Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
रविवार 11 जुलै 2021 ते शनिवार 17 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 17 जुलै चंद्ररास कर्क दिवसरात्र व व चंद्रनक्षत्र पुष्य 26:21 पर्यंत व नंतर आश्लेषा. सोमवार 12 जुलै चंद्ररास कर्क 27:13
पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27:13 पर्यंत व नंतर मघा. मंगळवार 13 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा
27:40 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. बुधवार 14 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 27 :42 पर्यंत व नंतर
उत्तरा फाल्गुनी. गुरूवार 15 जुलै चंद्ररास सिंह 09:38 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 27 :20 पर्यंत व नंतर हस्त.
शुक्रवार 16 जुलै चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 26:36 पर्यंत व नंतर चित्रा. शनिवार 17 जुलै चंद्ररास कन्या 14:06
पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 25 :31 पर्यंत व नंतर स्वाती. वरील प्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार 13 जुलै विनायक चतुर्थी अंगारक योग.
शुक्रवार 16 जुलै रविचा कर्क राशीत प्रवेश 16:52.
शनिवार 17 जुलै शुक्राचा सिंह राशीत प्रवेश 09:25.मेष :–स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांना हा सप्ताह अतिशय उत्साहाचा व स्फूर्तिदायक असणार आहे. कोणतेही काम तुम्ही
धडाडीने व पूर्ण ताकदीने करणार आहात. नोकरीत हाताखालील लोकांचे पूर्ण सहकार्य घेऊन दिलेले टार्गेट पूर्ण करून दाखवाल.
ज्योतिषी, खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा सप्ताह सखोल अभ्यासाचा व महत्वपूर्ण जाईल. तुमच्या कार्यशक्तीचा तुम्ही
पूर्णपणे वापर करणार आहात. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना लहानसा प्रवास करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना
अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार करताना कोणतीही जोखीम न घेता लेखी व्यवहार करा.वृषभ :–कुटुंबातील खर्चाचे प्रमाण अचानक वाढल्याने आर्थिक नियोजनावर परिणाम होईल. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या
बाबतीत निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. उत्तम कार्यशक्ती असूनही काम पूर्ण होणार
नाही. जून्या गावी असलेल्या घराची डागडुजी करावी लागणार आहे. तुमच्या कामाच्या घाई मुळे कौटुंबिक महत्वाची जबाबदारी
इतरांवर सोपवाल. आजी आजोबांना आपल्या नातवंडाविषयी फार मोठ्या अभिमानाचे प्रसंग अनुभवता येणार आहेत.
व्यवसायातील सध्याच्या परिस्थीतीनुसार लाभाचे प्रसंग वारंवार येणार आहेत.
मिथुन :– जवळच्या नातेवाईकांकडून तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल खिल्ली उडवली जाईल. वैवाहिक जोडीदाराची निवड
करताना फक्त स्वत:च्या जबाबदारीवर न करता ज्येष्ठांचा सल्ला घ्या. या सप्ताहात कोणावरही हुकमत न गाजवता तुम्हाला कामे
करून घेता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर अती चर्चा करूनही कोणताच निर्णय घेणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ
व्यक्तीची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे लागेल. सरकारी खात्यातील अडकलेल्या कामांसाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे.
