Read in
सोमवार 12 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 12 जुलै चंद्ररास कर्क 27:13 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27 :13 पर्यंत व नंतर मघा. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–आज आईच्या आशिर्वादाची किंमत कळेल व कधीही सहजपणे न होणारे काम होऊन जाईल. नोकरीत मात्र
तुम्हालाच नोकरी बदलाची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी
स्वत:च विचार करा.
वृषभ :–व्यवसायातील लाभ मनाला समाधान देईल. महत्वाच्या कामाला झालेल्या विलंबामुळे काही प्रमाणात नुकसान
सोसावे लागेल. घरातील बाथरूम मध्ये चालताना सर्वानीच काळजी घ्यावी पाय घसरून पडण्याचा धोका आहे.
मिथुन :–आज अति प्रमाणात होणार्या धावपळीमुळे दिवसाच्या शेवटी अतिशय दमायला होईल. जवळच्या
मित्रमैत्रिणीमुळे कांही अप्रत्यक्ष लाभ होतील. महिलांना आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल.
कर्क :– तुमच्या नोकरीच्या ठिकाणी विशेष तज्ञांची व्हिजीट होईल व त्यावेळी तुम्हाला बुद्धीची चुणूक दाखवता येईल.
कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील बर्याच दिवसापासून रेंगाळलेल्या प्रश्र्नांवर उपाय सापडेल.
सिंह :–नोकरी व्यवसायातील धावपळ, वाढलेले आर्थिक प्राँब्लेम यामधे आजतरी कांहीही बदल होणार नाही. जवळच्या
नातेवाईकांकडून एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण येणार आहे.
कन्या :–आईवडिलांकडून मुलींना प्रेमाची भेट मिळेल. मुलांनी आपल्या आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष दिल्यास चांगले
नियंत्रण आणता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या बदललेल्या अपेक्षा पूर्ण करता येणार आहेत.
तूळ :– मित्र व किंवा नातेवाईकांच्या मदतीने व्यवहारातील क्लिष्ट कामेही मार्गस्थ कराल. कुटुंबातील व सामाजिक
क्षेत्रातील धार्मिक कार्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या कळतील.
वृश्र्चिक :–नोकरीत कामाचा पसारा वाढेल. महत्वाच्या गाठीभेटीसाठी प्रतिष्ठीत व उच्चपदस्थांबरोबरील चर्चेसाठी जावे
लागेल. कामातील वाढलेल्या व्यग्रतेमुळे मानसिक ताण निर्माण होईल. कुटुंबातील चिंतेच्या कारणाचे मूळ सापडेल.
धनु :–व्यवसायातून अचानक धन व सुखाची प्राप्ती होईल. सहल व मनोरंजनासाठी वेळ काढण्याची इच्छा निर्माण होईल.
भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर व व्यवसायातील अडचणींवर मात करता येणार आहे.
मकर :–तुमच्या आवडीच्या छंदाला वेळ देता येणार आहे. कुटुंबातील प्रियजनांसाठी त्यांच्या आवडत्या वस्तूंची खरेदी
करता येणार आहे. घरातील आवराआवर करताना जून्या हरवलेल्या मौल्यवान गोष्टी सापडतील व महिलांना त्याचा
आनंद होईल.
कुंभ :–स्वप्रयत्नाने नोकरी मिळवाल. अतिउत्साहाच्या भरात काम बिघडवू नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकपणा
ठेवावा लागेल. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयातील मुद्धे ज्येष्ठांच्या विचाराशिवाय पक्के करू नका.
मीन :–कुटुंबातील व जवळच्या नात्यातील मानापमानाच्या मुद्ध्यावर आता तुम्हीच पडदा टाका. आज तुमच्या मनातील
रेंगाळलेल्या कामाला सुरूवात करण्यास योग्य दिवस आहे. मनोरंजन व चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल.
| शुभं-भवतु ||