Read in
शुक्रवार 09 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 09 जुलै चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 23:13 पर्यंत व नंतर पुनर्वसु. वरील राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अमावास्या अहोरात्र असून शनिवारच्या सकाळच्या 06:46 पर्यंत आहे.
मेष :–गरजू समजून ज्यांना मदत केली आहे ती सत्कारणी लागल्याचे बघून आनंद होईल. आज महत्वाचा पत्रव्यवहार पूर्ण
करण्याला प्राधान्य द्या. सकारात्मक विचारांचा प्रभावाने अवघड काम मार्गी लावाल. चित्रकला व पेंटींग्ज मधील
कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळेल.
वृषभ :–डोळ्यांचा पूर्वीपासूनच असलेला त्रास अचानक वाढेल. नवीन घरात रहायला जाण्याचे पुन्हा पुढे ढकलले जाईल.
दैनंदिन कामाच्या व्यापात महिलांना स्वत:कडे पहायला जराही वेळ मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना
नवीन प्रोजेक्ट मिळेल.
मिथुन :–तरूणांनी व्यसनापासून जाणीव पूर्वक दूर रहावे. आईच्या प्रकृतीची फक्त विचारपूस न करता प्रत्यक्ष भेट घ्याल.
मनातील नवनवीन योजनांचा समावेश करण्याची हीच योग्य वेळ आहे हे लक्षांत घ्या.
कर्क :–अनावश्यक खर्चाला आळा न घातल्याने अचानक अवघड परिस्थिती निर्माण होईल. वयस्कर मंडळीनी आपली
औषधे नीट नावे वाचूनच घ्यावीत गडबड होण्याचा धोका आहे. अचानक औषधांची किंवा खाण्याची रिअँक्शन होण्याचा
धोका आहे.
सिंह :–वैवाहिक जोडीदाराच्या लहरी स्वभावाचा त्रास सहन होणार नाही. कुटुंबात तरूण व्यक्तीकडून अक्षम्य चुका
घडतील तरी स्वत:चा मानसिक तोल जाऊ देऊ नका. व्यवसायातील अडचणीच्या वेळी कामगार वर्गाकडून अडवणूक केली
जाईल.
कन्या :–कलाकाराच्या कलेला चांगले उत्तेजन मिळाल्याने आर्थिक उत्पन्न ही वाढेल. घरामध्ये एखाद्या लहान मुलाच्या
हट्टीपणामुळे आर्थिक नुकसान होईल. सरकारी नोकरीतील अधिकार्यांना आपले अधिकार वापरता येणार नाहीत.
तूळ :–तुमची समस्या नेमक्या शब्दात तज्ञांना सांगितल्यास त्यावर नक्की उपाय मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना
आपल्या कामाविषयी अभिमान वाटेल. व्यवसायासाठी केलेला करार अचानक मोडला जाणार आहे तरी घाईने करू नका.
वृश्र्चिक :–आज आर्थिक बाजू विषयी चिंता राहणार नाही. मुलांसाठी केलेल्या भविष्याच्या तजबिजीमुळे मनाला शांतता.
मिळेल. आज नातेवाईक व मित्रमंडळी सगळेच फुकटचे सल्ले देणार आहेत तरी त्यांच्यापासून लांब रहा.
धनु :– तोंडात मध घेऊन बोलण्याने कामे कशी सोपी होतात याचा फार मोठा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी
कोणाच्याही भूलथापाना बळी पडू नये. डाँक्टरांचा सल्ला मानावा. भावी गरजेच्या दृष्टीने सध्या खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मकर :–आज नोकरीत आलेल्या अडचणीच्या वेळी जोडीदाराची प्रेमळ साथ महत्वाचा दिलासा देईल. कुटुंबातील
व्यक्तीशिवाय कोणाचाही सल्ला घेऊ नये. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सल्ल्याशिवाय कांहीही करू नये.
कुंभ :–तरूणांनी भविष्यातील गरजा ओळखून आर्थिक नियोजन करावे व अनाठायी खर्च करू नये. कुटुंबातील सर्वानीच
सहविचाराने गुंतवणूक विषयी निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे.
मीन :–कुटुंबातील घटनांचा आढावा घेतल्यास गैरसमज दूर होतील. व्यवसायात कामगार वर्गाकडून चांगले सहकार्य
मिळेल व आर्थिक उलाढाली होतील. अनावश्यक खर्च टाळून बचतीचा विचार करण्याचे ठरवाल.
| शुभं-भवतु ||