Read in
मंगळवार 06 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्यमंगळवार 06 जुलै चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 15:19 पर्यंत व नंतर रोहिणी.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–लहान मुलांच्या व तरूण वर्गाच्या व्यक्तींच्या धावताना दुखापत होण्याचा धोका आहे. नोकरी करत असलेल्यांना
नोकरीव्यतिरिक्त नवीन अर्थार्जनाची मार्ग सापडतील. लहानशा का होईना पण उद्योग करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल.
वृषभ :–तुमची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आपली इच्छा लवकरच पूर्ण
होणार असल्याचे संकेत मिळतील. नकारात्मक विचारातील आज अचानकच सकारात्मक विचारांकडे वळाल व मनाला शांतता
लागेल.
मिथुन :– मित्रमैत्रिणींच्या सल्ल्यामुळे उच्चशिक्षणाच्या योग्य दिशेची निवड करता येईल. सौंदर्यप्रसाधनाच्या घरगुती
व्यवसायात महिलांना नवीन संधी चालून येतील. बर्याच दिवसापासूनची तुमची इच्छा न सांगताही बंधुराजांकडून पूर्ण केली
जाईल.
कर्क :– महिलांना आपली नियुक्ती सल्लागार मंडळावर केल्याचे कळेल. सामाजिक कार्यातील पुरूषांनी आज कोणतीही
महत्वाची कामे करायला हरकत नाही. बरेच दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी नोकरीत सहकार्यांची मदत
होईल.
सिंह :–आजचा दिवस तुम्हाला संयमाने वागण्याची सुचना देत आहे. बुद्धीचातुर्याने अवघड कामातील क्लिष्टपणा दूर करून
काम सोप्या पद्धतीने कराल. इतरांच्या कोणत्याही वैगुण्याची चर्चा करू नका. आज कोणतीही गुंतवणूक करू नका.
कन्या :–आज तुम्हाला प्रिय व्यक्तीचा सहवास मिळेल व मनाचे समाधान होईल. महिलांना माहेरील सुखाचा अनुभव येईल.
राजकीय मंडळीना आपलेच म्हणे पुढे दामटता येऊन स्वत:चे वर्चस्व सिद्ध करतील. नोकरीत मोठी जबाबदारी स्विकारावी
लागेल.
तूळ :–तुमच्यावर टाकलेल्या कामाला योग्य तो न्याय द्याल. कुटुंबातील ज्येष्ठांकडून आवश्यक ते सहकार्य मिळाल्याने
आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायातील दोन गटातील वाद मिटण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल.
वृश्र्चिक :–आपल्या वागण्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तरूणांना झोपेची तक्रार झाल्याने
पित्ताचा त्रास जाणवेल. कुटुंबातील मतभेद गोडीगुलाबीने फार पाडाल. शेजारील कुटुंबातील दु:खी वातावरणाचा मानसिक ताण
वाढेल.
धनु :–आर्थिक घडी बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अचानक मोठी खरेदी करण्याची इच्छा अनावर होईल. आज
करण्यात येणारी गुंतवणूक चांगला लाभ देणारी ठरेल. अचूक नियोजनाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा सापडेल.
मकर :–तरूण वर्गाकडून व्यसनाच्या आधीन जाण्याने कुटुंबात ताणतणाव निर्माण होईल. आईवडीलांनी मुलांच्या व्यक्तीगत
चुकांची जाहीर चर्चा करू नये. नोकरीतील कामाच्या ताणतणावाला अती महत्व देऊ नका. प्रेमाच्या व्यवहारातील सडेतोडपणा
त्रासदायक ठरेल.
कुंभ :–आज घरगुती व्यवसायातून अपेक्षित लाभ होईल. आज कुटुंबातील वातावरण आनंदाचे ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर
असेल. विवाहित मुलीच्या सासरकडील मंडळींचे घरी येणे होईल. भूतकाळातील घटनांवर सध्याचा प्रसंग पडताळू नका.
मीन :–लहानशा अपघात होण्याचा धोका आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणताही मोठा व्यवहार करताना
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीबरोबर बोलूनच निर्णय घ्यावा. आज नोकरी व्यवसायात तुम्हाला अचानक वर्चस्व गाजवण्याची हौस
निर्नाण होईल.
| शुभं-भवतु ||