सप्ताहाच्या शेवटी कामातील बोजा मुळे नैराश्य आल्याचे जाणवेल.कर्क :–सप्ताहाच्या सुरूवातीलाच तुम्ही अती भावूक व्हाल. महिलांना माहेरच्या नात्याकडील मंडळींची काळजी लागेल पण
सासरच्या जबाबदारी पुढे तुम्हाला काहीच करता येणार नाही. वडिलोपार्जित वारसाहक्काच्या जमिनीबाबतचे प्रश्र्न
सोडवण्यासाठी नात्याबाहेरील व्यक्तीची मदत घेतल्यास प्रश्र्न व्यवस्थित सुटेल. तरूणांच्या वागणूकी वरून घरात सर्वात ज्येष्ठ
व्यक्तीकडून नाराजीचे सुर निघतील. विवाहाच्या प्रतिक्षेतील मुलामुलींनी परिचयातील मुलामुलींचा विचार केल्यास योग्य योग
जुळून येण्याचे संकेत मिळतील. सरकारी नोकरदारांना अधिकार्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल्याने तुमची काम करण्याची
उमेद वाढेल.सिंह :–अध्यात्मिक बैठक असणार्यांना ज्येष्ठ गुरूमाउलींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीतील नैराश्याची भावना कमी होउन
कामातील उत्साहात वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा गोष्टींचा उलगडा होऊन नियोजित कामाला योग्य
दिशा मिळेल. तरूण मुलींना एकतर्फी प्रेमाचा त्रास जाणवेल तरी त्याबाबत मौन न बाळगता योग्य प्रकारची मदत घ्या. जून्याघराचे नूतनीकरण करण्याची इच्छा होईल व त्या दिशेने प्रयत्नही होतील, महिलांकडून या कामास कडाडून विरोध होईल.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास वर्षाअखेरीस चांगले यश मिळेल. परदेशी नोकरीची मिळणारी संधी
तपासून घ्या खूप लाभदायक होणार आहे.कन्या :–नोकरीत तुम्हाला अपेक्षित वेतनामधे वाढ होणार आहे पण त्यासाठी कोणतेही स्वत:हून प्रयत्न करू नका. कुटुंबातील
महत्वाच्या प्रश्र्नाला तरूणांकडून विरोध होईल पण पुनर्विचार साठी त्यांना वेळ द्या. सार्वजनिक जीवनात एकमेकाला मदत
करण्याचे आवाहन करून मोठ्या समाजकार्याला तुमचा हातभार लागणार आहे. व्यवसायात फार मोठी घडामोड होणार नसली
तरी तरी नुकसान नक्कीच होणार नाही आहे. भागिदाराच्या मह्णण्यालाही महत्व द्यावे लागेल. नोकरीतील तुमच्यावर सोपवलेल्या
कोर्टाच्या कामातून मुक्त होण्यासाठी वरिष्ठांकडे प्रयत्न कराने लागतील. प्रेमविवाहाचे विचार यशस्वी करण्यासाठी सकारात्मक
रहा.तूळ :–सामाजिक व राजकीय दोन्ही क्षेत्रातील हितशत्रूना मागे टाकाल. नोकरीत बदली किंवा कामातील बदल स्विकारावा
लागेल तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. पोलिस, होमगार्ड या क्षेत्रातील कर्मचार्यांना, अधिकार्यांना मिळालेल्या बदलीसाठी
होय म्हणावे लागेल. घरगुती व्यवसायाला अतिशय चांगला कालावधी असल्याने उद्योगात कांही महत्वाचे बदल करावे लागतील.
त्यासाठी तज्ञांचे, अनुभवींची मदत घ्या. त्यातील कष्टांचा विचार न करता पुढे गेलात तर चांगली आर्थिक प्राप्ती होईल. घरगुती
पार्लरच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील. कुटुंबातील हरवलेले मनस्वास्थ्य पुन: निर्माण होईल.वृश्र्चिक :–वडिलोपार्जित व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल व डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर कमी करू शकणार आहात.
कोणत्याही निर्णयापर्यंत येताना एकतर्फी निर्णय न घेता वेळ निभावून न नेता पूर्ण विचाराने घ्या. सरकारी परवानग्या ची
अडकलेली कामे जून्या राजकीय ओळखीमुळे सोपी होतील. कोठेही तुम्हाला आर्थिक व्यवहार करावा लागणार नाही तरी
लाचलुचपत पासून दूर रहा. तुमच्या व्यक्तीमत्वातील धाडस व करारीपणात वाढ झाल्याने कामातील बेधडकपणा वाढेल. आजारी
उद्योगांना आवश्यक ती मदत मिळाल्यामुळे तुम्हाला तुमचा उद्योग सावरता येणार आहे. मुलीकडील ख्याली खुशाली कळल्याने
तुमच्या मनावरचे ओझे हलके होईल.धनु :–तुमच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावामुळे तुमची योग्य पदावर निवड होईल. परदेशी असलेले व्यवसायिक संबंध दृढ होण्याचे
मार्ग सापडतील व तज्ञांची मदतही मिळेल. तुमच्या नकळत तुमच्या वडीलांकडून अनपेक्षित आर्थिक मदत होईल. पतीपत्नीच्या
एकत्रित व्यवसायात ओव्हर ड्राफ्ट घेण्याची वेळ येईल व मिळेलही. शाळकरी मुलांना आपल्या इच्छा दाबाव्या लागणार नाहीत.
