Read in
गुरूवार 08 जुलै चंद्ररास वृषभ 07:40 पर्यंत व नंतर मिथुन.
चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 20:57 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– प्रकृतीच्या बाबतीत तुम्हाला आज अतिशय काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना होणारा कुठलाच त्रास अंगावर
काढू नका. तु च्या सहवासातील माणसांचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही याची पण दक्षता घ्या. वैवाहिक जीवनातील
तडकाफडकी घेतलेले निर्णय धातक ठरू शकतात.
वृषभ :–व्यवसायात ज्या धनलाभाची अपेक्षा करत आहात त्याच दिशेने तुमचा व्यवसाय चालला असल्याचे जाणवेल. नव्याने
गुंतवणूकीचा धाडस करायला हरकत नाही. उधारीवर कोणत्याही वस्तूंची खरेदी, विक्रीही आता चालू शकेल. कोणतेही नुकसान
होण्याची शक्यता नाही.
मिथुन :–सर्वच कामे आज मोठ्या उत्साहाने करता येणार आहेत.ज्येष्ठ भावंडाच्या मदतीने व्यवसायातील अडचणींवर उपाय
सापडेल व त्याची चिंता मिटेल. वयस्कर मंडळीनी पायाच्या जखमेकडे विशेष लक्ष द्यावे. शाळकरी मुलांना एकदमच
अभ्यासाची गोडी लागेल.
कर्क :– आज तुम्हाला मनातून जे जे करायचे वाटतेय त्याची सुरूवात करा, सुरू केले असेल तर मार्गी लावा. आजचा दिवस
तुमच्यासाठी अतिशय लाभदायक, आनंदाचा व सुखसमाधानाचा आहे. संधी साधून घ्या व आनंद लुटा. आहाराच्या
बाबतीतही जागरूक रहा.
सिंह :–अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथील माउली व ताई, मावशी यांचा सामाजिक पातळीवर सन्मान होईल. नोकरीतील वाढत्या
जबाबदारीचे भान ठेवून काम करावे लागेल. इतरांच्या वागण्या बोलण्याचा विचार करून मानसिक त्रास करून घ्याल त्यापेक्षा
त्यामागील कारणाचा शोध घ्या.
कन्या :–कोणत्याही विषयाची खातरजमा केल्याशिवाय निर्णयाप्रत येऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठांच्या व आईवडीलांच्या
इच्छेखातर तरूणांनी आपल्या मनाला लगाम घालावा लागेल. प्रेमसंबंधातील गैरसमजूती मुळे नाते दुरावले जाण्याचा धोका
आहे.
तूळ :–मित्रमंडळींवर टाकलेला विश्र्वास अगदी योग्य असल्याची प्रचिती येईल. सासुरवाडीकडील मंडळींचे तुमच्याकडे येणे
होऊन त्याच्या अडचणीच्या प्रसंगात त्यांना मदत करावी लागेल. व्यवसायातील नवीन वाटा कालांतराने त्रासदायक ठरतील
तरी त्यातील धोके आळखून ठेवा.
वृश्र्चिक :–पतीपत्नीच्या एकत्र बँकेच्या अकाउंटवर कर्जाबाबतची नोटीस येईल. वडीलांच्या प्रतिष्ठेमुळे कांही गोष्टी सोप्या
होतील. सरळमार्गाने केलेल्या कामाला यश येईल पण वशिलेबाजीच्या व्यवहारात अडकवण्याचा धोका आहे.
धनु :–सकाळपासूनच विद्यार्थ्यांना आपल्या स्पर्धकांची भिती वाटू लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना आपले अधिकार
वापरण्यावर अडथळे निर्माण होतील. महिलांना बहिणीच्या कुटुंबातील अडचणींसाठी धावून जावे लागेल. तरूणांना मनातील
भावना उघड बोलता येणार नाहीत.
मकर :–प्रवासातील जून्या ओळखीच्या माणसांचा चांगला प्रेमळ सहवास लाभेल. मानसोपचार तज्ञांना कामाचा ताण जाणवेल.
नोकरीच्या ठिकाणात बदल होणार असल्याचे वरिष्ठांकडून कळेल. गर्भवती महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो.
कुंभ :–वैवाहिक जीवनात समंजसपणाचे वातावरण झाल्याने दोघांमधील प्रेमाचे संबंध चांगले सुधारतील. तरूणांनी आपले
विचार व्यक्त करताना शब्द जपून वापरावे लागतील. आत्मविश्वासात अचानक डळमळीतपणा येईल. विद्यार्थ्यांनी
काळानुसार आपल्या ध्येयांचा विचार करावा.
मीन :–आज कोणत्याच क्षेत्रात नव्याने गुंतवणूक करू नका. आपले मत मांडताना समोरील व्यक्ती दुखावणार नाही याची
दखल घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून त्यांच्या छंदाला वेळ द्यावासा वाटेल. भावनेच्या आहारी जाऊन अनावश्यक खर्च
करू नका.
| शुभं-भवतु ||