.
मीन :–कोणत्याही गोष्टींवर थेट बोलणे टाळल्यास समोरील व्यक्ती दुखावणार नाही. व्यवसाय व्यापारातील
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरता फार प्रयत्न करावा लागेल. मोठेपणाच्या कल्पनेत अडकू नका.
| शुभं-भवतु ||