तरूण वर्गास प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या जागेवर नियुक्ती केली जाईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न आता फार
करावे लागणार नाहीत. सरकारी क्षेत्रातील स्वत:च्या बाबतीतील कामे स्वत: करायचा प्रयत्न केल्यास अपेक्षित वेळेत होतील.मकर :–या सप्ताहाच्या सुरवातीलाच तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. व्यवहारात अचानक
टाकलेल्या विश्र्वासामुळे फसवणूक होण्याचा धोका असल्याने कोणतीही महत्वाची माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करू नका.
कुटुंबातील स्वत:च्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला जातीने लक्ष घालावे लागेल. मुलांना प्रवेशाबाबत,
शाखानिवडीबाबत त्याच्या शंका दूर करून त्यांना समजवावे लागेल. उत्तम नियोजनाचा परिणाम मुलांना दाखवून द्याल.
कलाकार मंडळीना आपल्या कलेला लोकांसमोर सादर करता येणार आहे. घरगुती उद्योगात प्रगती होईल.कुंभ :–कुटुंबात आईवडीलांसाठी एखाद्या धार्मिक पुजेचे आयोजन कराल. तरूण तरूणींना प्रेमाच्या व्यवहारातील गैरसमज दूर
झाल्याने मनाला मोकळेपणा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जाईल व स्पष्टीकरण
मागण्यात येईल.पतीपत्नीना कुटुंबातील खर्चासाठी या सप्ताहात हात मोकळा सोडावा लागेल. आईवडीलांसाठी त्याच्या
आवडीच्या वस्तूसाठी मन मोठे करून खरेदी कराल. वारसा हक्काच्या जमिनीच्या किंवा घराच्या रेंगाळलेल्या कामात अडथळा
निर्माण केला जाईल तरी कायद्याची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना सुख समाधानाचा अनुभव येईल.मीन :–कोणताही व्यवहार करण्यापूर्वी व्यवहाराबाबतची माहिती करून घ्या अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. प्रेमाच्या
अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही याची दखल घ्या. जोडीदारकडून झालेल्या
चुकांचा बाऊ न करता मोकळ्या मनाने समजून घेतल्यास दोघांमधील ताणतणाव कमी होईल. घरगुती व्यवसायातील
एकमेकांच्या मदतीने अडचणी दूर होतील व उद्योग मार्गी लागेल. महिलांना फँशनेबल कपड्यांच्या उद्योगत भांडवल वाढवण्यास
हरकत नाही. घर बदलण्याच्या कामात कोणाचीही मदत होणार नाही व स्वत:लाच काम पूर्ण करावे लागेल.मकर:- प्रत्येक अरेला कारे केल्याशिवाय मन शांत राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराना त्यांचे मार्गदर्शन
वेबिनरच्या साहाय्याने करता येणार आहे. कुटुंबाच्या समधानासाठी लहानसा प्रवास घडेल. अभ्यासाचे योग्य नियोजन
ना केल्याने अडथळे निर्माण होतील.
कुंभ:- आध्यत्मिक गुरू आपल्या साधकांना मार्गदर्शन करतील. नियोजीत प्रवासाच्या रूपरेषेत बदल होईल. पाळीव प्राणी
आजारी पडल्याने दवाखान्यात न्यावे लागेल. प्रेमिकांकडून वैवाहिक जीवनाविषयी स्वप्ने रंगवली जातील. सरकारी
रेगाळलेल्या कामात महिला अधिकाऱ्यांची मदत होईल.
मीन:- प्रवासात त्रास संभवतो. आई भागीदार असलेल्या व्यवसायात आईचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. ठरलेल्या विवाहात
अडचणी निर्माण होतील. ऋषितुल्य गुरुवर्यांकडून मार्गदर्शन मिळेल. मित्र मंडळींबरोबर व्यावहारिक वाद निर्माण होईल.
||शुभं–भवतु ||